YouTube चा क्लिकबेट व्हिडिओवर कारवाई करण्याचा निर्णय

YouTube: ब्रेकिंग न्यूज किंवा सध्याच्या घडामोडीशी संबंधित घटनांचे, प्रेक्षकांना गोंधळात टाकणाऱ्या शीर्षक असलेल्या व्हिडिओंवर YouTube ने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
[gspeech type=button]

YouTube ने भारतीय कंटेंट क्रिएटर्ससाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गोंधळात टाकणारे, खोटी माहिती असलेली शीर्षकं आणि थंबनेल्स असणाऱ्या व्हिडिओंवर YouTube आता कारवाई करणार आहे. अशा प्रकारचे थंबनेल असलेले व्हिडिओ आता यूट्यूबवरून काढून टाकले जाणार आहेत.

व्हिडिओच्या शीर्षक किंवा थंबनेलमधून प्रेक्षकांना काहीतरी माहिती देणे आवश्यक आहे. माहिती न देणारा व्हिडिओ हा ‘अति क्लिकबेट कंटेंट’ म्हणून गणला जातो. हे व्हिडिओ प्रेक्षकांची फसवणूक, दिशाभूल करणारे असतात, असे यूट्यूबने म्हटले आहे.

ब्रेकिंग न्यूज किंवा सध्याच्या घडामोडीशी संबंधित घटनांचे, प्रेक्षकांना गोंधळात टाकणाऱ्या शीर्षक असलेल्या व्हिडिओंवर YouTube ने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या थंबनेलवर कारवाई होणार?

YouTube ने सांगितलं आहे की, लोकांना घाबरवणारे व्हिडियो किंवा खूप मोठा फायदा होईल असं भासवणारे व्हिडिओ पण प्रत्यक्षात त्यात तसं काही नसतं, अशा प्रकारच्या व्हिडियोंवर कारवाई होईल.

उदाहरणार्थ : जर एखाद्या व्हिडिओचं शीर्षक ‘अध्यक्षांनी राजीनामा दिला!’ किंवा ‘सर्वात मोठी राजकीय बातमी’ असेल, पण व्हिडिओमध्ये मात्र वेगळाच कंटेंट असेल किंवा तशी कोणतीच बातमी नसेल, तर तो क्लिकबेट मानला जाईल.

क्लिकबेट काय आहे?

क्लिकबेट म्हणजे एखाद्या व्हिडिओचे शीर्षक किंवा थंबनेल इतकं आकर्षक असतं की, आपण त्यावर लगेच

क्लिक करून बघतो. पण व्हिडिओमध्ये तसं काही नसतं. खरंतर यामध्ये भ्रामक माहिती आणि आकर्षक शब्द वापरले जातात. क्लिकबेटचा उद्देश लोकांना आपल्या व्हिडिओवर क्लिक करायला लावून पैसे कमवणे किंवा लोकप्रियता मिळवणे हा असतो. परंतु क्लिकबेटमुळे युजर्सना चुकीची माहिती मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ