हॉवर फ्लाय

Hover flies : सतत फुलांच्या अवती-भोवती गस्त घालणाऱ्या आणि जगभरात तब्बल 6 हजार उपजाती असलेल्या ‘हॉवर फ्लाय’ नावाच्या माशा आपल्याला सहजपणे सगळीकडे पाहायला मिळतात. फक्त अंटार्क्टिकामध्येच या माशा आढळत नाहीत.
[gspeech type=button]

सतत फुलांच्या अवती-भोवती गस्त घालणाऱ्या आणि जगभरात तब्बल 6 हजार उपजाती असलेल्या ‘हॉवर फ्लाय’ नावाच्या माशा आपल्याला सहजपणे सगळीकडे पाहायला मिळतात. फक्त अंटार्क्टिकामध्येच या माशा आढळत नाहीत. हॉवर फ्लाय या माशा फुलाभोवती हेलीकॉप्टर सारख्या एकाच जागी संथपणे फिरत असतात. त्यामुळे त्यांना ‘हॉवर फ्लाय’ असं नाव पडलं आहे. या माशा सतत फुलाच्याच भोवती असतात म्हणून त्यांना ‘फ्लावर फ्लाय’ असं देखील म्हटलं जातं.

हॉवर फ्लाय या साध्या माश्या

या माश्या आकाराने लहान असतात. त्यांचं शरीर केसाळ असतं. प्रामुख्याने त्या पिवळ्या रंगाच्या असून त्यावर लाल, भगवे, काळे, तपकिरी पट्टे किंवा ठिपके असतात. या त्यांच्या उठावदार आणि भडक रंगसंगतीमुळे त्यांना मधमाश्या किंवा गांधीलमाश्या समजलं जातं. पण या सामान्य माश्यांच्या वर्गातल्या असल्यामुळे त्या डंख मारु शकत नाहीत.

बऱ्याच माश्यांचे पंख हे पारदर्शक असून त्यावर चमक असते. पण काही जातींमधे या माश्यांच्या पंखावरही वेगवेगळे रंग असतात. माश्यांच्या जातीमधल्या असल्यामुळे यांना पंखांची एकच जोडी असते आणि दुसरी जोडी ‘हॉल्टर’ या अवयवामधे विकसीत झालेली असते. हा ‘हॉल्टर’ अवयव या माशा हवेत उडताना स्थिरता येण्यासाठी वापरातात.

या माश्यांचे डोळे लालभडक आणि बटबटीत असतात. या त्यांच्या संयुक्त डोळ्यांमध्ये अंदाजे 400 हून अधिक भिंगे असतात.

हॉवर फ्लायचं प्रमुख अन्न

या माश्यांचं दुसरं नाव फ्लॉवर फ्लाय आहे. त्यामुळे अर्थातच त्याचं प्रमुख अन्न हे मध आहे. निरनिराळ्या फुलांमधली मध आणि परागकण शोषून घेणे हेच त्याचं दिवसभरातलं प्रमुख काम असते.

त्यांच्या तोंडातील खास स्पंजसारख्या असलेल्या अवयवामुळे त्यांना प्रत्येक फुलातील मध आणि परागकण सहज टिपता येतात. हॉवर फ्लायच्या प्रत्येक जातीमधल्या माश्यांच्या तोंडातील हा अवयवाची लांबी ही वेगवेगळी असते. त्यामुळे एखाद्या घंटेच्या आकारतल्या फुलांमधली मधसुद्धा त्यांना सहज शोषून घेता येते.

प्रौढ माश्या आणि अळीच्या अवस्थेत असलेल्या माश्यांच्या अन्नात प्रचंड तफावत आढळते. प्रौढ माश्या या फक्त फुलातील मध आणि परागकण शोषत असतात. तर, हॉवर फ्लाय जातीतल्या काही माश्यांच्या अळ्या कुजलेला पालापाचोळा, पाण्यातले कुजलेले मासे खातात. काही अळ्या हे फक्त झाडांची मुळे खातात. तर बऱ्याचशा जातीतल्या अळ्या या ‘मावा किडे’ खाऊन वाढतात.

हॉवर फ्लाय शेतकऱ्यांचे मित्र

या माश्या फुलांतील मध पिताना अप्रत्यक्षपणे परागीभवनाची क्रिया पूर्ण करतात त्यामुळे विविध फळ आणि फुल झाडांच्या फलनप्रक्रियेसाठी मोठी मदत होते. मावा किड्यामुळे शेत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. काही जातीतल्या माश्या या अळ्या अवस्थेत मावा किडे खातात. त्यामुळे मावा किड्यांचं प्रमाण कमी होतं आणि शेत पिकांचं नुकसान कमी प्रमाणात होते.

हॉवर फ्लायचे दर्शन

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर विविध प्रकारची फुलं बहरलेली आपण पाहत असतो. त्यामुळे याच सीझनमध्ये आपल्याला या हॉवर फ्लाय मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्यामुळे या माश्यांचे जर फोटो काढायचे असतील तर पावसाळा हा उत्तम काळ ठरतो.

कुठल्याही बागेमध्ये जिथे फुलझाडं असतात तिथे आपल्याला या माश्या पाहायला मिळतात. पण जर का आपण जंगलात फिरत असू आणि जर तिथे ‘लिया’ जातीचे छोटेसे झुडूप फुलले असेल तर तिथे या माश्या अगदी हमखास आढळणार.

या माशां सतत भिरभिरत असतात त्यामुळे त्यांचे चांगले फोटो काढणं खूप कठिण काम असतं. पण त्या जेव्हा एखाद्या फुलावर मध प्यायला बसतात, तेव्हा त्या स्थिर असतात. अशावेळी त्यांचे चांगले, आकर्षक फोटो काढता येतात. पण असे क्षण फार कमी असतात. कारण या माशांचा वेग खूप असतो आणि त्या हवेत उडत असतानाही अगदी वेगाने फूलातला मध ओढून भूर्रकन उडून जातात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ