जागतिक राजकारणात ‘ग्लोबल साउथ’ देशांचा वाढता प्रभाव; भारत आणि चीनमध्ये स्पर्धा

The Global South : जागतिक राजकारणात गेल्या काही वर्षांपासून 'ग्लोबल साउथ' देशांचा प्रभाव लक्षणीयपणे वाढला आहे. हे देश आता जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.
[gspeech type=button]

जागतिक राजकारणात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल साउथ’ देशांचा प्रभाव लक्षणीयपणे वाढला आहे. हे देश आता जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.

ग्लोबल साऊथ हा शब्द नवीन नाही. 1955 मध्ये आशिया आणि आफ्रिकेतील देशांचे पहिले मोठे सम्मेलन झाले होते. त्यावेळी या देशांच्या सामायिक समस्यांमध्ये वसाहतवाद आणि वांशिक भेदभावाचा प्रमुख मुद्दा होता. परंतु, आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत या देशांना नवीन प्रकारच्या जागतिक व्यवस्थेत स्वतंत्रपणे प्रगती करण्याची आवश्यकता आहे.

काही शतकांपासून परकीय शक्तींनी या देशांना गुलाम बनवले होते. यामुळे त्यांच्या आर्थिक संसाधनांचा लूट आणि विकासाला मोठा धक्का बसला. आजही अनेक ग्लोबल साउथ देशांमध्ये गरिबी आणि परकीय हस्तक्षेपाचा परिणाम दिसून येत आहे. पण, हे देश आता स्वातंत्र्य मिळवल्यानंतर जागतिक राजकारणात मोठा आवाज उठवत आहेत.

ग्लोबल साऊथ देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आता सुधारणा दिसू लागली आहे. परिणामी, त्यांची खरेदी क्षमता वाढली आहे. यामुळे, जागतिक कंपन्यांना या देशांच्या बाजारपेठांचं आकर्षण वाटू लागलं आहे.

भारत आणि चीन यांच्यात नेतृत्वासाठी स्पर्धा सुरू आहे. भारताचा हिंदी महासागरावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ग्लोबल साऊथमध्ये भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत पूर्वी ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीत असूनही, आज तो एक सक्षम आणि मोठी आर्थिकसत्ता झाला आहे.

चीनने आपला प्रभाव मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे. परंतु त्याच्या कर्ज धोरणामुळे अनेक विकसनशील देशांमध्ये चीनविरोधी भावना वाढल्या आहेत. तसेच, दक्षिण चीन समुद्र आणि आफ्रिकेतील विस्तारवादी धोरणांमुळे चीनचा प्रतिमात्मक प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

याउलट, भारत सर्वांसाठी समान संधी प्रदान करणारा देश म्हणून उदयास आला आहे. भारताने कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक देशांना लसी पुरवल्या आणि संकटग्रस्त देशांमधून आपल्या नागरिकांना परत आणले. भारत कोणत्याही देशावर कर्ज बिनधास्तपणे लादत नाही आणि सैन्य तळेही न बांधता जागतिक समस्यांवर समाधान देण्याचा प्रयत्न करतो.

ग्लोबल साऊथमधील देशांशी संबंध कायम ठेवले पाहिजे आणि त्यांच्या स्थानिक तसेच जागतिक समस्यांवर एकत्र काम केले पाहिजे, या विचारधारेवर भारत ठाम आहे. जर भारताने आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली, तर नैतिक आणि नेतृत्वावर आधारित भारत या देशांचा नेता बनू शकतो.

जागतिक राजकारणातील या नव्या वळणामुळे, भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धा आता पुढील काही वर्षांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ