आजकाल आयफोनचा वापर जगभरात खूप वाढला आहे. आयफोनची जगभरात प्रचंड क्रेझ आहे. आयफोन त्याच्या कॅमेरा क्वालिटी आणि सिक्युरिटी अपडेटसाठी लोकप्रिय आहे. आयफोनची रचना आणि त्याची फिचर्स इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळी आहेत. iPhone, ipad, imac हे Apple प्रोडक्ट्स जगभरात वापरले जातात. आणि या ॲपलच्या प्रोडक्ट्सच्या नावात एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे ‘i’.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का ? की iPhone मधील या ‘i’ चा काय अर्थ आहे?
प्रत्येक प्रोडक्टच्या नावात का वापरला जातो i?
1998 मध्ये iMacची घोषणा करताना कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी i चा अर्थ समजावून सांगितला. आयमॅकची घोषणा करताना स्टीव्ह जॉब्स यांनी ‘i’ म्हणजे इंटरनेट असल्याचं सांगितलं. त्यावेळी इंटरनेट महत्त्व आणि वेग वाढत होता. अॅपलच्या उत्पादनांच्या नावातील ‘i’ म्हणजे इंटरनेट, इंडिव्हिज्युअल, इन्स्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन आणि इन्स्पायर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. Apple ने ‘i’ हे अक्षर अनेक प्रोडक्ट्समध्ये वापरले आहे.
Individual (वैयक्तिक गरज): Apple आपले प्रोडक्ट्स प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार बनवते.
Instruct (मार्गदर्शन): Apple चे प्रोडक्ट्स वापरण्यास सोपे असतात.
Inform (माहिती) : Apple वापरकर्त्यांना महत्त्वाची माहिती देते.
Inspire (प्रेरणा) : Apple आपल्या प्रोडक्ट्सद्वारे नवीन गोष्टींसाठी लोकांना प्रेरित करते.
Internet (इंटरनेट): Apple च्या प्रोडक्ट्समध्ये इंटरनेट महत्वाचे आहे.
तंत्रज्ञानासोबत ‘I’ चा अर्थही बदलला
तंत्रज्ञानामध्ये जसे बदल होतं आहेत तसं ‘i’ चा अर्थही बदलत आहे. आता iPhone 16 आणि iOS 18 मध्ये ‘i’ चा अर्थ ‘Intelligence (बुद्धिमत्ता)’ असा झाला आहे. याचा अर्थ Apple च्या प्रोडक्ट्समध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ची अत्याधुनिक वैशिष्ट्ये वापरली जात आहेत.
2023 मध्ये, Apple ने भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत आपले पहिले Apple Store उघडले. आता, Apple कंपनी बंगलोर, पुणे आणि दिल्ली-एनसीआर मध्ये नवीन स्टोअर्स उघडण्याचा विचार करत आहे.
Apple Store’ अॅप
Apple ने भारतात आपले एक नवीन ‘Apple Store’ अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे लोक थेट Apple कंपनीकडून प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. तसेच त्यांना प्रोडक्टबद्दल माहिती मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अजून चांगला होईल. हे अॅप App Store वरून डाउनलोड करता येईल.