नक्षलवाद विरोधात जनसुरक्षा विधेयक

Maharashtra Jan Sureksha Bill - 2024 : महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाने अधोरेखित केलेल्या गरजेनुसार नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, शहरी अर्बन नक्षल अड्डे बंद करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक - 2024 सादर करण्यात आलं आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक – 2024’ सादर केलं. 

यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “नक्षलवादाचा धोका केवळ दुर्गम भागापुरता मर्यादित नाही तर, एका इकोसिस्टिममार्फत घटनेवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाने अधोरेखित केलेल्या गरजेनुसार नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, शहरी अर्बन नक्षल अड्डे बंद करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येत आहे.”

या विधेयकामुळे पुन्हा एकदा नक्षली चळवळ, शहरात फोफावणारा शहरी नक्षलवाद आणि नक्षलवाद विरोधात राबवल्या जाणाऱ्या योजना आणि मोहिमा असा हा संपूर्ण विषय पुन्हा चर्चत आला आहे. 

नक्षलवाद विरोधात ‘झीरो टॉलरन्स’

केंद्र आणि राज्य पातळीवर नक्षलवादाचं पूर्ण उच्चाटन करण्यासाठी ‘झीरो टॉलरन्स’ मोहीम राबवली जाते. गेल्या दहा वर्षात छत्तीसगडमधील 85 टक्के नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे. तर देशभरातील 14 सीपीआय (माओवादी) नेत्यांचा खात्मा केला आहे. वर्षभरात 237 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. 812 नक्षलवाद्यांना अटक केली असून 723 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये दिली. 

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी त्या- त्या राज्यातल्या नक्षलवाद विरोधी मोहिमांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना या मोहिमांविषयी माहिती दिली. 

सन 2014 – 2024 या दहा वर्षामध्ये नक्षलवाद्यांकडून घडवल्या जाणाऱ्या हिंसक घटनांच्या प्रमाणामध्ये 53 टक्क्याने घट झाली आहे. तसेच या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिक आणि लष्कराची होणाऱ्या जीवितहानीमध्ये सुद्धा 70 टक्क्यांनी घट झाली आहे. 

आत्मसमर्पण योजना

केंद्र सरकारने 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचं उद्दीष्ट नजरेसमोर ठेवलं आहे. त्यानुसार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावं म्हणून केंद्र सरकारकडून 2005 साली आत्मसमर्पण योजना अंमलात आणली. या योजनेनुसार आजवर अनेक नक्षलवाद्यांनी पोलिस प्रशासनाकडे आत्मसमर्पण करुन सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे. 

पुनर्वसन योजना आणि बक्षिसांच्या रक्कमांमध्ये वाढ

अधिकाधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावं यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेत अलिकडे वाढ करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांच्या पदानुसार त्यांना ही रक्कम दिली जाते. यामध्ये किमान दीड लाख रुपयांपासून कमाल वीस लाखापर्यंतची रक्कम ठरवली आहे. या व्यतिरिक्त हत्यारासह आत्मसमर्पण करणाऱ्या सदस्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचे निश्चित केलं आहे. 

नक्षलवाद्यांचे पुनर्वसन ही महत्त्वपूर्ण योजनाही सरकारतर्फे राबवली जाते. या योजनेद्वारे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याला घर किंवा घरासाठी भूखंड आणि आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेचा आधार घेत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून घरबांधणीसाठी केलेल्या भूखंडाच्या मागणीनुसार गडचिरोली पोलीस अधीक्षकांद्वारे एकूण 106 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भूखंडांचे वितरण करण्यात आले आहे. 

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची विशेष वसाहत

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात समावून घेताना त्यांच्यासाठी मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणं आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने गडचिरोली येथे आत्मसमर्पण नक्षलवाद्यांची विशेष वसाहत उभी केली आहे. ही आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची ही देशातली पहिली विशेष अशी वसाहत आहे. चंद्रपूर मार्गावरील नवेगावजवळील मौजा मुरखळा येथे ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 93 आत्मसमर्पित नक्षलवादी वास्तव्य करीत असून या वसाहतीचं नाव ‘नवजीवन नवनगर’ असं नाव देण्यात आलं आहे. 

आत्मसमर्पित नक्षलवाद्याचं यशस्वी पुनर्वसन

केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज देशभरात अनेक नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. आणि ते उत्तम प्रकारे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये मिसळत आहेत. 

एसटी महामंडळामध्ये नोकरी

राज्य सरकारने या नक्षलवाद्यांना उदरनिर्वाहासाठी रोजगारदेखील उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचाच भाग म्हणून एसटी महामंडळाने जवळपास आत्मसमर्पण केलेल्या 60 नक्षलवाद्यांना 2018 मध्ये एसटीमध्ये वाहक पदाची नोकरी दिली आहे. या नक्षलवाद्यांना रीतसर प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेतले आहे. 

मतदानाचाही हक्क बजावला

नक्षली चळवळीत सहभागी होण्याऱ्या अनेक नक्षलवाद्याकडे त्यांची अधिकृत कागदपक्षे नसतात. त्यामुळे आत्मसमर्पण केल्यावर त्यांना त्यांचे हक्क -अधिकार देऊन मुख्य प्रवाहात सामावून घेणं गरजेचं असतं. त्यानुसार निवडणूक आयोगाने विशेष कक्ष नेमून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची कागदपत्रे तयार करून त्यांना  मतदानाच्या उत्सवातही सामावून घेतले. त्यानुसार, महादेव कुंडम, संजू मडवी, तुलसी मडवी, संजय उर्फे सुकलु पुनेम यांनी यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा आपला  हक्क बजावला. 

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया 

नक्षलवादी कारवायांमध्ये सामील झालेल्या नक्षलवाद्यांची जबरदस्तीने नसबंदी करत असल्याचे उघडकीस आले आहे. लग्न करू इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांची लग्नापूर्वी त्या – त्या शाखेच्या नक्षली नेत्यांच्या निर्देशावरून जबरदस्तीने नसबंदी केली जाते. 

लग्न झाल्यावर या नक्षलवाद्यांना कुटुंबाचा मोह होऊ नये, म्हणून ही नसबंदी केली जाते. ही व्यथा छत्तीसगडमधल्या एका आत्मसमपर्ण केलेल्या नक्षलवाद्यांने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली होती.  सर्वच नक्षलवाद्यांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात येते. आत्मसमर्पण केलेल्या या पूर्वाश्रमीच्या नक्षलवादीने नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया केली.  त्याच्यासारख्या आत्मसमर्पण केलेल्या अनेक नक्षलवाद्यांनी ही नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया केली असल्याचं त्याने सांगितलं. संबंधित आत्मसमर्पित नक्षल व्यक्तिला आज एक मूल असून त्याचं कौटुंबिक जीवन  पूर्वपदावर आल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी असल्याची भावना त्यानं व्यक्त केली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Feast of the holy innocents : येशु ख्रिस्ताच्या जन्मानंतर इस्त्रायलचे तत्कालीन राजे हेरोद यांनी बेथलेहेममधल्या नवजात बालकांची हत्या केली. या
modi lipi : चंद्रपूरमधील गाँडपिपरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील काही वि‌द्यार्थी मराठी भाषेच्या देवनागरी लिपीतल्या उताऱ्यांचं मोडी लिपीत रुपांतर करत
Tarpa : निसर्गपूजक आदिवासी समुदायाच्या विशिष्ट कार्यक्रमांपुरत मर्यादित असणारी पारंपरीक वाद्ये आता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत. तारपा, घंगाळी, ताडफा ही

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली