पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुयाना दौरा भारतासाठी का महत्वाचा?

India and Guyana : कॅरिबियन प्रदेशातलं महत्त्वाचं भौगोलिक स्थान, तेलाचे स्त्रोत आणि नैसर्गिक वायू या नैसर्गिक साधनसामुग्रीमुळे गुयाना देशाचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे गुयाना सोबत भारताचे संबंध दृढ करणं हे भारतासाठी क्रमप्राप्त आहे.
[gspeech type=button]

आतंरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक राष्ट्रांशी मैत्रिपूर्ण सलोखा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने या आठवड्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन वेगवेगळ्या देशांचे दौरे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होत. 

यातील एक होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नायझेरिया दौरा, दुसरा G-20 समीटसाठी श्रीलंका दौरा आणि तिसरा बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी कॅरिकोम समीट निमित्ताने सुरु झालेला गुयाना येथील दोन दिवसीय दौरा.  याविविध दौऱ्यांमध्ये त्या-त्या देशांसोबतचे धोरणात्मक संबंध आणखीन दृढ करण्याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे.  

या सर्व दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचा गुयाना दौरा हा अधिक महत्त्वाचा आहे. कॅरिबियन देशाचा सदस्य देश असलेल्या गुयाना मध्ये कॅरिबियन सदस्य गटाचं समेलन आयोजित करण्यात आलं आहे. या समिटमधलाच एक भाग म्हणून दुसऱ्या भारत – कॅरिकॉम समिट या सत्राचं सुद्धा आयोजन केलं होतं. यामध्ये कॅरिबियन समुद्र तटाच्या लगत असलेल्या देशांच्या गटासोबत भारताचे संबंध दृढ व्हावेत, विविध क्षेत्रात एकत्रित काम करता यावे यासंदर्भात भारताकडून काही प्रस्ताव ठेवण्यात आले. 

याशिवाय गुयाना देशासोबतच चीनचे वाढते संबंध लक्षात घेता, भारतातासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे.

गुयाना आणि चीनचे संबंध

कॅरिबियन प्रदेशात भौगोलिक स्थान, तेलाचे स्त्रोत आणि नैसर्गिक वायू या साधनसामुग्रीमुळे गुयाना देशाचं महत्त्व अधिक आहे. अशा या देशासोबत 2017 सालापासून चीनचे खूप चांगले संबंध आहे. या देशाच्या संरक्षण क्षेत्रात, पायाभूत सोयी-सुविधां निर्माण करण्यात चीनचा मोठा सहभाग आहे. एकुनच गुयानावर चीनचा चांगलाच प्रभाव आहे.  

गुयाना सोबतच लॅटिन अमेरिकासोबत सुद्धा चीन आपले संबंध प्रस्थापित करु  पाहत आहे.

अनेक चायना उद्योजक हे गुयानामध्ये आपला व्यवसाय वाढवत आहेत. गुयानामधल्या अनेक पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्प हे चीनी कंपन्यांकडून राबवले जात आहेत. जसं की, अर्थर चंग कॉन्फरन्स केंद्र, चेड्डी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ईस्ट बँक डीमीरारा महामार्ग या प्रकल्पांचं बांधकाम हे चीनी कंपन्या करत आहे. तसेच उर्जा, जलविद्यूत आणि कम्यूनिकेशन क्षेत्रातही चायनाने गुयानामध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. एवढंच नाही तर गुयानाला वाय -12 एअरक्राफ्ट सह अन्य शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि तेथील सैन्यांना प्रशिक्षण देणं अशा संरक्षण क्षेत्राशी संबंधित सुद्धा गुयाना आणि चीनचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

भारतासाठी गुयानाचे महत्त्व काय

गुयाना हा भारतासाठी आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. 

गुयानामध्ये उपलब्ध असलेले तेलाचे साठे हे भारतातील उर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दशकाच्या अखेरपर्यंत गुयाना हा तेल  निर्मितीतला क्रमांक एकचा देश बनू शकतो. तेव्हा या देशासोबत चांगले संबंध प्रस्थापित करणं ही आपली गरज आहे. त्यामुळे भारतातील तेल आणि नैसर्गिक वायू निर्मितीशी संबंधीत कंपन्यांनी गुयानामध्ये व्यवसायाच्या संधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

याशिवाय कॅरिबियन गटातल्या देशाशी  सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी गुयानाचे भौगोलिक स्थान ही महत्त्वाचे ठरते. अमेरिका आणि पाश्चिमात्या देशांचा या देशावर प्रभाव आहे. गुयानामध्ये भारत तंत्रज्ञान, रिन्यूएबल एनर्जी आणि संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करु शकते. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला भारताने गुयानाला 20  ‘डोरनियर – 228’ एअरक्राफ्ट पाठवले.

तसचं, या महिन्याच्या सुरुवातीला गुयानाचे ब्रिगेडीयर ओमर खान यांनी भारताला भेट ही दिली.

तरीदेखिल ज्याप्रमाणात चीनने या देशात पायाभूत सुविधा निर्माण प्रकल्प आणि ऊर्जा क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत त्याप्रमाणे भारताने अजुन प्रगती केली नाही आहे.  त्यामुळए चीनच्या बरोबरीने या गेशात आपल्या व्यापार वाढवण्याच्या दृष्टिने भारत प्रयत्नशील असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दोन दिवसीय दौरा महत्त्वाचा ठरतो.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ