भारतीय टेनिसला ग्रहण

एटीपी अर्थातच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने जाहीर केलेल्या या आठवड्याच्या क्रमवारीत भारताचा एकही टेनिसपटू पहिल्या शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवू शकला नाही. एकेकाळी टेनिस ग्रँडस्लॅमच्या मेन्स डबल्स, वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये भारतीय टेनिसपटूंचा दबदबा होता मात्र, आता तसं चित्र दिसत नाही.
[gspeech type=button]

रामनाथन कृष्णन, विजय अमृतराज, रमेश कृष्णन, लिअँडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा, सोमदेव देवबर्मन आणि युकी भांबरी ही काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी नावं ज्यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस जगतामध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकवलाय. पण नजीकच्या काळात आपण पाहिलं तर, भारताच्या एकाही टेनिसपटूला ग्रँडस्लॅम टुर्नामेंटमध्ये दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. एटीपी अर्थातच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने जाहीर केलेल्या या आठवड्याच्या क्रमवारीत भारताचा एकही टेनिसपटू पहिल्या शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवू शकला नाही. एकेकाळी टेनिस ग्रँडस्लॅमच्या मेन्स डबल्स, वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये भारतीय टेनिसपटूंचा दबदबा होता मात्र, आता तसं चित्र दिसत नाही.

ऑस्ट्रेलियन ओपननंतर पदकांची शांतता

2024 मध्ये भारताच्या रोहन बोपण्णाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मेन्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावण्यात यश आलं होतं. रोहन बोपण्णाने मॅथ्यू एबडेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची किमया साधली होती. 43 व्या वर्षी बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता ठरला होता. त्याचप्रमाणे मेन्स डबल्सच्या रँकिगमध्ये नंबर बन स्थानावर सर्वात वयस्क टेनिसपटू म्हणून विराजमान होण्याचा मानही त्याला मिळाला होता. 2024 ऑस्ट्रेलियन ओपननंतर भारताच्या एकाही टेनिसपटूला लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. भारतीय टेनिसला लागलेल्या या ग्रहणाची कारणे अनेक आहेत.

टेनिस रँकिंगमध्ये भारतीयांची घसरण

भारतीय टेनिसपटूंचे रँकिंग बघितले तर सध्या सुमित नागल या एकमेव टेनिसपटूला 200 टेनिसपटूंमध्ये स्थान पटकावता आलंय. सुमित सध्या पुरुषांच्या रँकिंगमध्ये 169 व्या स्थानावर आहे. यानंतर आर्यन शहा 450 व्या क्रमांकावर, मुकुंद शशिकुमार 456, कारन सिंग 518 आणि रामनाथन रामकुमार 558 व्या स्थानावर आहे. यावरुनच भारतीय पुरुष एकेरीतील भारतीय टेनिसची दयनीय अवस्था दिसून येतेय. तर महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीतही तिच परिस्थिती दिसून येतेय. अंकिता रैना 308 व्या स्थानावर, सहजा यमालपल्ली 323, श्रीवल्ली भामीदीपती 344, वैदेही चतुर्वेदी 361 आणि ऋतुजा भोसले 605 व्या स्थानावर आहे.

 

सिंगल्स टेनिसपटू घडवण्यात अपयश

भारतीय महिला आणि पुरुष या दोघाही टेनिसपटूंचा विचार केला तर टेनिस सिंगल्समध्ये भारताला फारसं यश मिळालेलं नाही. हेच अधोरेखित होतंय. किंबहुना भारत सिंगल्स टेनिसपटू घडवण्यात कुठेतरी कमी पडतोय. यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे. भारतीय टेनिसचा इतिहास पहाता आतापर्यंत एकाही टेनिसपटूला ग्रँड्सलॅम सिंगल्स जिंकता आलेलं नाही. भारताचे महान टेनिसपटू रामनाथ कृष्णन यांनी सलग दोनदा म्हणजेच 1960 आणि 1961 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 1961 च्या विम्बल्डनमध्ये त्यांनी 12 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या रॉय एमरसन यांच्यावर मात करत इतिहास रचला होता. तर विजय अमृतराज यांना दोनदा विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठता आली होती. यानंतर रामनाथन कृष्णन यांचा मुलगा रमेश कृष्णन एकदा विम्बल्डन आणि दोनचा अमेरिकन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. यानंतर भारताचा एकच टेनिसपटू आहे ज्यानं भारताला ऑलिम्पिक पदक आणि डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये ग्रँडस्लॅम जिंकून दिली तो म्हणजे लिअँडर पेस.

हेही वाचा – गोल्डन गर्ल ते बॉस लेडी

इंडियन एक्स्प्रेस सुसाट

लिअँडर पेसने भारताला मेन्स सिंगल्समध्ये ऑलिम्पिक पदक पटकावून देत इतिहासाला गवसणी घातली. 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. यानंतर पेसची महेश भूपतीबरोबर चांगलीच जोडी जमली. आणि त्यांनी मेन्स डबल्समध्ये भारताला घवघवीत यश मिळवून दिलं. या दोघांनी तीन ग्रँडस्लॅम भारतासाठी जिंकत टेनिस जगतामध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. 1999 मध्ये विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन तर 2001 मध्ये फ्रेंच ओपन जिंकत त्यांनी टेनिस जगतामध्ये आपली वेगळी छाप सोडली होती. 1999 मध्ये चारही ग्रँडस्लॅम म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपनची फायनल गाठणारी पेस-भूपती ही पहिली टेनिस जोडी होती. त्याचप्रमाणे 1997 ते 2010 या कालावधीत डेव्हिस कपमध्ये ली-हेश जोडगोळीने तब्बल 24 सामने जिंकण्याची कमालही केली होती. मात्र, काही कारणांमुळे ही जोडी विभक्त झाली. आणि नंतर वेगवेगळ्या जोडीदारासह ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये खेळू लागली. लिअँडर पेस आणि महेश भूपती जसे भारतीय टेनिसचा चेहरा बनले. त्याचप्रमाणे सानिया मिर्झाने भारतीय टेनिसमध्ये ग्लॅमरचा तडका लगावला.

ग्लॅमरस सानिया मिर्झाची एंट्री

टेनिसच्या दुनियेत सानियाने आपल्या ग्लॅमरचा तडका आपल्या खेळाबरोबर लावला. टेनिस कोर्टवर आपली जादू दाखवत तिने भारतासाठी वुमेन्स डबल्सची तीन आणि मिक्स डबल्सची तीन ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला. त्याचप्रमाणे अनेक डब्ल्यूटिए स्पर्धांमध्येही तिने आपल्या कामगिरीने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 2007 मध्ये सानियाने WTA रँकिंगमध्ये 27 व्या क्रमांकावर झेप घेतली होती. कुठल्या भारतीय महिला टेनिपटूला जे साध्य झालं नाही ते सानियाने करुन दाखवलं होतं. 2015 मध्ये ती डबल्सच्या रँकिंगमध्ये सानिया अव्वल क्रमांकावर विराजमान झाली होती. यावरुनच सानियाचा टेनिस धडाका पहायला मिळाला. सानियाने टेनिस कोर्टबरोबरच टेनिस कोर्टबाहेरही आपल्याभोवती एक वेगळं वलय निर्माण केलं. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे तिची ब्रँड व्हॅल्यूही वाढली. पेस आणि भूपतीबरोबर टेनिसकडे युवा टेनिसपटूंचा कल वाढण्यात सानिया मिर्झामुळेही मदत झाली. मात्र भारताच्या टेनिसला सध्या घरघर लागलेली पहायला मिळतेय.

हेही वाचा – नेमबाजीत सुवर्णवेध घेणारी फोगटकन्या!

भारतीय टेनिसला कधी मिळणार नव संजीवनी ?  

भारतीय टेनिसचा विचार केला तर महिला टेनिसमध्ये एकही टेनिसपटू रँकिंगमध्ये पहिल्या 300 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळू शकलेली नाही. अंकिता रैना 308 व्या स्थानावर आहे. 32 वर्षीय अंकिताकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तिनं आपल्यावरील विश्वास सार्थ करु शकली नाही. श्रहजा यमलापल्ली, श्रीवल्ली भामिदीपती, ऋतुजा भोसले आणि वैदैही चौधरीला उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. भारतीय टेनिसपटूंनी  1997 ते 2024 दरम्यान 31 ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावता आली. यात 18 डबल्स, 10 मेन्स डबल्स आणि तीन वुमेन्स डबल्सची ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत.  केवळ लिअँडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या चार टेनिसपटूंच्या जोरावर भारताला हा आकडा गाठता आलाय.  या चौघांनी कधी आपापसात खेळत तर कधी परदेशी टेनिसपटूंसह जोडी जमवत या ग्रँडस्लॅमवर आपलं नाव कोरलंय. सानिया मिर्झा, लिअँडर पेस आणि महेश भूपतीने टेनिसला केव्हाच अलविदा केलाय. रोहन बोपण्णाचं वय आता ४४ आहे. तो ही करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आहे.  या ‘फॅब्युल्युअस फोर’नंतर भारतीय टेनिसचा नवा चेहरा अजूनही मिळू शकलेला नाही. युवा टेनिसपटू लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतायत. सुमित नागल, रामकुमार रामनाथन, मुकुंद शशिकुमार आणि कारन सिंगही टेनिसविश्वात आपली ओळख निर्माण करु शकले नाहीत. 2025 मध्ये केवळ सुमित नागलला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मेन्स सिंगल्ससाठी पात्र होता आलं.  इतर टेनिसपटू टॉप 300 टेनिसपटूंमध्येही नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर भारतीय टेनिसला पुन्हा उभारी घ्यायची असेल तर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

ज्या विविध देवतांचे कृष्णरूपात एकत्रीकरण झाले, त्यापैकी सर्वात प्राचीन पुरावा वासुदेव या देवतेचा आहे. हा पुरावा म्हणजे हेलिओडोरस स्तंभावरील शिलालेख.
विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात
श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ