मुलांच्या उच्च शिक्षण खर्चाचे नियोजन

children's higher education expenses : मुलांच्या उच्च शिक्षण खर्चाच्या योग्य नियोजनाची सुरुवात मुलांच्या लहानपणापासूनच केली तर हा आर्थिक भार नक्कीच सहज पेलवला जाऊ शकतो. आता मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाच्या नियोजनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
[gspeech type=button]

आयुष्यातले सर्वसाधारण मोठे खर्च बघितले तर एक महत्त्वाचा खर्च असतो, तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा. योग्य आर्थिक नियोजन याचा भार कसा कमी करू शकतो, ते या लेखात पाहूया..

शैक्षणिक खर्चाचे दोन टप्पे

मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा साधारण दोन टप्प्यात विभागला जाऊ शकतो. पहिला टप्पा म्हणजे दहावीपर्यंतच शिक्षण जो एकूण खर्चाच्या साधारण 30% च्या आसपास असतो (20 वर्षांपूर्वी हा खर्च एकूण खर्चाच्या 10-15% च होता, पण सध्याच्या शाळेच्या वाढत्या फी बघता तो आता 30% पर्यंत पोचला आहे)

पण ह्या पहिल्या टप्प्याचा कालावधी सुद्धा जास्त असतो. नर्सरी पासून दहावीपर्यंत म्हणजे 13 वर्षाचा काळ, त्यामुळे ह्या खर्चासाठी वेगळी तरतूद केली जात नाही किंवा ती करायची गरज भासत नाही आणि तो निभावला जातो..

दुसऱ्या टप्प्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक

पण खरी कसोटी असते ती म्हणजे दुसऱ्या टप्प्यातल्या खर्च उभा करायची. कारण त्यामध्ये एकूण खर्चाच्या 70% रक्कम लागते आणि ती रक्कम दहावीनंतर 5-7 वर्षात खर्च होणार असते. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याच्या खर्चाचे योग्य आर्थिक नियोजन नसेल तर पळता भुई थोडी होऊ शकते. अशा वेळी दोनच पर्याय उरतात एक म्हणजे त्यासाठी कर्ज घेणे किंवा जी काही जमलेली गुंतवणूक आहे, ती या खर्चासाठी वापरणे आणि ह्या दोघांपैकी कोणताही पर्याय आपल्याला आर्थिक दृष्ट्या 5-10 वर्ष मागे ढकलतो.

त्यामुळे या खर्चाच्या योग्य नियोजनाची सुरुवात मुलांच्या लहानपणापासूनच केली तर हा आर्थिक भार नक्कीच सहज पेलवला जाऊ शकतो. आता मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाच्या नियोजनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत –

PPF (Public Provident Fund) –

सर्वसामान्य जनतेचा आवडता ऑप्शन म्हणजे PPF. सरकारमान्य सेविंग्ज स्कीम अर्थात या गुंतवणूकीला 15 वर्षाचे बंधन घातलेले आहे. मुलांच्या नावाने यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. मुलांच्या शिक्षणासाठी यामधून पैसे काढून घेता येऊ शकतात. या गुंतवणुकीवर 80C खाली टॅक्स मध्ये सवलत देखील मिळते त्यामुळे हा ऑप्शन जास्त पसंतीस उतरतो. सध्या यामध्ये 7.1% व्याजदर चालू आहे, जो प्रत्येक 3 महिन्यांनी ठरवला जातो. यामध्ये दरवर्षी 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

बँक FD / RD –

गुंतवणुकीचा सगळ्यात सोपा पर्याय. यामध्ये मुलांच्या नावाने आपण गुंतवणूक करू शकतो. 7-8% च्या दरम्यान व्याजदर मिळतो. मोठ्या कालावधीसाठी या ऑप्शन मध्ये गुंतवणूक टिकवून ठेवणे थोडे कठीण होते, कारण ही गुंतवणूक कधीही मोडता येऊ शकते आणि ती इतर दुसऱ्या कारणासाठी वापरली जाऊ शकते.

ULIP Child Plans –

इन्शुरन्स आणि गुंतवणूकीचे मिक्स प्रॉडक्ट म्हणजे ULIP Child Plans. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीत मुलांच्या ठराविक वयाप्रमाणे त्यांना काही रक्कम मिळते. ही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते. ULIP प्लॅन्स मधली गुंतवणूक ही काही अंशी शेअर मार्केट मध्ये केलेली असल्यामुळे यात मिळणारे रिटर्न्स शेअर मार्केटच्या चढउतारा प्रमाणे वरखाली होऊ शकतात. पण यामध्ये असलेल्या चार्जेसमुळे शेअर बाजारापेक्षा यामध्ये रिटर्न्स कमी मिळतात.

म्युचुअल फंडात SIP

मुलांच्या नावाने म्युचुअल फंडात SIP द्वारे किंवा एकाच वेळी मोठ्या रकमेची देखील गुंतवणूक केली जाऊ शकते. मोठ्या कालावधीसाठी या प्रकारात गुंतवणूक केल्यास यामध्ये इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायापेक्षा जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण ही गुंतवणूक पूर्णपणे शेअर बाजारात केली जात असल्याने, त्याच्या चढउतरांना सामोरे जायची तयारी असायला हवी. मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास मार्केटच्या चढउताराची रिस्क काही प्रमाणात कमी होते.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

सरकारमान्य असणारी सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी तयार केलेली गुंतवणूक योजना आहे. यामध्ये सध्या 8.2% चा व्याजदर मिळत आहे. यामध्ये देखील PPF प्रमाणेच दरवर्षी 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर यातील रक्कम शिक्षणासाठी काढता येते. वयाच्या 21 वर्षांनंतर हे अकाउंट बंद होते. यावर मिळणारे व्याज पूर्णपणे टॅक्स-फ्री आहे.

वरील सर्व पर्याय बघितल्यावर, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आणि वाढत्या महागाईचा विचार करता 2 प्रमुख गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. पहिली गोष्ट गुंतवणूक ही मोठ्या कालावधीसाठी केली गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गुंतवणूकीवर महागाईपेक्षा जास्त परतावा मिळाला पाहिजे. ज्यामुळे आपल्याला भविष्यात लागणारी रक्कम उभी करता येऊ शकेल.

बँक FD / RD आणि ULIP प्लॅन्स महागाईपेक्षा जास्त परतावा देण्यास बहुतांश असमर्थ ठरतात. आणि PPF / SSY योजनांमध्ये असणारे गुंतवणुकीच्या कालावधीचे बंधन आणि कमाल गुंतवणुकीचे बंधन बघता, सगळ्यात योग्य पर्याय म्युचुअल फंडात गुंतवणूक हा ठरतो…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची
Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे
Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ