24 ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र स्थापना दिवस

United Nations Day : दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी देशांनी एकत्र येण्याची गरज भासली. याच उद्देशाने 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली.
[gspeech type=button]

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी देशांनी एकत्र येण्याची गरज भासली. याच उद्देशाने 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. ही संस्था शांतता, सुरक्षा, मानवी हक्कांचे संरक्षण आणि विकासासाठी कार्यरत आहे.

49 राष्ट्रांपासून 193 राष्ट्र

संयुक्त राष्ट्र ही एक जागतिक संघटना आहे. सध्या या संघटनेत 193 सदस्य देश आहेत. 1945 मध्ये 49 राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली आणि त्यानंतर इतर अनेक देशही या संघात सामील झाले.

संयुक्त राष्ट्र संघाचे उद्दिष्ट

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जगभरातील सर्व राष्ट्रांमध्ये शांतता आणि सुरक्षा राखणे. याशिवाय राष्ट्रांमधील मैत्री वाढवणे, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि जागतिक समस्यांवर एकत्रितपणे उपाय शोधणे.

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यतः पाच प्रमुख कार्ये आहेत

1. सुरक्षा परिषद जागतिक शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी या परिषदेला असते.

2. महासभा सर्व सदस्य देशांचे प्रतिनिधी महासभेत असतात. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेणे हे महासभेचे कार्य आहे.

3. आंतरराष्ट्रीय न्यायालय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदेशीर विवादांचे निराकरण करण्याचे काम आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे असते.

4. सचिवालय सर्व प्रशासकीय कार्यवाही सचिवालयाद्वारे चालवली जाते.

5. आर्थिक आणि सामाजिक परिषद आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवर काम करण्याची जबाबदारी या परिषदेवर आहे.

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. हा दिवस जगभरातील लोकांना एकत्र आणून शांतता, सहकार्य आणि विकासाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी समर्पित आहे. विविध कार्यक्रम, परिषदा आणि प्रदर्शने या दिवशी आयोजित केले जातात.
संयुक्त राष्ट्र संघ ही जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्र संघांनं अनेक देशांना एकत्र आणून युद्ध टाळण्यात आणि मानवी कल्याणासाठी कार्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ