पाण्यातले ‘कुदळे’ 

ibis : आपल्याकडे आढळणारा काळा कुदळ्या हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात आणि डोक्यावर गडद लाल धब्बा असतो.
[gspeech type=button]

पाणथळीच्या जागा ह्या नेहमीच वैविध्यपूर्ण जैवविविधता असणारे अधिवास असतात. यात पाण्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने राहणाऱ्या अनेक  प्राणी, पक्षी, मासे, कीटक यांच्या जाती तिथे मुबलक प्रमाणात बघायला मिळतात. ही पाणथळीची जागा जेवढी जुनी आणि मोठी तेवढीच तिकडची जैवविविधता जास्त असते. या पाणथळीच्या जागांमध्ये नद्या, मोठे तलाव, खाड्या, धरणांचे पाणी साठवण्याचे जलाशय असे वेगवेगळे प्रकार येतात. 

भारतात 23% पक्षी पाणथळीचे

भारतात सापडणाऱ्या 1230 पक्ष्यांच्या जातींपैकी 23% जाती ह्या पूर्णपणे या पाणथळी प्रदेशांवर अवलंबून असतात. या पाणपक्ष्यांमधे अनेक प्रकारची बदके, हंस, पाणकावळे, पाणकोंबड्या, बगळे, करकोचे, चमचे, कुदळे असे अनेक पक्षी येतात. पूर्वी पक्षी अभ्यासकांनी बगळे, करकोचे, चमचे आणि कुदळे यांची एकत्र वर्गवारी केली होती. सध्या मात्र अगदी नविन वर्गिकरणांच्या नियमांमुळे चमचे आणि कुदळे हे वेगळ्या वर्गात समजले जातात. आकाराने मोठे असणारे हे पक्षी उडण्यात पण तरबेज असतात. आपल्या लांबलचक पंखांनी ते पाण्याच्या जलशयावर हवेत संथपणे तरळताना हमखास दिसतात. ह्या दोन्ही जातींच्या पक्ष्यांच्या चोची खास आकाराच्या असतात. चमचे या पक्षांच्या चोची लांब आणि चमच्यासारख्या असतात तर कुदळ्यांच्या चोची लांब, खाली वाकलेल्या आणि एखाद्या कुदळीच्या पात्यासारख्या असतात. ह्या लांब आणि वक्राकार चोचीमुळे त्यांना चिखलाच्या आत दडलेले प्राणी, खेकडे, मासे पकडणे सोपे जाते. 

कुदळ्या पक्षाच्या दोन जाती

आपल्याकडे आढळणारा काळा कुदळ्या हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात आणि डोक्यावर गडद लाल धब्बा असतो. नर, मादी हे दोघेही दिसायला सारखेच असतात. हा पाणपक्षी रात्री रहायला उंच झाडांवर जातो. हल्ली तर हे काळे कुदळे अगदी गजबजलेल्या शहरांमध्येही दिसतात. उंच झाडे अथवा इलेक्ट्रिक / मोबाईल टॉवर्स हे आपल्याला दिसून येतात. ह्याच्या इतर भाउबंदांसारखा मात्र तो कायम पाण्याजवळ आढळत नाही. कधी कधी दाट जंगलांमध्येही हा दिसून येतो.

ह्याच्या सारखाच दुसरा कुदळ्या म्हणजे चमकदार कुदळ्या. ही जात भारतात जास्त सहज आणि सर्वत्र आढळते. आकाराने हे इतर कुदळ्यांपेक्षा लहान असतात. दुरून जरी हे काळेच भासत असले तरी त्यांचा रंग अगदी झळाळणाऱ्या निळ्या, जांभळ्या, हिरव्या रंगाचा असतो. याचमुळे त्यांचे इंग्रजी नाव ‘ग्लॉसी ईबीस’ असे आहे. विणीच्या हंगामात यांचे रंग अजून जास्त झळाळणारे होतात. उडताना बगळ्यांप्रमाणे मान आखडून न घेता, ती लांबलचक ठेवून ते उडतात. काळा कुदळ्या हा सहसा एकेकटा किंवा जोडीने राहतो.  हे चमकदार कुदळे मात्र नेहमीच मोठ्या संख्येच्या थव्याने रहातात. पाणथळी जागेत एकत्र ह्या 10-15 पक्ष्यांना मासे मारताना बघणे म्हणजे खरोखरच मनोहारी दृष्य असते. 

लगेच नजरेस पडणारे स्थलांतरीत पक्षी

हे स्थलांतरीत पक्षी असल्यामुळे अर्थातच यांना बघण्याचा योग्य हंगाम म्हणजे थंडीचा असतो. साधरणत: ऑक्टोबरपासुन पुढे ते आपल्याकडे दिसायला लागतात. चमकदार कुदळ्यांना बघायला अगदी खास कुठल्या मोठ्या भरतपूर सारख्या पक्षी अभयारण्यात जायची गरज नाही. कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेर तलाव, पाणथळीची जागा असेल तर तिथे हे हमखास आढळणार. आकाराने जरी हे मोठे असले तरी ते सहसा आपल्याला फारसे जवळ येऊ देत नाहीत. त्यामुळे यांच्या फोटोग्राफीकरता जर लांब पल्ल्याची लेन्स असेल तर आपल्याला यांचे उत्तम फोटो काढता येतात. डिसेंबर महिन्यात मी बांधवगडच्या जंगालात गेलो असताना, जंगलात जायचे परमीट काढायला आमची जीप रांगेत उभी होती. तिथे बाजूच्या झाडावर हा काळा कुदळ्या भर उन्हात चमकत होता. दुपारच्या उन्हात त्याचे काळे, निळे चमकणारे पंख आणि पिवळा धम्मक डोळा अगदी उठून दिसत होता. तो सुद्धा बहुतेक निवांत होता. त्यामुळे त्याचे आम्हाला खूप फोटो काढता आले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि
Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ