PCOS (Polycystic Ovary Syndrome) किंवा PCOD (Polycystic Ovarian Disease) हा महिलांमध्ये होणारी हार्मोनल डिसऑर्डर आहे. यामध्ये अंडाशयामध्ये अनेक सिस्ट तयार होतात, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि अँड्रोजेन्स (पुरुष हार्मोन्स) वाढतात. याचा परिणाम त्वचेवर, केसांवर आणि संपूर्ण शरीरावर होतो.
PCOSची प्रमुख लक्षणे:
· मासिक पाळी अनियमित किंवा अनेक महिने चुकणे
· हनुवटी, जबड्याजवळ आणि गळ्यावर मोठे, खोल मुरुम येणे
· चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त केस येणे (Hirsutism)
· केस गळणे आणि पातळ होणे (Hair Thinning)
· वजन वाढणे आणि पोटाजवळ चरबी जमा होणे
· इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबेटिसचा धोका वाढणे.
PCOD आणि सीड सायकलिंग यांचा संबंध
अनियमित हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक असते. सीड सायकलिंग (Seed Cycling) हा नैसर्गिक उपाय PCODमधील हार्मोनल असंतुलन सुधारण्यासाठी मदत करू शकतो.
सीड सायकलिंग म्हणजे काय?
सीड सायकलिंग म्हणजे मासिक पाळीच्या चक्रानुसार विशिष्ट प्रकारचे बियाणे (seeds) खाणे, जे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. हे दोन टप्प्यांमध्ये केले जाते:
1. फॉलिक्युलर फेज (1 ते 14 वा दिवस – पाळीच्या पहिल्या दिवसापासून)
· संपूर्ण इस्ट्रोजेन संतुलित ठेवण्यासाठी फ्लॅक्ससीड (अळशी) आणि पम्पकिन सीड (भोपळ्याच्या बिया) दररोज १ चमचा खाव्यात.
· ही बियाणे शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. त्यामुळे PCOD असलेल्या महिलांसाठी हे उपयुक्त आहे.
2. ल्युटिअल फेज (15 ते 28 वा दिवस – ओव्ह्युलेशननंतर)
· प्रोजेस्टेरॉन संतुलित ठेवण्यासाठी दररोज 1 चमचा सूर्यफूल बिया (Sunflower Seeds) आणि तीळ (Sesame Seeds) खावेत.
· या बिया प्रोजेस्टेरॉन वाढवतात, जे PCODमुळे पाळी अनियमित होण्याची समस्या कमी करते.
PCODमध्ये सीड सायकलिंगचे फायदे
· इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे योग्य प्रमाण राखते.
· मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते.
· त्वचेवरील मुरुम कमी करण्यास मदत होते.
· केस गळती आणि पातळ होण्याची समस्या कमी होते.
· इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
सीड सायकलिंग करताना घ्यायची काळजी
· बियाणे दररोज 1-1 चमचा घ्या, पण अति सेवन टाळा.
· ताज्या आणि न तळलेल्या बिया खा.
· नियमित 3-6 महिने फॉलो केल्यास परिणाम दिसू शकतात.
प्रत्येक बियाण्याचे पौष्टिक गुणधर्म
· फ्लॅक्ससीड (अळशी): ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि लिग्नॅन्सने भरलेले असतात. जे इस्ट्रोजेन संतुलित ठेवते.
· पम्पकिन सीड (भोपळ्याच्या बिया): झिंक आणि मॅग्नेशियम समृद्ध असतात, ज्या ओव्ह्युलेशन सुधारण्यास मदत करते.
· सूर्यफूल बिया: व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त, जे प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन वाढवते.
· तीळ (सेसमी सीड्स): झिंक आणि फायटोइस्ट्रोजेन्सने भरपूर, जे हार्मोन्स संतुलित ठेवते आणि सूज कमी करते.
सीड सायकलिंग किती वेळ करावे?
· सतत 3-6 महिने फॉलो केल्यास हार्मोन्सवर परिणाम दिसू शकतो.
· पीरियड्स नियमित झाल्यानंतरही ते सुरू ठेवले तर हार्मोनल हेल्थ सुधारते.
बियाणे खाण्याचे योग्य मार्ग
· दह्यात, मिल्कशेकमध्ये किंवा स्मूदीमध्ये मिक्स करून खाऊ शकता.
· ग्राइंड करून पोळीच्या पीठात टाकून सेवन करू शकता.
· सॅलडमध्ये टाकून खाणे सोपे आणि पोषणदायी ठरते.
· मुखवास सारखे भाजलेल्या बडीशेप बरोबर खाणे सुद्धा सोपे आहे
बियाण्यांचे इतर फायदे
· इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करून वजन संतुलित ठेवते.
· त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि मुरुम कमी होतात.
· थायरॉईड आणि अन्य हार्मोनल समस्यांसाठीही फायदेशीर ठरू शकते.
कोणती खबरदारी घ्यावी?
· बियाण्यांचे प्रमाण जास्त घेतल्यास गॅस, अपचन किंवा सूज येऊ शकते, त्यामुळे मर्यादित सेवन करावे.
· थायरॉईड किंवा अन्य हार्मोनल औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
· कोणत्याही बियाण्यांची अॅलर्जी असेल तर ती टाळा.
सीड सायकलिंग हा हार्मोन्स नैसर्गिकरित्या संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त पर्याय आहे. योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास PCOD नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
पुढील भागात काय वाचाल?
स्त्रीच्या जीवनातील 13 ते 60 या वयातील विविध टप्पे व त्यानुसार आहारातील बदल.
12 Comments
Khup chan mahiti👌👌👌
Thanks for sharing with us🙏
खूप उपयुक्त माहिती share केली आपण! आभारी आहे!
तुम्ही सोप्या शब्दांत सांगितलेली उपयुक्त माहिती कळली. तसेच खाद्यघटक घरात उपलब्ध असतात. माहितीबद्दल धन्यवाद. पुढील माहितीच्या प्रतीक्षेत.
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली
सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. उपायही नैसर्गिक सांगितलाय. खूप खूप खूप उपयुक्त अभिनंदन करावे असे.
सादा घरी करता येईल असा उपाय .मुद्देसूद मांडणी
खूप सुंदर ! हा तुझा ( लेखन पैलू ) मला आजच कळला .असेच लिहीत जा …
खूप छान
कठीण विषय सोपा करून सांगितला आहे
कठीण विषय खूप सोपा करून सांगितला आहे.
Very informative. Practical and easy to implement
Great information.