स्री-पुरुष समान अधिकार केवळ संपूर्ण जगातून या 14 देशांमध्येच लागू

Equal rights of men and women : जगात केवळ काहीच असे देश आहेत, जिथे महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार मिळतात. 2023 मध्ये वर्ल्ड बॅंकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील केवळ 14 देशांमध्ये महिलांना व्यावसायिक आणि कायद्याच्या दृष्टीने समान अधिकार दिले जातात.
[gspeech type=button]

जगात केवळ काहीच असे देश आहेत, जिथे महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार मिळतात. 2023 मध्ये वर्ल्ड बॅंकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील केवळ 14 देशांमध्ये महिलांना व्यावसायिक आणि कायद्याच्या दृष्टीने समान अधिकार दिले जातात. यामध्ये बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, आइसलॅंड, आयर्लंड, लातविया, लक्झमबर्ग, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, जर्मनी आणि नेदरलँड या देशांचा समावेश आहे.

या 14 देशांमध्ये महिलांना पुरुषांप्रमाणेच कामाच्या ठिकाणी, कायद्यात आणि इतर क्षेत्रांमध्ये समान संधी दिल्या जातात. विशेष म्हणजे जर्मनी आणि नेदरलँड हे देश 100 गुण मिळविणाऱ्या यादीत सर्वात आधी सामील झाले होते.

या देशांनी महिलांना आणि पुरुषांना समान अधिकार दिले आहेत, जसे की आई-वडिलांच्या सुट्टीचा अधिकार हा दोघांसाठी सारखा आहे. याशिवाय, विविध क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांप्रमाणेच संधी मिळाल्या आहेत आणि त्यांना अनेक अधिकारही दिले आहेत.

तर दुसरीकडे, काही देशांमध्ये महिलांची अवस्था फार कठीण आहे. यात सर्वात खालच्या पातळीवर वेस्ट बैंक आणि गाझापट्टीचे स्थान आहे. इथल्या महिलांना व्यवसाय आणि कायद्यात अगदी कमी अधिकार आहेत. त्यानंतर येमेन, सुदान आणि कतार या देशांमध्येही महिलांना कामाच्या ठिकाणी आणि कायदेशीर दृष्टीने पुरुषांपेक्षा खूपच कमी अधिकार आहेत.

Gender Inequality Index च्या म्हण्यानुसार स्री पुरुष समानतेत भारताचे स्थान गेल्या दहा वर्षांमध्ये चांगले झालं आहे. 2014 मध्ये भारत हा 127 स्थानावर होता आणि आता भारत 108 वर आहे.

दक्षिण आशियातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत केवळ दोन तृतीयांश कायदेशीर अधिकार आहेत. तर पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेश हे लिंग समानतेच्यादृष्टीने आपल्या कायदेमंडळात हळूहळू सुधारणा करण्यास सुरुवात करत आहे.

कंबोडियाने वृद्धावस्था पेन्शन प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी समान वय ठेवण्यात आलं आहे. व्हिएतनामनेही महिलांच्या रोजगारावरील सर्व बंधने काढून टाकली आहेत.

सौदी अरेबियातील बदल

2019 मध्ये, सौदी अरेबिया या देशाचे स्थान जगात सर्वात खाली होते, परंतु काही वर्षांमध्ये ते सुधारले आहे. 2023 मध्ये, त्यांचा स्कोअर 71.3% झाला आहे आणि ते 136 व्या स्थानावर पोहोचले आहेत. सौदी अरेबियाने महिलांना अधिक अधिकार देणारे कायदे लागू केलेत, आणि या बदलामुळे महिलांना कामाच्या ठिकाणी आणि समाजात अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे.

आज जरी महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी, जगभरातील अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन, कमी अधिकार आणि कमी संधी दिल्या जातात. जगभरात महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी अजून खूप काम करणे बाकी आहे. कागदावर जरी स्री-पुरुष समानतेचे वचन असले तरी, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अनेक ठिकाणी अजूनही पुरेशी झालेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ