अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष केवळ नामधारी नाही! 5 नोव्हेंबर : अमेरिका निवडणूक

US Election: अमेरिकेचे उपाध्यक्षपद हे परंपरेनुसार राजकारणातील कमी महत्वाचे पद मानले जाते. अनेकांनी उपाध्यक्षाचे कार्य मुख्यत्वे अध्यक्षांना मानसिक आधार देणे आणि अंत्यसंस्कारांमध्ये उपस्थित राहणे एवढेच असल्याचे म्हटले आहे. मात्र, काळ बदलत असताना उपाध्यक्षपदाचे महत्त्व वाढले आहे.
[gspeech type=button]

मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील नागरिक त्यांच्या देशाचा पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस ( Kamala Harris) यांच्यात अटितटिची लढत होणार आहे. याबरोबरच, देशाला त्यांचा 50 वा उपाध्यक्ष देखील मिळेल. रिपब्लिकन पक्षाचे ( JD Vance ) जे डी व्हान्स किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचे ( Tim Walls ) टिम वॉल्स या दोन उमेदवारांपैकी एक जण उपाध्यक्षपदी निवडला जाईल.

उपाध्यक्षपदाचे महत्त्व

अमेरिकेचे उपाध्यक्षपद हे परंपरेनुसार राजकारणातील कमी महत्वाचे पद मानले जाते. अनेकांनी उपाध्यक्षाचे कार्य मुख्यत्वे अध्यक्षांना मानसिक आधार देणे आणि अंत्यसंस्कारांमध्ये उपस्थित राहणे एवढेच असल्याचे म्हटले आहे. मात्र, काळ बदलत असताना उपाध्यक्षपदाचे महत्त्व वाढले आहे. अमेरिकेच्या संविधानानुसार उपाध्यक्ष पदासाठी तीन मुख्य गोष्टी असणं आवश्यक आहे.

– वय किमान 35 वर्षे असावे.

– अमेरिकन नागरिकत्व

– देशात किमान 14 वर्षे राहिलेले असावेत.

आता, अमेरिकेचे उपाध्यक्षांना नेमके काय करावे लागेल, ते पाहूया.

अमेरिकन संविधान हे जवळपास 237 वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे. या मध्ये उपाध्यक्षाच्या भूमिकेचा उल्लेख केवळ काही वेळा करण्यात आला आहे. उपाध्यक्ष हा अध्यक्षानंतरचा दुसरा क्रमांकाचा नेता आहे. अध्यक्षांचा मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोग या तीन परिस्थितीत त्यांची जागा घेण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे. आतापर्यंत आठ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदावर असताना मृत्यूमुखी पडले आहेत. तर एका अध्यक्षाने, रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला होता. यामुळे तत्कालीन उपाध्यक्षांना व्हाइट हाऊसचं नियंत्रण मिळालं होतं.

अमेरिकेचा उपाध्यक्ष हा यूएस सिनेटचा अध्यक्ष देखील असतो. पण संविधानानुसार, त्यांना चर्चांमध्ये भाग घेता येत नाही. त्यांना सभागृहात मतदानाचा अधिकारही नसतो. मात्र, जर दोन्ही मुद्द्यांच्या बाजूनं समान मत पडली तर, त्यांना निर्णायक मतदान करणे बंधनकारक असते. मागील डिसेंबरमध्ये कमला हॅरिस यांनी यूएस सिनेटमध्ये सर्वाधिक टायस तोडण्याचा नवा विक्रम केला आहे.

उपाध्यक्षांना सिनेटच्या अधिवेशनांमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहणे आवश्यक असते. पण 20 व्या शतकाच्या मध्यापासून या प्रथेत बदल झाला आहे. आधुनिक काळात, उपाध्यक्ष सिनेटमध्ये कमी वेळ घालवतात. यामुळे बहुमत पक्षातील वरिष्ठ सदस्यांना उपाध्यक्षपदाची भूमिका पार पाडण्याची संधी मिळते. तंत्रज्ञान, माहिती आणि राजकारणाच्या बदललेल्या स्वरूपामुळे उपाध्यक्ष आता इतर महत्त्वाच्या कार्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करतात, जसे की अध्यक्षांना सल्ला देणे.

उपाध्यक्षांना दोन मुख्य कामांव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचे काम करावं लागते ते म्हणजे अध्यक्ष निवडणुकीनंतर मतदानांची मोजणी करणे आणि त्याचबरोबर, पुढील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची घोषणा करणे.

उपाध्यक्षाची भूमिका सुरुवातीला लहान होती, पण हळूहळू ती वाढली आहे. उदाहरणार्थ, वॉटर मोंडेल 1977 ते 1981 दरम्यान उपाध्यक्ष होते, त्यांना जिमी कार्टरने व्हाइट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये स्वतःचे कार्यालय दिले. यापूर्वी, उपाध्यक्षांना व्हाइट हाऊसच्या समोरच्या इमारतीत काम करावे लागत होते. काही उपाध्यक्षांनी त्यांच्या भूमिकेने या पदाला नवीन पातळीवर नेले आहे. डिक चेन्यी हे अमेरिकन इतिहासातील सर्वात शक्तिशाली उपाध्यक्षांपैकी एक मानले जातात.

11 सप्टेंबर 2001 रोजी, अल-कायदा दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण केले. त्या वेळी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना सुरक्षित स्थळी हलवले गेले. तेव्हा चेन्यी यांना महत्त्वाचा निर्णय घेणं आवश्यक होते. त्यांनी बंकरमधून, कोणतेही विमान हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पाडण्याचा आदेश दिला होता. पण सुदैवाने तो आदेश लागू करावा लागला नाही, पण यामुळे चेन्यी यांची भूमिका किती महत्त्वाची होती, हे स्पष्ट झाले.

आधुनिक काळात, डोनाल्ड ट्रम्प यांचे उपाध्यक्ष माइक पेंसन यांनी अमेरिकी राजकारणाच्या इतिहासातील एक मोठा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये, हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हने पेंसकडे ट्रम्पला शक्तीमुक्त करण्याचा आदेश दिला, पण पेंस ट्रम्पचा विश्वासू साथीदार असल्यामुळे हा निर्णय घेतला नाही.

उपाध्यक्षांच्या कार्यकाळावर कोणतीही निश्चित मर्यादा नसते. त्यामुळे त्यांच्या महत्त्वात वाढ झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये उपाध्यक्ष कोण असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल—टिम वॉल्स की जे.डी. व्हान्स?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India - America Trade Deal : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत संपत
The Caduceus symbol: जिथे कुठे डॉक्टर किंवा हॉस्पिटल असतं, तिथे आपण दोन साप आणि पंख असलेलं चिन्ह पाहतो. पण खरी
America Tariff on iPhone : ट्रम्पने एक पाऊल पुढे जात अमेरिकेतल्या उत्पादन क्षेत्राची वृद्धी व्हावी म्हणून अनेक मोबाईल कंपन्यांना अमेरिकेमध्ये

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ