जेन झी पिढीला सिंगल राहणं का आवडतंय? 

Gen z : जेन झी पिढीला हे समजलं आहे की, दुसऱ्याशी नातं जोडण्याआधी स्वतःला समजणं आणि स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःची ओळख आणि अस्तित्व दुसऱ्यासाठी पूर्णपणे सोडून न देणं हे देखील तितकंच महत्वाच आहे.
[gspeech type=button]

आताची तरुण पिढी म्हणजे ‘जेन झी’ (Gen Z) पिढी रिलेशनशिपमध्ये घाई करत नाहीये. त्यांना सिंगल राहायला जास्त आवडतंय, असं का? जेन झी रिलेशनशिपच्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप वेगळा आहे.

या पिढीतील मुलांना असं वाटतं की, कोणाच्यातरी प्रेमात पडण्याआधी किंवा रिलेशनशिपमध्ये येण्याआधी स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखायला पाहिजे. ‘मी कोण आहे? मला काय आवडतं? माझ्या आवडीनिवडी काय आहेत? या प्रश्नांची उत्तरं त्यांना आधी शोधायची आहेत. त्यामुळेच ही पिढी एकटं राहणं निवडते. कारण त्यांना पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायचं आहे.

आधी स्वतःच भविष्य मग प्रेम

पूर्वीच्या काळात प्रेम करणं म्हणजे गुन्हाच समजला जायचा. पण आता तसं नाही, प्रेम करायला कुणाचा विरोध नाही. पण प्रेमासाठी धावपळ मात्र नकोय. आताची तरुण पिढी असं मानते की, आधी स्वतःला सक्षम बनवणं जास्त महत्त्वाचं आहे. करिअर, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि आर्थिकदृष्ट्या स्टेबल असणं या सगळ्या गोष्टी आधी येतात. एखाद्या नात्यांमध्ये गुंतण्यापेक्षा ही पिढी स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल याकडे जास्त लक्ष देते.

हेही वाचा: जेन झी पिढी ‘कंटाळ्या’चा सकारात्मक फायदा कसा घेऊ शकते?

‘सिंड्रेला’ गोष्टींना रामराम

पूर्वी मुलींना शिकवलं जायचं की, त्यांच्या अडचणींमधून त्यांना एखादा राजकुमार वाचवेल. पण आजच्या काळातील मुलींना या गोष्टी मान्य नाहीत. त्यांना वाटतं माझ्या आयुष्यात कोणत्याही राजकुमाराची मला गरज नाही, माझी स्वप्न मी पूर्ण करू शकते.

आजकाल अनेक तरुण-तरुणी सिंगल राहणं पसंत करत आहेत. पूर्वी सिंगल असणं म्हणजे काहीतरी कमी आहे असं समजलं जायचं. किंवा अपयश मानलं जायचं. पण आता तसं नाहीये. लोक अजूनही प्रेमात पडतात आणि रिलेशनशिपमध्ये येतात, पण जेन झी पिढीला प्रेम नैसर्गिकरित्या घडावं असं वाटतं. कुणाच्या दबावाखाली येऊन किंवा एकटेपणाच्या भीतीने त्यांना नात्यांमध्ये पडायचं नाहीये. मिळेल त्या व्यक्तीसोबत नातं जोडण्याऐवजी, त्यांना खरं आणि प्रामाणिक प्रेम हवं आहे.

डेटिंगमध्येही नवीन ट्रेंड्स

आजकाल ‘NATO’ – Not Attached To Outcome डेटिंगसारखे नवीन ट्रेंड्स आले आहेत. याचा अर्थ असा की कोणाशीही भेटणं, बोलणं हे केवळ अनुभवासाठी असतं. त्यांना लगेच रिलेशनशिपमध्ये यायची घाई नसते.

भावनात्मक समजूतदारपणा आणि खरेपणा

जेन झी पिढीला हे समजलं आहे की, दुसऱ्याशी नातं जोडण्याआधी स्वतःला समजणं आणि स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःची ओळख आणि अस्तित्व दुसऱ्यासाठी पूर्णपणे सोडून न देणं हे देखील तितकंच महत्वाच आहे.

आपण माणसं आहोत, खेळणी नाही की कोणीतरी कंटाळा आला की उचलून घ्यावं आणि मन भरल्यावर फेकून द्यावं. आपल्या भावना इतक्या स्वस्त नाहीत की कोणीही आलं आणि आपण त्यात लगेच गुंतवणूक करावी. तर , योग्य वेळ येईपर्यंत सिंगल राहणे म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तर आपण आयुष्यात यशस्वी झालो पाहिजे यावर ठाम असणे महत्वाचं आहे.

हेही वाचा: जनरेशन बीटा : शिक्षण घेण्याची नवी पद्धत, शाळा तयार आहेत का?

प्रेम म्हणजे फक्त गुलाबी स्वप्न नाही

जेन झी पिढीने अनेक भावनिक वादळं पाहिली आहेत. अपूर्ण नातेसंबंध, ब्रेकअप्स, फसवणूक, भावनिक शोषण. त्यामुळे ते इतके सजग झाले आहेत की आता त्यांना प्रेम फक्त ‘फील गुड’ अनुभव म्हणून नको आहे. त्यांना प्रेमात प्रामाणिकपणा, चांगला संवाद आणि मानसिक समजुतदारपणा हवा आहे.

जेव्हा सगळं जग धावपळीमध्ये आहे, तेव्हा Gen Z पिढी शांतपणे स्वतःचा शोध घेत आहे. प्रेमाच्या नावाखाली आपलं मानसिक स्वास्थ्य गमवण्यापेक्षा ते एकांत आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग निवडत आहेत.

आजची पिढी फार स्पष्ट बोलते. त्यांना काहीही आपल्या पार्टनर पासून लपवायचं नाही. ‘कोणीतरी मला ठीक करेल, समजावेल’ ही कल्पना त्यांना चुकीची वाटते. त्यांना असं नातं हवं आहे, जिथे दोघंही एकमेकांच्या साथीने पुढे जातील, यशस्वी होतील, एकमेकांच्या स्वाभिमानाचा सन्मान करतील.

Gen Z चं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःशी नातं तयार केलं आहे. ही पिढी नात्यांपासून पळत नाही ते फक्त जबाबदारीने आणि सजगपणे निर्णय घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ