#WomenInMaleFields हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेत.

WomenInMaleFields : सोशल मीडियावर सध्या एक नवीन ट्रेंड चर्चेत आहे.महिलांचे अनुभव उलगडवून दाखवताना, या ट्रेंडमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे: "जर महिलांनी हेच वर्तन पुरुषांसोबत केले असते, तर समाजाची प्रतिक्रिया काय असती?"
[gspeech type=button]

सोशल मीडियावर सध्या एक नवीन ट्रेंड चर्चेत आहे, यामध्ये महिलांनी पुरुषांसोबत डेट करत असताना सहन केलेली वाईट वागणूक, टॉक्सिक रिलेशनशिप्स आणि पुरुषांद्वारे केलेल्या छेडछाड, फसवणूक, आणि इतर गैरवर्तनाबद्दल त्यांचे विचार शेअर केले आहेत. महिलांचे अनुभव उलगडवून दाखवताना, या ट्रेंडमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे: “जर महिलांनी हेच वर्तन पुरुषांसोबत केले असते, तर समाजाची प्रतिक्रिया काय असती?”

हा ट्रेंड महिलांचे विविध अनुभव समोर आणत आहे. आदिम काळापासून प्रत्यक्ष आयुष्यात पुरूष कसाही वाईट वागला तरी ते सहन करावं लागतं आणि केलंही जातं. हा त्याचा ‘पुरुषार्थ’ समजला जातो. पण जरा एखाद्या महिलेनं केलं तर मात्र चरित्रहीन, बदफैली ते पाप-पुण्यापर्यंतचा संबंध जोडला जातो.

एका नवीन डेटिंग ट्रेंडने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. महिला क्रिएटर्स #WomenInMaleFields हॅशटॅग वापरून अशा व्हिडीओज पोस्ट करत आहेत, ज्यात पुरुषांची भूमिका उलट करून दाखवली जाते. या व्हिडीओंमध्ये पुरुषांद्वारे महिलांसोबत केलं जाणारं वाईट वर्तन उदाहरणार्थ फसवणूक , सासरच्या लोकांचा त्रास, छेडछाड आणि छळ या गोष्टी हायलाइट करून दाखवल्या जात आहेत.या व्हिडीओंमध्ये कल्पना केली जाते की, जर महिलाही पुरुषांप्रमाणे वागल्या तर काय झालं असतं? यामध्ये दाखवले जाते की, पुरुष अनेक वेळा आपल्या वाईट वर्तनाचे समर्थन करत असतात, खरंतर त्याऐवजी त्यांनी आपल्या पार्टनरला मदत करायला हवी.

अनेक महिलांनी गंमतीशीर पद्धतीने रिॲलिटी दाखवलेल्या या व्हिडिओजचे कौतुक करत हा ट्रेंड व्हायरल होत आहे. पण या भूमिकांच्या उलटसुलट प्रतिक्रियांमुळे पुरुष मात्र चिडले आहेत.

इंस्टाग्रामवर #WomenInMaleFields या  हॅशटॅगसह युजर्स त्यांच्या रील्स शेअर करत आहेत.

या रीलस्मध्ये, युजर्सनी यशस्वी आणि करिअर-ओरिएंटेड महिलांना कोणत्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागत हे हायलाइट  केलं आहे. अनेकदा, त्यांच्या  यशावर  हसले जाते आणि खिल्ली उडवली जाते किंवा त्यांना त्यांच्या यशापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, निराधार आरोपांना सामोरे जावे लागते. आजही अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी असमानतेचा सामना करावा लागतो. त्यांना अनेक प्रकारच्या भेदभावामुळे संधी नाकारण्यात येतात.

घटस्फोट आणि वेगळे होणं हे दोघांसाठीही खूप दुःखदायक  असतं. घटस्फोटीत दाम्पत्याला अपत्य असल्यावर बहुतेकदा मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी आईकडे जाते. यामुळे तिला भावनिक, मानसिक त्रासासोबतच  मुलांची देखभाल करण्याचे आव्हानही स्वीकारावं लागतं. घटस्फोटीत महिलांना समाजातून अनेकदा टीका आणि निंदा सहन करावी लागते. अनेकदा, त्यांना मिळणारी पोटगी यावरूनही त्यांच्यावर टीका केली जाते.

त्यामुळे, हा ट्रेंड जसजसा सर्वांपर्यंत पोहचत आहे, लोकप्रिय होत आहे. हा ट्रेंड पुरुषांसाठी वेक-अप कॉल म्हणून देखील काम करतोय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025
Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला
Denmark Book Tax Free : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील विक्री कर रद्द केला आहे. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये पुस्तकांवर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ