भारतामध्ये बॅडमिंटन आणि टेनिस यांसारख्या रॅकेट स्पोर्ट्सचा प्रसार आणि प्रचार गेल्या काही दशकांपासून झपाट्याने झाला आहे. हे दोन्ही खेळ म्हणजे शरीर आणि मन यांचं अत्यंत चपळ संयोजन आहे. वेगवेगळ्या पिढीतील भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे.
बॅडमिंटन आणि टेनिस या दोन्ही खेळामध्ये कोर्ट कव्हरिंग, वेगवान सर्व्हिस, आणि नेट प्लेमुळे हॅमस्ट्रिंग, काफ मसल्स, आणि कोर मसल्स यांवर जास्त ताण येतो. या खेळासाठी पॉवर, स्टॅमिना आणि स्ट्रॅटेजी गरजेची आहे. सततची रॅली, स्मॅश, सर्व्हिस आणि रिसिव्ह यामुळे लेगवर्क, रिफ्लेक्सेस, आणि कार्डिओ रेस्पॉन्स यांची गरज जबरदस्त वाढते.
घामाचा दर आणि हायड्रेशन
बॅडमिंटनमध्ये सरासरी 1.5–2.0 लिटर पाण्याचे घामाद्वारे उत्सर्जन होते तर टेनिसमध्ये उन्हामध्ये खेळल्यास तो दर 2.5 लिटर पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स युक्त पाणी, नारळ पाणी, लिंबूपाणी आवश्यक आहे.
वाढती प्रोटीन गरज आणि व्यायाम
या दोन्ही खेळांसाठी मसल्स रिकव्हरी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे 1.2–1.8g/kg वजनानुसार प्रोटीन लागते. मसल्स स्ट्रेन्थनिंगसाठी बॉडी वेट एक्सरसाइजेस, थाय स्ट्रेचेस, प्लायोमेट्रिक ट्रेनिंग, आणि डायनॅमिक वॉर्मअप आवश्यक असतो.
खाण्यामध्ये शेंगदाणा व्हे प्रोटीन, अंडी, मासे, चिकन, तोफू, सोयाबीन, पनीर, डाळी, कडधान्य, राजमा आणि छोले यांचा भरपूर वापर केल्याने ही प्रोटीनची गरज पूर्ण होऊ शकते.
हे ही वाचा : खेळ – शरीर, मन आणि अन्न संस्कृती यांचं सामर्थ्य
भारतामधील प्रसिद्ध खेळाडू आणि प्रशिक्षण केंद्रे
बॅडमिंटन:
प्रमुख खेळाडू: सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन
बॅडमिंटन साठी प्रसिद्ध प्रशिक्षण केंद्रे:
गोपिचंद अकॅडमी – हैदराबाद
प्रकाश पाडुकोण अकॅडमी – बंगलोर
सुचित्रा अकॅडमी – हैदराबाद
टेनिस:
प्रमुख खेळाडू: लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना
प्रसिद्ध प्रशिक्षण केंद्रे:
महेश भूपती टेनिस अकॅडमी
आदित्य सचदेवा टेनिस अकॅडमी – दिल्ली
एसपी टेनिस अकॅडमी – पुणे
बॅडमिंटन आणि टेनिस या दोन्ही खेळांमध्ये अनेक असे मुद्दे आहेत जे खेळ, खेळाडू, व्यवस्थापन, पौष्टिकता आणि समाजिक अंगाने विचारात घ्यायला हवेत:
1.फिटनेस आणि अति लवकर खेळात प्रवेश
आजकाल 6–7 वर्षांची मुलेही टेनिस-बॅडमिंटन खेळतात.
अशा वयात शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष देणे आवश्यक आहे – मजबूत स्नायू, सांधे, योग्य फॉर्म आणि पाठीचा आधार.
योग्य sports-specific conditioning नसल्यास, कंबर, गुडघा, खांदा दुखणे या समस्या लवकर सुरू होतात.
2.मॅच साठी लागणारा वेळ आणि स्कोअर सिस्टीममुळे होणारा मानसिक थकवा
बॅडमिंटन : ताशी 300 किलो कॅलरीज ते 450 किलो कॅलरीज खर्च होतो.
टेनिसमध्ये 3–5 तास मॅचेस होऊ शकतात. यामुळे हायड्रेशन, ग्लायकोजेन कमी होणं आणि मानसिक थकवा खूप दिसतो.
त्यामुळे खेळ सुरू असताना शरिरात पाण्याची योग्य पातळी राखण्यावर लक्ष द्यावं लागतं. विश्रांतीच्या वेळेत केळं, एनर्जी बार आणि ग्लुकोज पाण्याचं सेवन करण्यावर भर हवा.
हे ही वाचा : फुटबॉल – ताकदीचा खेळ, पौष्टिक आहार
3. महिला खेळाडूंसाठी विशेष काळजी
वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिक पाळीच्या काळात आयर्न, व्हिटामिन B12, कॅल्शियमची गरज जास्त असते.
पीसीओएस (PCOS), amenorrhea (मासिक पाळी थांबणे), थकवा यासाठी हार्मोन्स नियंत्रणासह पोषणाची खूप आवश्यकता असते.
खेळासाठी योग्य कपडे, पेल्विक स्नायु मजबुत करणे आणि मानसिक समुपदेशन गरजेचं आहे.
4. पोषणासंदर्भातले गैरसमज – वजन कमी करू नको, ताकद वाढवा
खेळाडूंना अनेकदा कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. जे की, चुकीचं आहे.
उच्च प्रथिने, मध्यम प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि निरोगी चरबी आणि इलेक्ट्रोलाइट्ससह हायड्रेशन हे खेळाडूसाठी अत्यावश्यक असते.
कार्बोहायड्रेट कमी करणे, शरीरातील चरबी घटवणे हे उपाय मॅचपूर्वी वापरले तर खेळाच्या सादरीकरणावर परिणाम होतो.
5. भारतातील व्यावसायिक मार्गदर्शनाचा अभाव
अनेक ठिकाणी कोचिंग आहे पण सायंटिफिक ट्रेनिंग, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट नाहीत.
सगळ्या खेळाडूंना एकाच पद्धतीचा डाएट चार्ट दिला जातो हे चुकीचं आहे. प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या शरीराच्या, आरोग्याच्या गरजेनुसार वैयक्तिक डाएट प्लान असला पाहिजे.
6 रॅली बेस्ड गेम्स – मानसिक ताकदीची परीक्षा
बॅडमिंटन आणि टेनिस दोन्हीमध्ये रॅलीज दीर्घकाळ चालतात.
खेळाडूंना ताण, संयम, एकाग्रता, आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता लागते.
यासाठी माइंडफुलनेस, श्वास घेण्याच्या पद्धतीची माहिती, आणि व्हिज्युअलायझेशन ड्रिल या कौशल्यांची गरज आहे.
7. अकॅडमी स्तरावर गतीशीलतेचा अभाव
जगात बॅडमिंटन/टेनिससाठी विशेष स्पोर्ट्स प्रशिक्षण केंद्र आहेत.
भारतात अजूनही जास्त शाळा क्रीडाशी सुसंगत नाहीत.
शैक्षणिक आणि क्रीडा यामध्ये समतोल ठेवणारी धोरणं आखणं आवश्यक आहेत.
8. महिला विरुद्ध पुरुष – समान प्रशिक्षणाची गरज
टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये मुलींना कधी कधी कमी प्रशिक्षण दिलं जातं – ही चुकीची पद्धत आहे.
मुलींना ही स्नायु बळकट करण्याचं चपळता, आणि सहनशक्ती वाढेल अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे.
फक्त कॅल्शियम गोळ्या न देता, नैसर्गिकरित्या आहारातून आणि व्यायामाच्या माध्यमातून कॅल्शियमची गरज भरुन निघेल अशा पद्धतीचा डाएट प्लान आणि व्यायाम प्रशिक्षण दिलं पाहिजे.
9.जलद रिव्हरी सिस्टम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग
हॉक-आय, सेन्सर्स, व्यायाम करताना शरीरावर वापरता येतील असे उपकरणे (wearable devices), घामाचे विश्लेषण (sweat analysis), एआय-चलित प्रशिक्षण याचा वापर अधिक व्हायला हवा.
भारतीय प्रशिक्षण पद्धत अजूनही पारंपरिक स्वरुपाची आहे. त्यात बदल करणं गरजेचं आहे.
10.रोल मॉडेल्सची ओळख आणि त्यांचे अनुभव
भारतात सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, सुमित नागल, सानिया मिर्झा, रामनाथन कृष्णन त्यांच्या डायट, स्ट्रगल्स, फिटनेस प्लान, रूटीन यांचा प्रचार व्हायला हवा – जेणेकरून नवोदित खेळाडूंना दिशा मिळेल.
निष्कर्ष
बॅडमिंटन आणि टेनिस हे केवळ खेळ नाहीत तर जीवनशैली बदलणारे गेम आहेत आहेत. चपळता, खेळाची समज, टिकाव आणि योग्य आहार यांचं योग्य मेळ जर आपल्याला जमला तर यश आपलंच आहे आहे. योग्य मार्गदर्शन, संतुलित आहार आणि नित्य व्यायाम यामुळे आपणही या खेळांत यशस्वी होऊ शकतो.