सॅलेड क्वीन – शालिनी टेकाळे

Shalini's Salad : शिक्षिका म्हणून नोकरी करणारी मुलगी अचानक करिअरचा ट्रॅक बदलते आणि तिच्या गावात ज्याची रेसिपीसुद्धा कोणी ऐकली नसेल अश्या हेल्दी सॅलॅडसचा व्यवसाय सुरू करते. आज 'शालिनीज सॅलेडस' च्या पाच शाखा असून साधारण 1 कोटीची उलाढाल होत असते.
[gspeech type=button]

शिक्षिका म्हणून नोकरी करणारी मुलगी अचानक करिअरचा ट्रॅक बदलते आणि तिच्या गावात ज्याची रेसिपीसुद्धा कोणी ऐकली नसेल अश्या हेल्दी सॅलॅडसचा व्यवसाय सुरू करते. आणि हो व्यवसाय फक्त सुरू करत नाही तर आपल्या व्यवसायाची उलाढाल एक कोटींच्या घरात नेऊन पोहचवते. जिच्या नावानेच ‘ शालिनीज सॅलेडस’ या ब्रॅंडला चार चांद लागले आहेत, त्या कर्तुत्त्ववान तरूणीचे नाव आहे- शालिनी श्रीराम टेकाळे.

परभणी ते पुणे

परभणीच्या इठलापूर नावाच्या छोट्याश्या खेड्यातला तिचा जन्म. वडिलांचे किराण्याचे छोटेसे दुकान, आईला अक्षरओळख नाही, पण ती व्यवहारात मात्र चोख. आजूबाजूला मुलींना फार शिकवू नये, शिकून सवरून करणार काय- भाकरीच तर थापायच्या, संसार तर करायचाय असं टिपिकल मराठवाडी वातावरण. या वातावरणात दोन भावांच्या सोबतची ही हुशार बहीण जिद्दीने शिकते. आई- वडील मुलीची हुशारी बघून आधी शिकायला परभणीला आणि नंतर पुण्याला डीएड करायला पाठवतात. चांगल्या गुणांनी डीएड करून नात्यातल्याच एका विचारी मुलाशी तिचं लग्न होतं. इथपर्यंत सगळं आयुष्य पठडीबद्ध चाललेलं असतं, पण पुढे ही अचानक ट्रॅक बदलते. पुण्यात ‘शालिनीज सॅलेडस’ च्या चार शाखा आहेत आणि ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेटमध्ये ही एक शाखा आहे. पुण्यातील दोन शाखा शालिनी स्वत: चालवतात तर इतर तीन शाखा पार्टनरशिपमध्ये आहेत. 

शिक्षिका ते सॅलॅड मेकर

शालिनी म्हणतात, “आमचं सगळं छान चाललं होतं. मी ग्राममंगलच्या शाळेत नोकरी करत होते. लग्नाला तीन वर्षं झाली माझ्या मुलाचा दिगंतचा जन्म झाला आणि छोटा ब्रेक घ्यायचा मी ठरवला. दरम्यान माझे पती श्रीराम टेकाळे यांनीही त्यांचा नवा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला त्याच्या व्यवसायात अकाऊंटिंग वगैरेची मदत मी करायला लागले. त्या काळात नवीन व्यवसाय, खूप कष्ट, खाण्यापिण्याची अवेळ यामुळे श्रीरामचे वजन थोडे वाढले होते, आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं या भावनेतून तो पुण्यातल्या विमाननगरमधून अधूनमधून सॅलॅडस मागवायचा. ते मीही चाखून पाहिले, महाग असणारे हे सॅलॅडस मी ही घरी बनवू शकते, हे माझ्या लक्षात आलं. स्वयंपाकाची मला आवड होतीच, मी घरीच प्रयोग केले आणि ते सॅलॅडस छानच बनत होते, इतके चांगले की ‘शालिनी, तू याचा व्यवसाय सुरू करायला हवास,’ असं श्रीराम सारखं म्हणायचा. 

सॅलेड बनवण्याचे व्यावसायिक शिक्षण

पुण्यात फूड बिझनेसला अतिशय स्कोप आहे हे मी जाणून होते आणि माझा घरी बसण्याचा स्वभावच नव्हता त्यामुळे खरंच हा बिझनेस आपण सुरू करूयात पण त्यासाठी सॅलेडस बनवण्याचे व्यावसायिक शिक्षण घ्यायला हवे, हे मला जाणवत होतं.” पुण्यातले प्रसिद्ध शेफ विराज आठवले यांच्याकडून तीन ते चार महिने शालिनी यांनी सॅलेडस आणि वेगवेगळे ड्रेसिंग्ज बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. 

घरी प्रयोग ते मार्केटिंग स्कील्स

सॅलेडसवर स्वत:चे प्रयोग केले, स्वत:च्या सिग्नेचर रेसिपीज डेव्हलप केल्या. देशी विदेशी सॅलॅडस, आरोग्यदायी रॅप्स, सूप्स यांच्या पाककृती शिकून घेतल्या, त्यातील पोषक घटकांचा अभ्यास आणि व्यवसायाचे चोख नियोजन करण्यासाठी शालिनी यांनी चक्क अडीच वर्षांचा वेळ घेतला. याबद्दल त्या सांगतात, “ ‘अभ्यासोनी प्रगटावे’- कसलंही नियोजन न करता, वाट्टेल ती आर्थिक जोखीम उचलून मला व्यवसायात पडायचे नव्हते. आपलं नाणं खणखणीत आहे, याची जाणीव होती. पण पूर्ण तयारीनिशी, व्यवसायाच्या रिस्क्स, मार्केट रिसर्च, आपला टार्गेट कस्टमर कोण असेल, व्यवसाय कसा चालवायचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन- आपल्याकडे काम करणाऱ्यांचा किमान सहा महिन्यांचा पगार देण्याची आणि आपल्या जागेचं भाडं भरण्याची तयारी असल्याशिवाय मला मार्केटमध्ये उतरायचं नव्हतं. याशिवाय सॅलेडसच्या व्यवसायाला नाव काय द्यावं, त्याचा लोगो, डिझायनिंग हे सगळं प्रोफेशनल हवं, यासाठी आम्ही ब्रॅंडिंगवर नीट फोकस करून मगच शालिनीज सॅलॅडस सुरू केलं. अर्थात ही सगळी व्यावसायिक गणितं, आर्थिक शिस्त आणि नियोजन यात पती श्रीराम टेकाळे यांची मोलाची साथ मला होती. कारण आम्हाला हौस म्हणून व्यवसाय सुरू करायचा नाहीए, तर दीर्घ काळ व्यवसाय करायचाय, ब्रॅंड म्हणून नाव प्रस्थापित करायचं आहे हे आमच्या डोक्यात क्लिअर होतं.”

2018 मध्ये 45 हून अधिक रेसिपीजने सुरूवात

तर व्यवस्थित वेळ घेऊन स्वत:च्या 45 हून अधिक रेसिपीज तयार करून शालिनी यांनी 2018 साली घरीच कोथरूडमधून सॅलेडसचा व्यवसाय सुरू केला. काही महिन्यातच शालिनीज सॅलेडस इतकं लोकप्रिय झालं की चाळीस ते पन्नास रोजचे सबस्क्रायबर मिळाले आणि शालिनींना सुरूवातीला स्वत:ची डिलिव्हरी सिस्टीम उभारावी लागली. आणि हो हे सगळं करत असताना शालिनी दिगंत आणि दिशा अशी दोन मुलं, संसार, स्वत:चा व्यवसाय- सॅलेडस कापण्यापासून ते ड्रेसिंग बनवण्यापर्यंत आणि पॅकेजिंगपर्यंत सगळं करत होत्या, इतकंच नव्हे तर पती श्रीराम टेकाळे यांच्या व्यवसायात काम करणाऱ्या मुलांना जेवणाचे डबे सुद्धा पुरवत होत्या. 

कोविडमध्ये व्यवसाय वाढीला

घरून करत असलेल्या व्यवसायाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाला पाहून शालिनी आणि श्रीराम यांनी आता प्रत्यक्ष आऊटलेट सुरू करायचं ठरवलं. 2 ऑक्टोबर 2019 रोजी कोथरूडच्या गांधीभवनजवळ शालिनीज सॅलॅडसचं पहिलं आऊटलेट सुरू झालं. व्यवसाय सुरू केला, छान जम बसायला लागला आणि वर्षाच्या आतच कोविडचं संकट कोसळलं. कोविडच्या काळात लोकांचे व्यवसाय बंद पडत असताना शालिनी यांनी चक्क कोविडच्या पहिल्या लाटेनंतर 5 सप्टेंबर 2020 रोजी पर्वतीमध्ये शालिनीज सॅलॅडसची दुसरी शाखा सुरू केली. त्यानंतर शालिनी यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे 2023 मध्ये पुण्यातील सिंहगड रोड आणि बालेवाडी परिसरात प्रत्येकी एक शाखा सुरू केली.  डिसेंबर 2023 मध्ये पुण्याच्या बाहेर पाऊल टाकत हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथेही एक शाखा सुरू केली आहे. शालिनीज सॅलेडसच्या व्यवसायातून वीसेक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळतोय, तर डिलिव्हरीच्या माध्यमातूनही अनेकांना रोजगार मिळतोय.

काटेकोरपणा, ताजं आणि दर्जेदार

शालिनी व्यवसायाच्या प्रगतीचं गमक उलगडताना सांगतात, “पौष्टिक खाणं, सॅलॅडस म्हणजे पालापाचोळा, त्याला काय चव असणार? असले लोकांचे गैरसमज मला मोडायचे होते. हेल्दी खाणं चविष्ट असू शकतं, याच्यावर लोकांचा विश्वास बसवण्यासाठीच मी अभ्यासाचा वेळ घेतला होता. तयार केलेल्या परफेक्ट रेसिपीज प्रत्येक ब्रांचमध्ये तितक्याच परफेक्ट बनतील, यासाठी काटेकोर मोजमाप करून रेसीपीज बनवल्या. सर्व ड्रेसिंग्ज आम्ही स्वत: तयार करतो, सॅलेडससाठी लागणाऱ्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, ऑलिव्ह ऑईल आणि सर्व घटक पदार्थ अत्यंत दर्जेदार आणि दररोज ताजेच वापरतो. शिवाय तयार झालेले सॅलेड वेळेवर ग्राहकांच्या घरी कसे पोहोचेल, यासाठी पाळंदे कुरिअरच्या माध्यमातून पुण्यात डिलिव्हरी सिस्टिम राबवली आहे. त्यानंतर स्विगी, झोमॅटोवरही कनेक्ट झालो. 

ग्राहकांच्या गरजांनुसार सॅलेड

आमचा व्यवसाय मुख्यत:  सबस्क्रिप्शन बेसिसवर चालतो, त्यामुळे आमच्या ग्राहकांशी आमचा सातत्याने आणि उत्तम संवाद आहे. आमचे स्वत:चे अॅप आणि वेबसाईटही आहे. त्यात आमच्या ग्राहकांची नोंद असून प्रत्येकाचे प्रोफाईल तयार असते. त्यात कुणाला काय हवं, कुणाला कुठल्या ड्रेसिंगची अॅलर्जी आहे, कुणाला कुठल्या दिवशी नॉनव्हेज चालत नाही, कोणत्या मधुमेही ग्राहकाला साखर अजिबात नको या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येकासाठी कस्टमाईज्ड सॅलॅडस बनवली जातात. ग्राहकांचा फीडबॅक घेतला जातो, ग्राहकांच्या पसंतीला पडतील अशी आरोग्यदायी सूप्स आणि रॅप्स, थाई करी राईस बोल यांनाही उत्तम प्रतिसाद आहे.”

आंत्र्यप्रुन्यर एक्सलन्स अवार्ड

शालिनीज सॅलॅडसचा चोख व्यवहार आणि कामाप्रतीची पॅशन पाहून ‘दे आसरा’ फाऊंडेशनतर्फे 2023 सालचा आंत्र्यप्रुन्यर एक्सलन्स अवार्ड शालिनी टेकाळे यांना पर्सिस्टंट टेक्नॉलॉजिसचे संस्थापक आनंद देशपांडे आणि डीमार्टचे सीईओ नवीन नरोन्हा यांच्या हस्ते मिळाला आहे. 

7 Comments

  • प्रा.परमेश्वर वाकडे

    श्रीराम मित्रा मी तुला जवळुन ओळखतो अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेला तु आज ज्या पद्धतीने तुझ्या सहचारिणीला घेऊन यशाच्या शिखरावर आहेस हा प्रवास सहज नाही. कारण तुझा कोणी गॉडफादर नाही हे केवळ तुझं आणि तुझंच, तुझ्या जोडीदार वहीनीचच!

  • Vishakha Deshpande

    शालिनी, तुझ्याबद्दलचा हा लेख वाचताना, ती अगदी सुरुवातीची छोटीशी ग्राम मंगल मध्ये येणारी शालिनी समोर उभी राहिली आणि तुझ्याबद्दलच्या अभिमानाने उर भरून आला. तुला आणि श्रीराम यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा! अशीच उत्तरो उत्तर प्रगती कर.

  • Aniruddha Dhamane

    Congratulations, Shalini! Your dedication and hard work in building your healthy food business (Shalini’s Salad) are truly inspiring. Your journey to the top is a testament to your perseverance and passion for promoting healthier lifestyles—well done!

  • Sambhaji C

    Proud of you Shalini and Shriram Tekale

  • Parmeshwar R Pund

    खुप खुप हार्दिक अभिनंदन खरं पाहता तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.आम्हा सर्व ईठलापुर वासियांना तुझा सार्थ अभिमान आहे, Best luck bright future

    • नम्रता

      खुप खुप अभिनंदन शालिनी

  • Sangita B Pawar

    aselch Yash milat jave 💐💐❤️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 Responses

  1. खुप खुप हार्दिक अभिनंदन खरं पाहता तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.आम्हा सर्व ईठलापुर वासियांना तुझा सार्थ अभिमान आहे, Best luck bright future

  2. Congratulations, Shalini! Your dedication and hard work in building your healthy food business (Shalini’s Salad) are truly inspiring. Your journey to the top is a testament to your perseverance and passion for promoting healthier lifestyles—well done!

  3. शालिनी, तुझ्याबद्दलचा हा लेख वाचताना, ती अगदी सुरुवातीची छोटीशी ग्राम मंगल मध्ये येणारी शालिनी समोर उभी राहिली आणि तुझ्याबद्दलच्या अभिमानाने उर भरून आला. तुला आणि श्रीराम यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा! अशीच उत्तरो उत्तर प्रगती कर.

  4. श्रीराम मित्रा मी तुला जवळुन ओळखतो अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेला तु आज ज्या पद्धतीने तुझ्या सहचारिणीला घेऊन यशाच्या शिखरावर आहेस हा प्रवास सहज नाही. कारण तुझा कोणी गॉडफादर नाही हे केवळ तुझं आणि तुझंच, तुझ्या जोडीदार वहीनीचच!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ