परदेशी युनिव्हर्सिटी कशी निवडावी?

Foreign Education : युनिव्हर्सिटी निवडणे हे जरा किचकट काम आहे. या करता आपल्याला ज्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेतली तर खूप चांगलं असतं. युनिव्हर्सिटी निवडताना नेमके कोणते ध्यानात घेतले हवेत आणि कशाला किती महत्त्व द्यायला हवं हे बघूयात.

मागच्या लेखात आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज (एसओपी) कसे लिहायचे हे पाहिलं. युनिव्हर्सिटी निवडीसाठी काय काय गोष्टी विचारात घ्याव्यात हे पाहुयात. युनिव्हर्सिटी निवडणे हे जरा किचकट काम आहे. या करता आपल्याला ज्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेतली तर खूप चांगलं असतं. युनिव्हर्सिटी निवडताना नेमके कोणते ध्यानात घेतले हवेत आणि कशाला किती महत्त्व द्यायला हवं हे बघूयात.

ट्युशन फी (Tuition Fee) 

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी पब्लिक आणि प्रायव्हेट अशा दोन प्रकारामध्ये विभागलेल्या आहेत. पब्लिक विद्यापीठांची फी कमी तर प्रायव्हेट  युनिव्हर्सिटीची फी जास्त असते. युनिव्हर्सिटी निवडण्यापूर्वी तिथे फी किती आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर याची माहिती दिलेली असते. फी जास्त म्हणजे युनिव्हर्सिटी चांगली असं नाही. आपल्या बजेटनुसार युनिव्हर्सिटी निवडली पाहिजे. स्वस्त आहे म्हणून कुठलीही युनिव्हर्सिटी न निवडता युनिव्हर्सिटीचा दर्जा आणि कमीत कमी फी यांचा योग्य तो मेळ घातला गेला पाहिजे. 

प्रवेशासाठी असलेल्या अटी (Admission Requirements) 

ह्या अटी जाणून घेतल्या की आपल्या जीआई स्कोर, जीपीए, इंग्लिश लँगवेज स्कोर (TOEFL / IELTS ) आणि इतर गोष्टींसह आपण पात्र आहोत की नाही हे कळू शकते. युनिव्हर्सिटीनी गेल्या वर्षी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आणि अन्य माहिती वेबसाईटवर दिलेली असते. शिवाय तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही माहिती मिळू शकते.

रॅंकिंग (Ranking) 

कुठलाही विद्यार्थी युनिव्हर्सिटीला अर्ज करताना रॅंकिंगहा एकच निकष लावतो. पण तेवढाच विचार न करता आपल्याला नेमकं काय हवंय? त्यात ही युनिव्हर्सिटी बसते का? याचा आधी सारासार विचार करूनच युनिव्हर्सिटी निवडायला हवी. रॅंकिंग ठरवताना बरेचसे निकष ठरलेले असतात. त्या सर्वांचा विचार करून युनिव्हर्सिटीचे रॅंकिंग ठरवले जाते. ते सर्व निकष आपल्याला युनिव्हर्सिटी निवडताना लागू होत आहेत का, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. नुसतंच रँकिंगला महत्व न देता आपण जो कोर्स करणार आहे त्याचा करिक्युलम पण बघायला हवा. बरेचसे रॅंकिंग इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्यापैकी यूएस न्यूज रॅंकिंग विश्वासार्ह मानायला हरकत नाही.

संशोधनाचा दर्जा 

अर्ज करताना त्या युनिव्हर्सिटीत कुठले संशोधन सुरु आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. युनिव्हर्सिटीत प्रत्येक विभागाच्या वेबसाईटवर याबद्दलची माहिती असते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्या त्या विभागाला ईमेल करून माहिती घेता येते. तिथले प्राध्यापक कुठले संशोधन करत आहेत, त्या त्या विभागात संशोधनावर किती खर्च केला जातो हे पाहूनच त्या युनिव्हर्सिटीत अर्ज करणे महत्वाचे आहे. जितका खर्च संशोधनावर जास्त तेवढी युनिव्हर्सिटी चांगली आहे, असे ढोबळमानाने ठरवायला हरकत नाही. 

प्राध्यापक 

आपल्याला कोण शिकवणार आहे हे सर्वात महत्वाचे आहे. प्रत्येक प्राध्यापकाचे संपूर्ण प्रोफाईल युनिव्हर्सिटीने दिलेलं असतं. त्यांनी कुठले संशोधन केले आहे किंवा करत आहेत, हे देखील दिलेलं असतं. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये किती रिसर्च पेपर प्रसिध्द केले आहेत, हे देखील नमूद केलेले असते. ह्या सर्वांचा नीट अभ्यास करायला हवा. 

प्राध्यापक – विद्यार्थी रेशो  

ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. आपल्याकडे एका विभागात विद्यार्थी तर खूप असतात. पण त्यांना शिकवणारे प्राध्यापक मात्र कमी असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष देणे शक्य होत नाही. अमेरिकेत जवळपास प्रत्येक युनिव्हर्सिटीत हा दर्जा उत्तमरित्या पाळला जातो. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष देता यावे. 

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया 

सध्या शिकत असलेल्या त्या त्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे उपयोगी ठरू शकते. याबाबत एक महत्वाची काळजी घ्यायला हवी. जी युनिव्हर्सिटी तुम्ही बघत आहात, त्या युनिव्हर्सिटीमधल्या विद्यार्थ्यांशी तुम्ही बोलू शकता. अर्थात प्रत्येकाचं मत त्यांना आलेल्या अनुभवावरून ठरतं. त्यामुळे फक्त एक दोघांशी न बोलता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी बोलणं ठीक राहील. यामुळे त्या युनिव्हर्सिटी बद्दल अधिक जाणून घेता येईल आणि त्यानुसार निर्णय घेता येईल. 

Acceptance Rate

किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा याबाबतीत प्रत्येक युनिव्हर्सिटीची पॉलिसी ठरलेली असते. थोडक्यात 100 अर्जांमागे किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा हे युनिव्हर्सिटी ठरवते. जिथे हा रेट जास्त असतो, तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थात त्या युनिव्हर्सिटीच्या असलेल्या सगळ्या अटींची पूर्तता केल्यावर. एक्सेप्टन्स रेट वेबसाइट वर दिलेला असतो.

हवामान 

अमेरिकेतील हवामान हे प्रत्येक राज्यानुसार बदलते. विद्यापीठ ठरवताना हवामान हा खूप महत्वाचा घटक नसला, तरी जर थंड वातावरण मानवत नसेल तर तिथे न गेलेले बरं. 

लोकेशन 

युनिव्हर्सिटी कुठल्या भागात आहे हे बघणे आवश्यक असले तरी फक्त लोकशन वरून युनिव्हर्सिटीची निवड करू नये. सांगितलेल्या या बाबींचा विचार करावा. युनिव्हर्सिटी काय गुणवत्तेची आहे, हे  युनिव्हर्सिटीच्या लोकेशनपेक्षा जास्त महत्वाचे आहे. 

थोडक्यात युनिव्हर्सिटी निवडताना आपल्या मित्राने किंवा एखाद्या नातेवाईकाने कुठे अर्ज केला, यापेक्षा तुम्हाला स्वत:ला काय करायचे आहे हे जास्त महत्वाचे आहे. स्वत:च्या शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा नीट विचार करून युनिव्हर्सिटी निवडावी. यामुळे व्यवस्थित विद्यापीठ निवडले जाऊन पुढचा होणारा त्रास वाचू शकेल.

4 Comments

  • Medha kulkarni

    Khup chan

  • नितीन पाटील

    एकदम उपयुक्त माहिती. पालकांना सुद्धा फायदेशीर आहे.

  • Bhagyashree

    पूर्ण माहिती दिल्याने लेख विद्यार्थी आणी पालक दोघांसाठी उपयुक्त आहे.मस्त.पुढील भागाच्या प्रतीक्षेत.. कीप इट अप..👌👍👏👏

  • Tushar Ramakant Patil

    Great help and guidance from a great guide

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 Responses

  1. पूर्ण माहिती दिल्याने लेख विद्यार्थी आणी पालक दोघांसाठी उपयुक्त आहे.मस्त.पुढील भागाच्या प्रतीक्षेत.. कीप इट अप..👌👍👏👏

  2. एकदम उपयुक्त माहिती. पालकांना सुद्धा फायदेशीर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Surya devta : सूर्याच्या मकरसंक्रमणाचा दिवस म्हणजे मकरसंक्रांती. म्हणजेच या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ह्या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात
Snoring a health Issue : घोरणारी माणसे तशी सुखी असतात. कारण ते घोरतात किंवा किती मोठ्या प्रमाणात घोरतात हे त्यांना
Fake reviews : ऑनलाइन खरेदी करताना फेक रिव्ह्यू म्हणजेच खोटे रिव्ह्यूज ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते. फेक रिव्ह्यू ग्राहकांची दिशाभूल

विधानसभा फॅक्टोइड

जालना : शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा काँग्रेसचे  उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा आरोप. गोरंट्याल यांनी संभाजीनगर खंडपीठात दाखल केली याचिका.