केस गळती, केसाची वाढ न होणे, केसांची गुणवत्ता कमी होणे किंवा टक्कल पडण्यासारख्या समस्यांसाठी सध्या विविध advanced ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. या ट्रीटमेंट्स पारंपरिक घरगुती उपायांपेक्षा वेगळ्या, क्लिनिकल आणि scientifically backed असतात. अनेक वेळा हे ट्रीटमेंट्स त्वचारोग तज्ज्ञ (Dermatologist) किंवा हाय एंड सलूनमध्ये केले जातात. केसांच्या वाढीसाठी, पोषणासाठी आणि सौंदर्यासाठी काही लोकप्रिय ट्रीटमेंट्स खाली दिल्या आहेत.
1. हेअर स्पा
ही सर्वात बेसिक ट्रीटमेंट असून ती केसांना हायड्रेशन (Hydration) आणि नरिशमेंट (Nourishment) देण्यासाठी केली जाते. या प्रक्रियेमध्ये केसांना तेल लावून मसाज, स्टीमिंग आणि मग डीप कंडिशनिंग मास्क लावणे यांचा समावेश असतो. हे केस मऊ, चमकदार आणि निरोगी बनवते. दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एकदा केली जाते. (किंमत: ₹800 ते ₹2500 पर्यंत). दुष्परिणाम फारसे नसले तरी केमिकल प्रॉडक्ट्स असल्यास अॅलर्जी होण्याची शक्यचा असते.
2.PRP- प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरेपी (Platelet Rich Plasma Therapy)
ही ट्रीटमेंट टक्कल पडणे किंवा तीव्र केसगळती असणाऱ्यांसाठी केली जाते. रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातून प्लेटलेट्स वेगळे करून ते स्काल्पमध्ये इंजेक्ट केले जातात. यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स केसांच्या फॉलिकल्सना उत्तेजित करून नवीन केसांची वाढ करतात. याच्या 3–6 सीटिंग्ज कराव्या लागतात. (किंमत: ₹4000 ते ₹10,000 एका सत्रासाठी.)
दुष्परिणाम: इंजेक्शनमुळे थोडी सूज, लालसरपणा होऊ शकतो.
3. मेसोथेरेपी (Mesotherapy)
या ट्रीटमेंटमध्ये केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यासाठी स्काल्पमध्ये व्हिटामिन्स (vitamins), मिनरल्स (minerals) आणि अमिनो अॅसिड्सचे (amino acids) चे मिश्रण इंजेक्ट केले जाते. हे केसांची वाढ सुधारते. यासाठी अनेक सत्र आवश्यक असतात. (किंमत: ₹3000 ते ₹8000.)
दुष्परिणाम: सौम्य वेदना, सूज, स्किन सेंसिटिव्हिटी होऊ शकते.
4. लेझर हेअर थेरेपी (Laser Hair Therapy)
लो लेव्हल लेझर थेरेपी (LLLT) ही एक FDA-approves ट्रीटमेंट आहे. स्काल्पवर लेसर प्रकाश टाकून रक्ताभिसरण सुधारले जाते, ज्यामुळे केसांची वाढ होते. घरच्या घरी वापरण्याचे उपकरणही मिळते. (किंमत: ₹4000 ते ₹15000 सत्रांवर अवलंबून.)
दुष्परिणाम: कमी पण दीर्घकालीन वापर लागतो.
हेही वाचा: सौंदर्यपूर्ण, आरोग्यदायी केस
5.स्टेम सेल थेरेपी (Stem Cell Therapy)
यामध्ये स्टेम सेल्सद्वारे केसांच्या रूट्समध्ये नवीन पेशी निर्माण करून केसांची वाढ घडवून आणली जाते. हे तंत्रज्ञान खूपच महाग आहे आणि केवळ काही ठिकाणीच उपलब्ध आहे. (किंमत: ₹50,000 ते ₹1,50,000 एकूण पद्धतीनुसार.) दुष्परिणाम: अजूनही संशोधन चालू असल्यामुळे परिणाम निश्चित नाहीत.
6. हेअर ट्रान्सप्लांट (FUE/ FUT Method)
या प्रक्रियेमध्ये डोक्याच्या मागील भागातून केसांचे फॉलिकल्स घेऊन पुढील बाजूस, टक्कल असलेल्या भागात लावले जातात. FUT ही पद्धत थोडी invasive असून FUE ही सध्या सर्वाधिक वापरली जाणारी modern पद्धत आहे. हे permanent solution मानले जाते. (किंमत: ₹30,000 ते ₹2,00,000 केसांच्या संख्येनुसार.)
दुष्परिणाम: सूज, स्कॅरिंग, इन्फेक्शनचा धोका असतो.
7. बोटॉक्स फॉर हेअर
बोटॉक्स केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर केसांसाठीसुद्धा वापरला जातो. यामध्ये केसांच्या क्यूटीकल्स (cuticles) मध्ये फीलर्स (fillers) वापरले जातात जे केसांना स्मूद आणि ताठ करतात. ही ट्रीटमेंट केसांना तात्पूरता मऊ करते पण ती केसांची वाढ करत नाही.( किंमत: ₹5000 ते ₹12,000.)
8.केरेटाइन आणि सिस्टीन ट्रीटमेंट (Keratin आणि Cysteine Treatment)
या दोन्ही ट्रीटमेंट्स केसांना स्ट्रेट आणि फ्रिझ-फ्री करण्यासाठी केल्या जातात. केराटिन ट्रीटमेंटमध्ये फार्माल्डिहाइड हा घटक असतो जो काही वेळा स्काल्प इरिटेशन करू शकतो. सिस्टीाईन तुलनेत सुरक्षित मानले जाते. दोन्ही ट्रीटमेंट्सचा केसांच्या वाढीशी थेट संबंध नसतो. (किंमत: ₹4000 ते ₹15,000).
हेही वाचा : केसाच्या वाढीसाठी उपयुक्त तेल
9. स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग – केस सरळ करण्याच्या आधुनिक पद्धती
केस कुरळे, फ्रीझी किंवा अनियमित पोताचे असतील, तर अनेकजण केस सरळ व मृदू दिसण्यासाठी सलूनमध्ये स्मूदनिंग किंवा स्ट्रेटनिंग सारख्या पद्धतींचा आधार घेतात. ह्या दोन्ही ट्रीटमेंट्स सौंदर्याच्या दृष्टीने प्रभावी वाटतात, पण त्यांचा दीर्घकालीन परिणाम समजून घेणे अत्यावश्यक आहे.
स्मूदनिंग:
ही प्रक्रिया केसांतील नैसर्गिक लहरी/कर्ल कमी करून त्यांना सरळ, मऊ व फ्रिझ-फ्री बनवते. यामध्ये मुख्यत्वे ‘formaldehyde’ अथवा त्याचे derivatives असलेले केरॅटिन किंवा सिलिकॉन-बेस्ड प्रॉडक्ट्स वापरून केसांच्या बाह्य थराला स्मूद केले जाते. नंतर उच्च तापमानावर स्ट्रेटनिंग आयर्न वापरून केसांना हवे तसा पोत दिला जातो.
स्मूदनिंगचा परिणाम साधारणतः 3 ते 6 महिने टिकतो. केस नैसर्गिक स्वरूपातच राहतात, पण अधिक व्यवस्थित होतात.
स्ट्रेटनिंग :
ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये केसांचा नैसर्गिक पोत पूर्णपणे बदलून त्यांना पूर्णपणे सरळ केले जाते. यामध्ये Sodium Hydroxide, Ammonium Thioglycolate सारख्या स्ट्राँग केमिकल्सचा वापर केला जातो. एकदा केस स्ट्रेट झाले की ते कायमच तसे राहतात, नवीन वाढणारे केस मात्र मूळ पोताचेच असतात.
हे अधिक दीर्घकालीन उपाय असले तरी केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत खूप नुकसान करते. केस निस्तेज, कोरडे आणि तुटणारे होऊ शकतात. फॉलिकल्स कमजोर होतात आणि केसगळती सुरू होऊ शकते.
दोन्ही पद्धतींचे दुष्परिणाम:
केसांची नैसर्गिक ताकद कमी होते
फॉलिकल्सवर दाब निर्माण होतो
केस पातळ होण्याची शक्यता निर्माण होते
डोक्याला खाज, लालसरपणा किंवा अॅलर्जी होऊ शकते
दीर्घकालीन वापर केल्यास टक्कल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही
किंमत: स्मूदनिंग: ₹5000 ते ₹10,000 तर स्ट्रेटनिंग: ₹6000 ते ₹15,000 (केसांच्या लांबी आणि सलूनच्या दर्जावर अवलंबून असते.)
निष्कर्ष :
केसांवर विविध ट्रीटमेंट्स उपलब्ध असल्या तरी त्यांचे फायदे, खर्च, दुष्परिणाम आणि किती काळ टिकेल हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे, केसांच्या गळतीच्या मूळ कारणांचा शोध घेणे आणि जीवनशैलीत योग्य तो बदल करणे हाच केसांच्या खऱ्या आणि
नैसर्गिक आरोग्याचा पाया आहे जाहिरातींना आणि आकर्षक सवलतींना भुलून न जाता वैद्यकीय सल्ल्यानेच ट्रीटमेंट ठरवावी.
4 Comments
तरुण मुलींचे केस छान दिसतात त्याचं कारण समजल
मोलाची माहिती.घरगुती उपाय सांगितल्यास त्याचा अवलंब करता येईल.
Very good information 👌 Thanks for sharing 😊
डॉक्टर , तुम्ही नेहमीच उपयोगी माहिती देत असता पण काही ट्रीटमेंट्सच्या वेळी लागणारा खर्च पाहता हे करणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय सांगितले तर खूप बरं होईल. मुळात मला वेगवेगळ्या केमिकल्सच्या वासांचा त्रास होतो. मी घरगुती उपायांवर भर देण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.