उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? 

Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात बदल करणे आणि त्वचेला योग्य प्रकारे संरक्षण देणे अत्यंत गरजेचे ठरते.
[gspeech type=button]

उन्हाळा ऋतू आपल्या शरीरावर आणि त्वचेवर विविध प्रकारचे परिणाम करतो. तापमान वाढल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होण्याचा धोका वाढतो.  ज्यामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, पोटाचे विकार, त्वचेचे विकार आणि फंगल इन्फेक्शन यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात बदल करणे आणि त्वचेला योग्य प्रकारे संरक्षण देणे अत्यंत गरजेचे ठरते.

फंगल इन्फेक्शन 

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये  फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. जास्त घाम येणे, त्वचेला सतत ओलसरपणा राहणे आणि शरीराचे योग्य प्रकारे स्वच्छ न राहणे यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. घामोळी, लालसर पुरळ, खाज येणे अशा समस्या उष्णतेच्या मुळे वाढतात. त्यामुळे रोज अंघोळ करून त्वचेला कोरडे ठेवणे, हलके आणि सुती कपडे परिधान करणे. गरज वाटल्यास lulicanazole किंवा clobetasol सारखी क्रीम डॉक्टरच्या सल्ल्याने वापरणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला फंगल संसर्ग अधिक वाढू शकतो, म्हणून उन्हाळ्याच्या शेवटी विशेष दक्षता घ्यायला हवी.

शरीरामध्ये पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवणे

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. दिवसभरात सातत्याने पाणी प्यावे, गरजेनुसार ताक किंवा फळांचे रस घ्यावेत. परंतु पॅकबंद किंवा साखर मिसळलेले पेय टाळावीत. गरम तेलकट पदार्थ टाळून, हलका आहार घ्यावा. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात थेट फिरणे शक्यतो टाळावे आणि फिरावेच लागल्यास डोक्यावर कापडी टोपी घालावी.

हे ही वाचा : उन्हाळ्यातील आहाराची काळजी

प्रखर सुर्यकिरणापासून काळजी घ्या

उन्हाळ्यात त्वचेला सुर्यप्रकाशाच्या प्रखर किरणांपासून वाचविणे देखील तितकेच आवश्यक आहे. सुर्यप्रकाशातील UVA आणि UVB किरणे त्वचेवर थेट परिणाम करतात. त्यामुळे त्वचेवर टॅनिंग, काळसर डाग, सुरकुत्या, त्वचेची जळजळ आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. यासाठी योग्य सनस्क्रीनचा वापर करणे अत्यावश्यक आहे. सनस्क्रीनवर लिहिलेले SPF म्हणजे Sun Protection Factor, जो सुर्यप्रकाशापासून संरक्षण करण्याची क्षमता दर्शवतो. SPF 30 असलेला सनस्क्रीन साधारण रोजच्या वापरासाठी योग्य मानला जातो. जसे ऑफिसला जाताना किंवा घराजवळ फिरताना. SPF 50 किंवा त्याहून अधिक असलेला सनस्क्रीन, विशेषतः SPF 80 आणि SPF 100+, उन्हामध्ये जास्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींनी वापरणे योग्य असते. जसे बीचवर जाताना, ट्रेकिंग करणे किंवा मैदानी खेळ खेळताना सनस्क्रिनचा उपयोग करावा.

वॉटरप्रुफ सनस्क्रिन उपयुक्त

याशिवाय, उन्हाळ्याच्या काळात जलरोधक (waterproof) सनस्क्रीन वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते, कारण घाम किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यावरही तो त्वचेवर टिकून राहतो. त्वचेच्या संवेदनशीलतेनुसार योग्य सनस्क्रीन निवडणे आवश्यक आहे. म्हणजेच कोरड्या (dry) त्वचेसाठी क्रीमी बेस सनस्क्रीन आणि तेलकट त्वचेसाठी जेल बेस सनस्क्रीन योग्य ठरते. सनस्क्रीन चेहरा, मान, हात, कान यासारख्या उघड्या राहणाऱ्या भागावर पुरेसं लावलं पाहिजे आणि दर तीन तासांनी पुन्हा लावणे गरजेचे असते.

शरीर आणि त्वचेची अशी समर्पक काळजी घेतल्यास उन्हाळ्याचे त्रास टाळता येतात आणि ऋतूचा आनंद आरोग्यपूर्ण पद्धतीने घेता येतो.

 पुढच्या भागात वाचूया हेअर केअर.

4 Comments

  • Neelam K

    Great article as always!!!!

  • Madhavi Manohar

    नेहमी प्रमाणे उपयुक्त

  • Meena Dumbre

    Thank you so much for this useful information 🙏

  • MRS. MEDHA B. PATHAK

    डॉक्टर , तुम्ही केलेल्या सूचनांंचं प लन केलं की कुठलाही त्रास जाणवत नाही उलट त्याचा फायदाच होतो. धन्यवाद. क्रीमी बेस सनस्क्रीन तुमच्याकडे उपलब्ध आहे का ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 Responses

  1. डॉक्टर , तुम्ही केलेल्या सूचनांंचं प लन केलं की कुठलाही त्रास जाणवत नाही उलट त्याचा फायदाच होतो. धन्यवाद. क्रीमी बेस सनस्क्रीन तुमच्याकडे उपलब्ध आहे का ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे
ज्ञान देणारी पुस्तकं ही आपली खरी संपत्ती असतात. काळ, काळानुसार आपण पुढे सरकत असतो. आपलं श्रीमंत साहित्य हे आजच्या सिनेमांसाठी
Bhagwan Parashuram: राजाकडून वडिलांचा अमानुष वध झाल्यामुळे परशुराम संतप्त झाला. नर्मदा आणि बुधनेर नदीच्या संगमस्थळी जावून, आपल्या ओंजळीत संगमाचे पाणी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ