ज्या देशांमध्ये सरकार लोकांच्या पगारातूनही टॅक्स घेते, तिथे राहणाऱ्या लोकांना असं वाटू शकतं की टॅक्सशिवाय देश कसा चालेल? पण खरंच असे देश आहेत, जिथं इन्कम टॅक्स नाही. म्हणजे लोकांना त्यांच्या कमाईतून सरकारला काही पैसे द्यावे लागत नाहीत.
मग सरकारला पैसे कसे मिळतात? तर, या देशांमध्ये इतर प्रकारचे टॅक्स असतात. जसे की वस्तू विकत घेतल्यावर किंवा इतर सेवा वापरल्यावर. म्हणजे, इतर मार्गांनी सरकारला पैसे मिळतात आणि देश चालतो.
इन्कम टॅक्स नाही, मग सरकारला पैसे कुठून मिळतात?
तुम्ही म्हणाल, इथं लोकांना पगार मिळाला तर त्यावर टॅक्स लागतो. मग इथे काय? तर, काही देशांमध्ये ‘व्हॅट’ नावाचा टॅक्स असतो. म्हणजे, कोणतीही वस्तू विकत घेतली किंवा सेवा वापरली, तर त्यावर थोडा टॅक्स लागतो. जमीन आणि मालमत्तेवरही टॅक्स असतो. बाहेरून वस्तू मागवल्या तर त्यावर टॅक्स लागतो. काही देशांमध्ये, ‘कसिनो’सारख्या काही खास उद्योगांवर जास्त टॅक्स असतो.
खूप देशांमध्ये नैसर्गिक साधनं असतात, उदा. खनिजतेल. त्यांच्या विक्रीतून सरकारला खूप पैसे मिळतात. काही देश पर्यटनावर अवलंबून असतात. पर्यटन खूप वाढलं की तिथल्या लोकांना रोजगार मिळतो आणि सरकारलाही पैसे मिळतात.
अँटिग्वा आणि बर्म्युडा
या देशामध्ये शून्य आयकर धोरण आहे. कॅरिबियन समुद्रातील ही तीन बेटं आहेत. यामधील दोन बेटांवर लोक राहतात. हा देश पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, इथे इन्कम टॅक्स, संपत्तीवरील कर, वारसा कर किंवा गुंतवणुकीवर कोणताही कर भरावा लागत नाही. इथले पांढरे स्वच्छ समुद्रकिनारे आणि निळं पाणी पर्यटकांचे आकर्षण आहे.या देशाचं 60% उत्पन्न पर्यटनातून येतं , म्हणून सरकारला लोकांकडून कोणताही टॅक्स घेण्याची गरज पडत नाही.
सेंट किट्स आणि नेव्हिस
कॅरिबियन समुद्रातच असलेलं सेंट किट्स आणि नेव्हिस हे आणखी एक बेट आहे जिथे इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, वारसा टॅक्स किंवा गुंतवणुकीवर कोणताही टॅक्स नाही. हा अमेरिका खंडातील सर्वात लहान देश असला तरी, इथला रम्य निसर्ग, संस्कृती आणि शांत जीवनशैली लोकांना खूप आवडते. इथला कॉर्पोरेट कर 33 टक्के, व्हॅट 10 ते 15 टक्के आणि संपत्तीची मालकी कर 0.2 ते 0.3 टक्के आहे.
मोनॅको
मोनॅको हे एक सुंदर आणि आलिशान शहर आहे आणि इथे इन्कम टॅक्स नाही. पण इथं फ्रेंच नागरीकाला राहता येत नाही. इतर कोणत्याही नागरिकाला इथं संपत्ती, गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदीवर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. फक्त घरभाड्यावर 1% टॅक्स लागतो.
बहामास
बहामास हे सुंदर बेट पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे पर्यटन, बँकिंग आणि गुंतवणूक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. इथले नागरिक व्हॅट 0 – 12% मालमत्ता कर आणि स्टॅम्प टॅक्स भरतात. हा देश पश्चिम गोलार्धात आहे आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्त्रोत पर्यटन आहे.
युएई
जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिरातमध्ये वैयक्तिक आयकर आकारला जात नाही. तसेच कॅपिटल गेन्स, वारसा कर, भेटींवरील आणि संपत्तीवर कर आकारला जात नाही. इथे कॉर्पोरेट कर 9 टक्के इतका आहे. जगातील सर्वात कमी कॉर्पोरेट कर आकारणाऱ्या देशांमध्ये युएईचा समावेश होतो.
वनुआटू
या एशियन नेशन्स म्हणजेच समुद्रातील छोट्या छोट्या देशांच्या प्रदेशातील देशामध्येही आयकर आकारला जात नाही. या देशातील कंपन्यांना 20 वर्षांची करसवलत दिली जाते. कंपन्यांकडून वर्षाला केवळ 300 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 26 हजार रुपये वार्षिक फी घेतली जाते.
केमॅन बेटे
हे सुद्धा उत्तर अमेरिकेतली कॅरेबियन देशांपैकी एक बेट आहे. या देशात आयकर आकारला जात नाही. येथे 7.5 टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. मात्र, थे गुंतवणूक करणाऱ्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा नाही.
बहरिन
या देशात आयकर आकारला जात नाही. तसेच इथे केवळ गॅस आणि तेल कंपन्यांकडून 46 टक्के कॉर्पोरेट टॅक्स आकारला जातो. या देशातील व्हॅट 10 टक्के आहे. स्टॅम्प ड्युटीसाठीचा दर 1.7 ते 2 टक्के इतका आहे.
कुवेत
करमुक्त देशांच्या यादीत कुवेतचाही समावेश असून येथे वैयक्तिक उत्पन्न कर आकारला जात नाही. या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे. हा देश जनतेकडून एक रुपयाही टॅक्स आकारत नाही. कुवेतच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा भाग तेल निर्यातीतून येतो, त्यामुळे सरकारला थेट जनतेकडून टॅक्स घेण्याची गरज पडत नाही.
सौदी अरेबिया
सौदीनेदेखील आपल्या नागरिकांना टॅक्सच्या भारातून मुक्त केले आणि प्रत्यक्ष कर रद्द केला आहे. म्हणजे या देशातील लोकांना कितीही कमावलं तरी टॅक्स म्हणून एक रुपयाही द्यावा लागत नाही. मात्र, या देशातही अप्रत्यक्ष कर व्यवस्था मजबूत असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते.