Year 2024 : बराक ओबामा फेव्हरेट मूव्हीजमध्ये भारतीय सिनेमाला प्रथम स्थान

Barak Obama : बराक ओबाना यांनी यावर्षात पाहिलेल्या सिनेमा आणि वाचलेल्या पुस्तकांपैकी त्यांना आवडलेल्या साहित्यांची यादी त्यांनी आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर केली आहे.
[gspeech type=button]

2024 या वर्षात अनेक सिनेमा प्रदर्शित झाले. दरवर्षी असे काही ठरावीक सिनेमा येतात जे आपण एकमेकांना आवर्जून पाहायला सांगतो. अशाच काही सिनेमांची यादीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी जगभरातल्या त्यांना आवडलेल्या दहा सिनेमांची यादी दिली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव हे भारतीय सिनेमाचं आहे. या यादीवर त्यांची ‘बराक ओबामाज् फेव्हरेट मूव्हीज ऑफ 2024 असं टायटल दिलं आहे. 

बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचं राजकारणासोबत मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडीवर बारीक लक्ष असतं. त्यांचं स्वत:च हायर ग्राउंड नावाचं प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसमधून त्यांनी अमेरिकन फॅक्टरी नावाची डॉक्यूमेंटरी प्रदर्शित केली आहे. या डॉक्यूमेंटरीला अॅकॅडमी अवॉर्डने पुरस्कृत केलं आहे. तसचं त्यांची मुलगी मालिया ही सुद्धा फिल्ममेंकिग क्षेत्रात करिअर करत आहे. 

सिनेमा सोबतच बराक ओबाना यांनी यावर्षात वाचून पूर्ण केलेले आणि त्यांना आवडलेल्या दहा पुस्तकांची नावंही आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहेत.  

ऑल वी इमेजिंन ॲज लाइट

‘ऑल वी इमेजिंन ॲज लाइट’ हा पायल कपाडीया यांनी दिग्दर्शित केलेला भारतीय सिनेमा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी 2024 सालामध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये हा सिनेमा आवडला आहे. आणि त्यांनी हा सिनेमा इतरांनाही पाहण्यासाठी सुचवलेला आहे. 

या सिनेमामध्ये मुंबईतल्या तीन स्त्रियांचं आयुष्य दाखवलं आहे. त्यांच्या अपेक्षा, गरजा आणि नातेसंबंध कशा पद्धतीचं आहे याचं चित्रण या सिनेमामध्ये केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला यंदा 77 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स अवॉर्डने गौरविलं आहे.

कॉन्क्लेव्ह 

अमेरिकन दिग्दर्शक एडवर्ड बर्गर यांनी दिग्दर्शित केलेला कॉन्क्लेव्ह हा सस्पेन्स थ्रीलर सिनेमाही ओबामा यांचा आवडता सिनेमा ठरलेला आहे. या सिनेमामध्ये  नवीन होऊ घातलेल्या पोपचा शोध घेताना घडलेल्या वेगवेगळ्या घटना, प्रवास चित्रित केलेला आहे. यामध्ये राल्फ फिएनेस, स्टॅनली टुसी, जॉन लिटगो हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

द पियानो लेसन

‘द पियानो लेसन’ हा सुद्धा अमेरिकन सिनेमा आहे. या सिनेमामध्ये एका कुटुंब हे आपल्या पूर्वजांचा  वारसा असलेल्या पियानोचं काय करायचं हे ठरवतं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन माल्कम वॉशिंग्टन यांनी केलं आहे. 

द प्रॉमिस्ड लँड

‘द प्रॉमिस्ड लँड’ हा एका सैन्याच्या आयुष्यावर आधारित असलेला डॅनिश भाषेतला सिनेमा आहे. या सिनेमामध्ये कशा पद्धतीने एका सैनिकाने नविन भूभाग कशा पद्धतीने शोधून काढून त्यावर डेन्मार्कचं वाइल्ड जटलँड निर्माण केलं याची कथा या सिनेमातून मांडली आहे. निकोलज अर्सेल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

द सीड ऑफ द सेक्रेड फीग

हा एक इराणीयन क्राइम सिनेमा आहे. तेहरानमधल्या राजकीय अस्थिरता आणि अशांततेमुळे एका तपास अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींवर आधारित हा सिनेमा आहे. मोहम्मद रूसोल्फ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

ड्यून – 2

ड्यून पार्ट 2 हा अमेरिकन सायन्स फिक्शन आहे. अवकाशात असलेल्या कैटुंबिक मौल्यवान संपत्तीवर देखरेख कशी ठेवायची यावरुन एका कुटुंबामध्ये वाद सुरू आहे. तर त्याच कुटुंबात पुढच्या पिढी ही अंधकारमयभविष्याबद्दल चिंतीत आहे. असं एकाच ठिकाणी परस्परविरोधी घटनाचं चित्रण या काल्पनिक सिनेमामध्ये केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमामध्ये भारतीय कलाकार तब्बू हिने भूमिका सादर केली आहे. 

अनोरा 

अनोरा हा अमेरिकन सिनेमा असून यामध्ये ब्रुकलिनमधल्या एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणिची कथा दाखवली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या हा तरुणींने रशियातील एका अब्जावधी माणसांच्या मुलाशी लग्न केल्यावर तिच्या आयुष्यात काय काय उलथापालथ झाली हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. सीन बेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून मिकी मॅडीसन मुख्य भूमिकेत आहे. 

दिदी

दिदी हा अमेरिकन कॉमेडी सिनेमा आहे. हा सिनेमा इंग्लिश आणि मॅडरिन अशा दोन मिक्स भाषांमधला सिनेमा आहे. यामध्ये कॅलिफॉर्निया येथे स्थलांतर झालेल्या तैवान कुटुंबियांची कथा दाखवण्यात आली आहे. सीन वांग यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

शूगरकॅन

शूगरकॅन हा कॅनेडियन इन्वेस्टिगेशन डॉक्यूमेंटरी आहे.  यामध्ये  कॅनेडियन – इंडियन निवासी शाळांमधील हरवलेल्या मुलांचा शोध घेणारा प्रवास या सिनेमामधून दाखवण्यात आला आहे. ज्यूलियन ब्रेव्ह नॉइसकॅट आणि एमिली कॅस्सी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

अ कम्प्लिट अननोन

अमेरिकन संगीतकार बॉब डायलॉन यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही अ कम्प्लिट अननोन बायोपीक आहे. यामध्ये बॉब डायलॉन यांच्या जीवनाचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण
Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ