जगातले अप्रतिम कला संग्राहलये

Art Museum Buildings : जगातल्या सहा संग्रहालयातील वस्तूंप्रमाणे त्यांच्या इमारतीही तितक्याच आकर्षक आहेत. या सहा इमारती आपल्याला मोहात पाडतात. या प्रत्येक वास्तूमागे काहिना काही कथा आहेत. तर पाहूयात जगातली मनमोहक संग्रहालयं कुठे आणि कोणती आहेत. 
[gspeech type=button]

संग्रह हा अशा गोष्टींचा केला जातो ज्या की खूप महत्त्वाच्या असतात किंवा ज्या जगात दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. अनेकदा आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या वस्तूंचाही संग्रह करत असतो. एकूणच वस्तूंचा, आठवणींचा आणि मौल्यवान वस्तूंचा संग्रह हा पुढच्या पिढीसाठी चांगल्या पद्धतीने जतन करणं आवश्यक असतो. त्या-त्या संग्रहालयाच्या वस्तूंप्रमाणे त्यांच्या इमारतीही तितक्याच आकर्षक असतील तर.. जगामध्ये अशा सहा संग्रहालयाच्या वास्तू आहेत ज्या आपल्याला मोहात पाडतात. या प्रत्येक वास्तूमागे काहिना काही कथा आहेत. तर पाहूयात जगातली मनमोहक संग्रहालयं कुठे आणि कोणती आहेत. 

ए4 आर्ट संग्रहालय, चेंगडू, चायना

चीन मधल्या लक्सटाऊन जिल्ह्यातल्या टस्कनी निमशहरी भागात ए4 आर्ट संग्रहालय आहे. टस्कनी हे शहर डोंगराळ भागात वसलेलं आहे.  इथली घरं, चर्च आणि कंट्री क्लबची रचना खूप विलोभनीय आहे. या शहराच्या रचनेत आपलं लक्ष वेधून घेते ती मध्यभागी कोपऱ्यावर असलेली ए4 आर्ट संग्रहालयची इमारत. फ्लोरेंनटाइन वास्तूकलेमधल्या या इमारतीमध्ये आपल्याला मध्ययुगीन वास्तूकलेचं दर्शन घडतं. मात्र, या वास्तूच्या लांब, उंच एखाद्या भौमितीक आकृतीसारख्या असलेल्या खिडक्यामध्ये आपल्याला मॉर्डन वास्तूकला सुद्धा पाहता येते. 

या वास्तूकलेच्या आत तीन मजले होतील एवढी जागा प्रशस्तरित्या पूर्ण मोकळी, रिकामी ठेवली आहे. तर भूमिगत दोन मजल्यांची बांधणी केली आहे. ज्यामध्ये वेगवेगळी प्रदर्शनं भरवली जातात. या संपूर्ण वास्तूच्या रचनेत जुन्या आणि नवीन वास्तूकलेचा जो मेळ घातला आहे तो कलारसिकांना आकर्षून घेतो. 

ग्रँड इजिप्शियन संग्रहालय, गीझा, इजिप्त

इजिप्तमधलं गीझामधील ग्रँड इजिप्शियन संग्रहालय हा सुद्धा वास्तूचा उत्कृष्ट नमुना आहे. ही संपूर्ण वास्तू ही पिरामिडच्या रचनेत उभी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच संग्रहालयाच्या बाजूला इजिप्त मधले ती प्रसिद्ध पिरामिड्स आहेत. त्यामुळे जगविख्यात पिरामिडच्या बाजूला त्याच रुपात उभं केलेलं हे संग्रहालय खूप छान दिसतं. 

ही वास्तू पाहिल्यावर त्याचं प्रवेशद्वारंच आपलं लक्ष वेधून घेतं. अतिशय मोठ्या पिरामिडच्या भौगोलिक रचनेमध्ये हे प्रवेशद्वारं उभं केलं आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच समोर इजिप्तमधले प्रख्यात वास्तूविशारद रामसेन दुसरे यांच्या भव्य पुतळ्या पाहायला मिळतो. या संपूर्ण वास्तुच्या रचनेमुळे सुर्यकिरणांच्या थेट प्रकाशात हा पुतळा उजळतो. या संग्रहालयात वेगवेगळी अशा ऐतिहासिक 1 लाख पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. 

हे संग्रहालय उभं करण्यासाठी तब्बल 20 वर्ष लागली. या संग्रहालयाच्या परिसरातल्या बागांची रचना सुद्धा पिरॅमीडसारखीच केलेली आहे. या संग्रहालयाच्या अगदी वरच्या मजल्यावर गेल्यावर तिथून आपल्याला तिथला संपूर्ण परिसर आणि इजिप्त मधले सुप्रसिध्द तीन पिरामिड्स सुद्धा पाहायला मिळतात. 

हे ही वाचा : तुर्की आणि अझरबैझानला पर्याय आहेत हे 9 सुंदर देश!

स्मृतीवन भूकंप संग्रहालय, कच्छ गुजरात

गुजरातमधल्या कच्छ इथे 2001 साली आलेल्या भूकंपामध्ये मृत पावलेल्या बांधवांच्या आठवणीत कच्छमध्येच स्मृतीवन या भूकंप संग्रहालय स्वरुप स्मारक उभारलं आहे. वास्तू शिल्प संघटनेचे वास्तूविशारद राजीव कठपालिया यांनी ही वास्तू उभी केली आहे. या वास्तूसाठी वाळूच्या रंगाच्या दगडांचा वापर केला आहे. ही वास्तू डोंगराच्या उतारावर आहे. टप्प्या-टप्प्याने रचलेली ही वास्तू नागमोडी वळणांनी जोडलेली आहे. 

कच्छ मधल्या या भूकंपामध्ये 12,932 लोकांचा मृत्यू झाला होता. या सर्व मृत पावलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ राजीव कठपालिया यांनी या परिसरात 12,932  झाडं लावली आहेत. 

या वास्तूमध्ये सात ब्लॉक्स केले आहेत. या ब्लॉक्सची नावं रिबर्थ, रिडिस्कव्हर, रिस्टोर, रिबिल्ड, रिथिंक, रिलिव्ह आणि रिन्यू असं ठेवलं आहे. 

भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत नेमकं काय घडलं, आणि त्यातून पुन्हा नव्याने उभारणी कशी घेतली या संदर्भातल्या घटना, माहिती वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून दाखवल्या जातात. 

सिमोस कला संग्रहालय, हिरोशिमा, जपान

जपानचं सिमोस आर्ट म्युझियम हे पाहताक्षणी आपल्याला कंटेनर हाऊस आहे की काय असं वाटेल. सेतो बेटाच्या किनाऱ्यावर हे संग्रहायल आहे. याची रचना वास्तूविशारद शिंगरु बन यांनी केली आहे. हे संग्रहालय काचेचं असून यात वेगवेगळे आठ रंग आहेत. रात्रीच्या वेळी हे संग्रहालय चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघतं. तर दिवसा या संग्रहालयावर निसर्गातल्या वेगवेगळ्या वस्तूचं प्रतिबिंब पाहायला मिळते.  

या संग्रहालयामध्ये फ्रेंच आर्ट नोव्यू काच कलाकार एमिल गॅले, मॅटिस आणि चागल या कलाकारांच्या कलाकृती आणि जपानी बाहुल्यांचा संग्रह पाहायला मिळतो. 

पॅलेइस हेट लू अपेलडोर्न, द नेदरलॅड्स

पॅलेइस हेट लू हे 17 शतकातल्या नेदरलँड मधल्या राजवाड्याचं रुपांतर केलेलंं हे संग्रहालय आहे.  राजवाड्याच्या भव्यतेला संग्रहालयाचं आधुनिक रुप दिलेलं आहे. संस्कृती, भव्यता आणि आधुनिकता या संग्रहालयात पाहायला मिळते. राजवाड्याच्या परिसरातल्या बागेत हायड्रोलिक पद्धतीचा सिंचनासाठी वापर केला जातो. तत्कालीन डच राजघराण्यांच्या वास्तू या संग्रहालयात जतन केल्या आहेत. 

ओमान अ‍ॅक्रॉस एजेस म्युझियम, मनह, ओमान

ओमान अ‍ॅक्रॉस एजेस संग्रहालय हे ओमानचं राष्ट्रीय संग्रहालय आहे. ओमानची प्राचीन राजधानी निझवा जवळच्या मानह इथल्या अल हजार पर्वतावरच्या सपाट भूभागावर हे संग्रहालय उभं केलं आहे. या वास्तूच्या दर्शनी भाग हा खूप आकर्षक आहे. जमिनीपासून एक टोक आकाशाच्या दिशेला जाऊन ते मुख्य वास्तूला जोडलं जातं. ते खूप भव्य रुपात आणि संपूर्ण श्वेत- पांढऱ्या रंगात असल्यामुळे त्यांची भव्यता आकर्षून घेते. या संग्रहालयाच्या रुपात ओमानमधल्या इतिहासाचं, समृद्धीचं जतन केलं आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ