जागतिक न्यूमोनिया दिवस 2024

World Pneumonia Day 2024 : जागतिक न्यूमोनिया दिन (WPD) 12 नोव्हेंबर 2009 पासून साजरा करण्यात येतो. ग्लोबल कोलिशन अगेंस्ट चाइल्ड न्यूमोनिया (GCCP) या संस्थेने ‘स्टॉप न्यूमोनिया’ अंतर्गत हा उपक्रम साजरा करायला सुरुवात केली. जगभरातील लोकांमध्ये न्यूमोनियाबद्दल जागरूकता पसरवणे हा जागतिक न्यूमोनिया दिनाचा उद्देश आहे.
[gspeech type=button]

जागतिक न्यूमोनिया दिवस 12 नोव्हेंबर रोजी जगभर साजरा करण्यात येतो. जागतिक न्यूमोनिया दिन (WPD) 12 नोव्हेंबर 2009 पासून साजरा करण्यात येतो. ग्लोबल कोलिशन अगेंस्ट चाइल्ड न्यूमोनिया (GCCP) या संस्थेने ‘स्टॉप न्यूमोनिया’ अंतर्गत हा उपक्रम साजरा करायला सुरुवात केली. जगभरातील लोकांमध्ये न्यूमोनियाबद्दल जागरूकता पसरवणे हा जागतिक न्यूमोनिया दिनाचा उद्देश आहे.

स्टॉप न्यूमोनिया या उपक्रमाला जगभरात प्रचंड पाठिंबा मिळाला. अनेक सरकारी आणि खासगी संस्था लोकांना याबद्दल शिक्षित करण्यासाठी याचा उपयोग होत आहे. मुख्यतः आर्थिक दृष्टया गरीब देशांमध्ये कुपोषण आणि हवा प्रदूषणामुळे त्रस्थ असलेल्या मुलांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी ते काम करतात.

जागतिक निमोनिया दिवस 2024 ची थीम

दरवर्षी जागतिक निमोनिया दिनानिमित्त वेगवेगळी थीम ठेवली जाते. या थीम मार्फत विशेष संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जातो. यावर्षीची थीम ‘Every Breath Counts: Stop Pneumonia in Its Track’ ही आहे. या वर्षीची थीम आपल्याला सांगते की, आपला प्रत्येक श्वास मौल्यवान आहे आणि न्यूमोनियाला रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.

न्यूमोनिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती ?

निमोनिया हा एक संसर्गजन्य रोग आहे. यामध्ये फुफ्फुसांना सूज येणं किंवा फुफ्फुसात पाणी साचते. तसचं श्वास घेण्यासही त्रास होतो, खोकला, ताप, थंडी वाजणं ही लक्षणं जाणवतात. शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणातही घट होते. संसर्गामुळे, फुफ्फुसातील वायु पिशव्यांमध्ये जळजळ होते, ज्याला अल्व्होली म्हणतात. सतत खोकला येणे हे न्यूमोनिया आजाराचे प्रमुख लक्षण आहे.

न्यूमोनिया कशामुळे होतो?

खोकला किंवा श्वासोच्छ्वासाद्वारे हे जंतू एकापासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना या आजाराची लगेच लागण होते, कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते.

न्यूमोनियाचे कारण

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी ही न्यूमोनियाची प्रमुख कारणं आहेत. यांच्यामार्फत न्यूमोनियाचा संसर्ग होतो.
न्यूमोनिया होण्याचं कारण म्हणजे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया म्हणून ओळखले जाणारे बॅक्टेरिया. इतर जिवाणूकारक जीव म्हणजे मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, हिमोफिलस इन्फ्लूएंझा इ. हे याचे प्रकार आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यावर याचा परिणाम लगेच होतो. माती किंवा पक्ष्यांच्या विष्ठेतील बुरशीमुळेही न्यूमोनिया होऊ शकतो.

न्यूमोनियावर उपचार आणि लस

न्यूमोनिया टाळता येण्याजोगा आहे आणि वेळेवर लसीकरण केल्याने रोग होण्याची शक्यता कमी होते. भारतात न्यूमोनियावर लस देखील उपलब्ध आहेत.

-PCV (न्यूमोकोकल संयुग्म लस)
– गोवर लस
– हिब लस
स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलसमुळे होणारा संसर्ग Hib आणि PCV लस देऊन बरा होऊ शकतो. तर गोवरमुळे होणाऱ्या संसर्गवर गोवरची लस घेतल्यास तो बरा होऊ शकतो.

लहान मुलांमध्ये न्यूमोनिया ओळखण्याची लक्षणे

लहान मुलांमधील न्यूमोनियाच्या लक्षणांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचं आहे. ताप, श्वासोच्छ्वासात त्रास, ओटीपोटाची हालचाल हे लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे संकेत असू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2019 मध्ये 5 वर्षांखालील 7 लाख 40 हजार मुलांचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती करणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

न्यूमोनिया हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो, विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे या आजारावर त्वरित लक्ष देणे आणि योग्य उपचार घेणं महत्त्वाचं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू
India - America Trade Deal : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत संपत
The Caduceus symbol: जिथे कुठे डॉक्टर किंवा हॉस्पिटल असतं, तिथे आपण दोन साप आणि पंख असलेलं चिन्ह पाहतो. पण खरी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ