77 वर्षांपूर्वीच्या फ्रूट केकच्या तुकड्याचा 2,200 यूरोला लीलाव!

Queen Elizabeth II Wedding Cake slice Auction : राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांच्या लग्नसोहळ्यातील केकमधला एक पीस मॅरियन पॉलसन यांना भेट म्हणून मिळालेला. पॉलसन यांनी हा केक जतन करुन ठेवलेला. आज 77  वर्षानंतर या केकच्या तुकड्याचा तब्बल 2,200 यूरो म्हणजे जवळपास 2 लाख रुपयाला लीलाव झाला आहे.
[gspeech type=button]

लंडनमधल्या राजघराण्याशी संबंधीत असलेल्या गोष्टी, त्यांचं राहणीमान, कार्यक्रम या सगळ्याचचं जगभरात कुतूहल असतं. आपल्या या कुतूहलात भर घालणारी आणखीन एक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे रॉयल वेडिंग कार्यक्रमामधल्या केकच्या तुकड्याचा लीलाव. 

चक्क 77 वर्ष जुन्या केकचा तुकडा एका चीनी नागरिकांने तब्बल 2,200 यूरोला लीलाव प्रक्रियेतून विकत घेतला आहे.

बक्षिस म्हणून मिळालेल्या केकच्या तुकड्याचं जतन 

राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यानंतर खास पाहुण्यांना हा केक भेट म्हणून पाठवला होता. तब्बल 2 हजार पाहुण्यांना हा केक वाटण्यात आला होता. तेव्हा राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या एडिनबर्ग येथील हॉलीरूडहाऊस राजवाड्यातील हाऊसकीपर मॅरियन पॉलसन यांनाही या केकचा तुकडा भेट म्हणून दिला होता. पॉलसन यांनी हा केक आणि त्यासोबत राणी एलिझाबेथ यांच्या स्वाक्षरीने आलेलं पत्र जसच्या तसं एका सुटकेसमध्ये सांभाळून ठेवलं. 1980 च्या सुमारास पॉलसन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पलंगाच्या खाली असलेल्या सूटकेसमध्ये हा केकचा पीस आणि पत्र असा बक्षिसाचा संपूर्ण बॉक्स मिळाला. 

केकसोबत असलेल्या पत्रामध्ये राणी एलिझाबेथ यांनी पॉलसन यांनी लग्न सोहळ्यासाठी तयार केलेल्या सर्व गोड पदार्थासाठी आभार व्यक्त केले. 

‘रॉयल वेडिंग, रॉयल केक’

राणी एलिझाबेथ (II) आणि प्रिन्स फिलिप यांचं 20 नोव्हेंबर 1947ला लग्न झालं. या लग्न सोहळ्यासाठी खास 9 फूट आणि 500 पौंड वजनाचा फ्रूट केक बनवला. हा केक 4 टायर म्हणजे एकावर एक अशा चार थराचा केक होता.  या केकसाठी वेगवेगळ्या देशातून उत्तमोत्तम पदार्थ मागवण्यात आले होते. या केकमध्ये वापरलेली साखर ही ऑस्ट्रेलियातून आणली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळ होता म्हणून हा केक जास्त काळ टिकावा, यासाठी या संपूर्ण केकला अल्कोहोलच्या वेष्टनात गुंडाळून सजावट केली होती. 

हा केक तब्बल 2 हजार पाहुण्यांना वाटण्यात आला. 100 हून अधिक स्वयंसेवी संस्थांना हा केक दिला होता. आणि या केकमधला 1 थर हा प्रिन्स चार्लस यांच्या बॅप्टीझम  म्हणजे बारशांच्या कार्यक्रमासाठी राखून ठेवला होता. 

देशविदेशातून  मागवलेल्या साहित्यापासून हा केक तयार केलेला म्हणून या केकला ‘द थाउझंड माईल केक’ असं नाव देण्यात आलं होतं. 

फ्रूट केकचं शेल्फ लाईफ

आता हा केक खाऊ शकतो का? असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेलच. तर याचं उत्तर “नाही” असं आहे. हा केक आता खाण्यायोग्य राहिलेला नाही, असं या संपूर्ण लीलाव प्रक्रियेतील अधिकारी जेम्स ग्रींटर यांनी सांगितलं आहे. 

फ्रूट केक हा दीर्घकाळ टिकणारा पदार्थ आहे. पॅंट्रीमधल्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये हा केक सहा महिन्यापर्यंत टिकू शकतो. फ्रीजमध्ये पॅकबंद स्वरूपात हा केक 2 ते 3 महिन्यापर्यंत आपण ठेवू शकतो. तर फ्रीझर मध्ये आपण हा केक 1 वर्षापर्यंत ठेवू शकतो. या एका वर्षात त्या केकची गुणवत्ता कमी होत नाही, असा दावा यूएस अॅग्रीकल्चर डिपार्टमेंटने केला आहे. 

काही फ्रूट केक हे एक -एक  दशकाहून अधिक काळ टिकलेले आहेत. 2017 मध्ये अंटार्टिका येथे 106 वर्ष जुना फ्रूट केक सापडला होता. 

यासाठी तुम्ही केक कसा बनवता त्यावरही केकची शेल्फ लाईफ अवलंबून असते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ