चेहऱ्यावर नारळाचं तेल लावावं की नाही?

Coconut oil : नारळाचं तेल फक्त आपल्या आरोग्यासाठीच उपयोगी नाही, तर ते त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
[gspeech type=button]

आजकाल प्रत्येकाला त्याच्या आरोग्याबद्दल जेवढी काळजी आहे तितकीच काळजी आपल्या त्वचेबद्दलही आहे. सुंदर आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी लोक विविध स्किन केअर रुटीन्स फॉलो करतात. त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे नारळाचं तेल.

नारळाचं तेल फक्त आपल्या आरोग्यासाठीच उपयोगी नाही, तर ते त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड, फॅटी ऍसिड्स आणि अँटी-बॅक्टेरियल हे गुणधर्म असतात, त्याचबरोबर, हे तेल कोरड्या (Dry Skin) त्वचेसाठी फार चांगलं आहे. पण, नारळाचं तेल सगळ्यांच्या त्वचेसाठी योग्य आहे असं नाही.

त्वचेसाठी नारळाचं तेल उपयुक्त का?

कोरडी त्वचा : जर आपली त्वचा खूपच कोरडी असेल, तर नारळाचं तेल वापरणं उपयुक्त ठरू शकतं. नारळाचं तेल त्वचेतला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.

हायपरपिग्मेंटेशन : जर चेहऱ्यावर काळी वर्तुळे किंवा डाग असतील, तर नारळाचे तेल त्यावर लावल्याने याचा चांगला फायदा त्वचेला होतो.

चेहऱ्यावर कोणी लावू नये नारळाचं तेल

तेलकट त्वचा: ज्यांची त्वचा आधीपासूनच तेलकट आहे, त्यांनी नारळाचं तेल चेहऱ्याकरता वापरू नये. कारण नारळाचं तेल वापरल्यामुळे मुरुम आणि पुरळ वाढू शकतात.

मुरुमांची समस्या असलेल्या लोकांसाठी नारळाचं तेल नुकसान करू शकतं. कारण हे तेल त्वचेला अतिरिक्त तेल देतं.

नारळाचं तेल वापरण्याची योग्य पद्धत 

रात्री झोपण्यापूर्वी, तळहातावर नारळाच्या तेलाचे 1-2 थेंब घ्या आणि ते हलक्या हाताने चेहऱ्यावर लावून, हळुवार मसाज करा. विशेषत: थंडीत रात्रभर हे तेल चेहऱ्यात मुरू देत. पण उन्हाळ्यात मात्र तेल लावल्यावर अर्ध्या तासाने चेहरा धुवावा.

नारळाचं तेल त्वचेवर जास्त प्रमाणात लावू नका. त्याचा अती वापर त्वचेचं नुकसान करू शकतो.

नारळाचं तेल सनस्क्रीन सारखं वापरू नका. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचे फायदे देखील वेगळे आहेत. सनस्क्रीन सूर्याच्या हानीकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतं. तर नारळाचं तेल त्वचेचे हायड्रेटिंग म्हणजेच ओलावा कायम ठेवण्याचं काम करतं.

थंडीत हात, पाय आणि तळव्यांना रात्री झोपताना हलक्या हाताने खोबरेल तेलाचा मसाज करावा. यामुळे हातापायाची त्वचा छान मऊ राहते.

नारळाचं तेल आपल्या त्वचेसाठी एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय असू शकतो. पण त्याचा वापर आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि समस्येनुसार करणे महत्वाचं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात
श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही
हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ