ओहयोमधील स्थलांतरीत कुत्री, मांजरी खातात – रिपब्लिकन पक्षाचा खोटा प्रचार उघड

रिपब्लिक पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांनी, “हैती या देशामधून ओहयो इथं स्थलांतर झालेले लोकं कुत्रे, मांजर यासारखे पाळीव प्राणी खाऊन जीवन जगतायेत”, असं विधान निवडणुकीच्या डिबेटमध्ये केलं
[gspeech type=button]

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष  पदाच्या निवडणुकीमध्ये सध्या फेक नरेटिव्हचा विषय मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. खुद्द उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांनीच केवळ माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि विरोधी पक्षांच्या धोरणांवर टिका करण्यासाठी खोटा मुद्दा उपस्थित करत जनतेंची दिशाभूल केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांनी हे माध्यमांसमोर मान्य ही केलं आहे. त्यामुळे एकूणच प्रचारातील हा खोटा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.

जेडी व्हॅन्स नेमकं काय म्हणाले?

रिपब्लिक पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांनी, “हैती या देशामधून ओहयो इथं स्थलांतर झालेले लोकं कुत्रे, मांजर यासारखे पाळीव प्राणी खाऊन जीवन जगतायेत”, असं विधान निवडणुकीच्या डिबेटमध्ये केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे माध्यमांमध्ये खूप टीका-टिप्पणी झाली. मात्र, सीएनएनच्या एका कार्यक्रमात जेडी व्हॅन्स यांनी प्रचारासाठी हैती स्थालांतरीतांविषयी खोटा मुद्दा उपस्थित केल्याचे मान्य केले.

खोट्या प्रचार मुद्दाचे समर्थन

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या स्थलांतरीतां संबंधित धोरणांमुळे मूळ अमेरिकन नागरिकांवर अन्याय होतो. याकडे माध्यमांचं लक्ष केंद्रित व्हावं, त्यांच्या समस्या पुढे याव्यात म्हणून हे विधान केल्याचं व्हॅन्स यांनी म्हटले आहे. हैती या लॅटिन अमेरिकेमधील देशात मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे. चांगल्या राहणीमानासाठी तेथील पुष्कळजण अमेरिकेतल्या ओहयो राज्यात स्थलांतर करतात. मात्र, ओहयो राज्यावर त्याचा भार पडत आहे. मूळ नागरिकांपेक्षाही हैती येथून स्थलांतर झालेल्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, हे लोंढे थांबवण्याकरता व्हाईट हाऊसमधून काहीच पावलं उचलली जात नाहीत. म्हणून माध्यमांचं लक्ष या मुद्याकडे वेधून घेण्यासाठी असं विधान केल्याचं जेडी व्हॅन्स यांनी म्हटलं आहे.

राजकीय वर्तुळात विवाद

जेडी व्हॅन्स यांनी प्रचारासाठी हैती स्थलांतरितांविषयी खोटं वक्तव्य केल्याचं मान्य केल्यानंतर राजकिय वर्तुळामधून व्हॅन्स यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.

हिलरी क्लिंटन एक्स प्लॅटफॉर्मवर म्हणाल्या आहेत की,

“उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि ओहयो येथीस सिनेटर यांनी हैती स्थलांतरितांविषयी खोटं वक्तव्य केल्याचं मान्य केलं आहे. स्वत:च्या मतदारसंघाविषयी व्हॅन्स खोटं बोलले आहेत”

अमेरिकन ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी पीट बुटिगीग यांनी ट्विट केलं आहे की,

“अबॉर्शनसंबंधित हक्क, रोजगार, कर असे महत्त्वाचे विषय सोडून या विषयावर माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठी स्टोरीज क्रिएट केल्या जात आहेत.”

तर ओहयो राज्याचे गर्व्हनर माइक ड्विन यांनी प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना म्हटलं की, हैती येथील स्थलांतरित नागरिक हे ओहयो मध्ये कायदेशीररित्या वास्तव्य करीत असून त्यांना रोजगार देणारे प्रत्येकजण त्यांच्या कामाचं कौतुक करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ