‘WWW.’ या संशोधनाला मानाचा मुजरा देणारा ‘जागतिक वेब दिवस’

World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड वेब दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड वाईड वेब 2025 साठी ‘भविष्याचे सशक्तीकरण एक समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे’ अशी थीम ठरवली आहे.
[gspeech type=button]

इंटरनेटमध्ये कोणत्याही सर्च इंजिनवर एखादी वेबसाईट शोधायची असेल तर आपण पहिले तीन इंग्रजी अक्षरं टाईप करतो ती म्हणजे WWW. वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web) या इंग्रजी शब्दांचं हे लघूरुप. हे तीन शब्द टाईप केल्याशिवाय कोणतीच वेबपेज उघडू शकत नाही. सर्च इंजिनच्या मदतीने इंटरनेटवरुन आपल्याला कोणत्याही प्रकारची आणि कितीही प्रमाणात माहिती मिळू शकते. पण ही जी सगळी माहिती इंटरनेटवर वेगवेगळ्या वेब पेजवर अपलोड केली आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, वेबपेज उघडण्यासाठी या WWW या लघुरूपाची गरज असतेच. 

इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड वेब दिवस साजरा केला जातो. 

वर्ल्ड वाईड वेबचा जन्म कसा झाला?

1989 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबचा शोध लावला. 1991 मध्ये जागतिक पातळीवर याचा वापर केला जाऊ लागला. तिथूनच पुढे डिजिटल क्रांतीची सुरूवात झाली. टप्प्याटप्याने या वेब पेजमध्ये बदल घडत गेले. सुरूवातीला संगणकाच्या विशेष भाषेत केवळ मजकूर दाखवणारे पानं होती. पुढे मल्टीमीडिया आणि दोन्ही बाजूंनी संवाद साधता येतील असे पेजेस तयार केली जाऊ लागली. त्यानंतर सर्च इंजिनचा शोध लागला. हळूहळू सोशल मीडियाच्या एक एक प्लॅटफॉर्मचा उदय होत गेला. आणि आता तर संगणक, लॅपटॉप शिवाय थेट मोबाईलवर या वेबपेजचा वापर करता येऊ लागला. 

जसजशी डिजिटल क्रांतीचा वेग वाढत गेला त्यानुसार वापरकर्त्यांनाही वर्ल्ड वाईड वेब वर आपापली पेजेस सुरू करता येऊ लागली. यातून पुढे ई-कॉमर्स हे नवीन क्षेत्र सुरू झालं. 

आज संवाद साधण्यासाठी एक माध्यम, माहितीची उपलब्धता आणि वेबद्वारे आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत. 

हे ही वाचा : इंटरनेट गरज की व्यसन

वर्ल्ड वाइड वेब 2025 ची संकल्पना

वर्ल्ड वाईड वेब 2025 साठी ‘भविष्याचे सशक्तीकरण एक समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे’ अशी थीम ठरवली आहे. वेब, हे इंटरनेटचं जाळं सगळ्यांसाठी आहे आणि ते सोप्या पद्धतीने सगळ्यांना वापरण्यासाठी मिळावं, जगाच्या प्रगतीमध्ये ते एक सक्षम साधन असावं असा या संकल्पनेमागचा उद्देश आहे. आज जगात इंटरनेटचे अब्जावधी वापरकर्ते असले तरिही अजूनही काही लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान सक्षमपणे, प्रभावीरित्या पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे जी डिजिटल दरी भरुन काढणे, इंटरनेटचं स्वातंत्र्य राखणं आणि यासोबतच गोपनीयता जपण्याला प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. एआय तंत्रज्ञान, तंत्रज्ञान विक्रेंदीकरण याच्या साहय्याने वेबचा विकास होत असताना त्यामध्ये अधिकाधिक नावीन्यता आणणे आणि सर्वांना सहजपणे ते वापरता येण्याजोगे बदल घडवण्याला प्राधान्य दिलं जात आहे. 

जग व्यापणारं तंत्रज्ञान

वर्ल्ड वाईड वेबने आज संपूर्ण जग व्यापलं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यावरही त्याचा खूप प्रभाव आहे. जगभरात 5.5 अब्जाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. डिजिटल क्रांतीच्या जनजागृतीमुळे आज प्रत्येक क्षेत्र हे इंटरनेटशी जोडलं गेलं आहे. या सगळ्यामध्ये वेब पेजची भूमिका मोठी आहे. वापरकर्त्यांना सुलभपणे, जलदगतीने माहिती उपलब्ध करुन देणे, सेवा पुरविणे ही मुख्य जबाबदारी आहे. या क्रांतीमुळे संपूर्ण जगालाच एक गती प्राप्त झाली आहे. 

वर्ल्ड वाईब वेब निमित्त कार्यशाळा

वेब या क्षेत्राता दिवसेंदिवस प्रगती होत राहावी यासाठी विशेष कार्यशाळाही वल्र्ड वाईब वेब दिनानिमित्त आयोजित केल्या जातात. यामध्ये वेब डेव्हलपमेंट बूटकॅम्पमध्ये नवीन आणि इच्छुक सहभागीतांसाठी HTML, CSS आणि JavaScript सारखे वेब डेव्हलपमेंट विषय शिकवले जातात. सोप्या पद्धतीने वेब पेजेस कसे विकसीत करायचे आणि वेबपेज विकसीत करताना एआयचा जबाबदारीने वापर कसा याविषयी प्रशिक्षण दिलं जाते. डिजिटल साक्षरता कार्यशाळांच्या माध्यमातून गोपनीयता राखण्यासाठी (Users Privacy) आवश्यक ते कौशल्य वाढवण्यावर भर देणं.  समाजातील दुर्बल घटकातील तरुणांनाही या विषयात रूची असेल तर त्यांनाही या अंतर्गत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं. असे अनेक उपक्रम या दिनानिमित्ता आयोजित केले जातात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
Trump's tariff attack on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर 'टॅरिफ किंग' असल्याचा आरोप करत 30

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ