गायिका, नृत्यांगना, कंटेट क्रिएटर ते Apple ची ब्रँड अँबेसडर- ‘मुंबईची मुलगी’ सई गोडबोले

Sai Godbole, Apple Brand Ambassador : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेट क्रिएटर, उत्तम गाणारी, नृत्यांगना, कलाकार, विविध भाषांसह दहा वेगवेगळ्या अॅक्सेंटमध्ये संवाद साधण्याची कला अवगत असलेल्या मराठमोळ्या मल्टीटॅलेंटेड सई गोडबोले हिची निवड ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. सईसाठी हा आनंदाचा  क्षण आहे तर आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. अभिनंदन सई!
[gspeech type=button]

‘ती’ प्रचंड सुंदर आहे, स्क्रिनवर तिचा चेहरा दिसला की आपणही तिच्यासारखंच रिफ्रेश होतो. पण दिसण्याबरोबरच ती प्रचंड टॅलेंटेड आहे. तिला विविध भाषा अगदी सहज बोलता येतात. ती उत्तम गाते, उत्तम नृत्यही करते. देशातील आघाडीची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेट क्रिएटर आहे. तिचे व्हिडिओज अगदी वेगळे असतात आणि त्यामुळेच ती प्रचंड लोकप्रिय आहे. या सगळ्यांत मानाचा तुरा म्हणजे नुकतीच तिची ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. इतक्या लहान वयात हा मान मिळवणारी ‘ती’ आहे मराठमोळी मुलगी सई गोडबोले. ‘मल्टीटॅलेंटेड इन्फ्लुएन्सर’ अशी ओळख असणारी सई गोडबोले सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

कलेचा वारसा

सईची आई किशोरी गोडबोले ही मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री. नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यामुळे सईला आईकडून अभिनयाचा आणि नृत्याचा वारसा मिळाला आहे. तसंच तिचे आजोबा जयवंत कुलकर्णी हेही प्रसिध्द गायक. त्यामुळे तिला गायनाचाही वारसा लाभला आहे. तिनं काही जाहीरातींमध्येही काम केलं आहे. या वेगवेगळ्या कलागुणांच्या क्षेत्रात सईनं आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर अगदी लहान वयात यश मिळवलं आहे.

सोशल मीडियावर एन्ट्री

मुंबईची मुलगी असलेली सई जगातील दहा Accent मध्ये अगदी अस्खलित सहजपणे बोलू शकते. या वेगवेगळ्या अॅक्सेंट (Accent) मध्ये बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायला सुचवलं. त्यामुळे डिसेंबर 2022 मध्ये तिने सहजच असं वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या अॅक्सेंटमध्ये बोलण्याचा व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं. या पहिल्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादानंतर सईने आणखीन व्हिडिओ तयार करु लागली.

अभिनयाचं शिक्षण

पहिल्यापासूनच कला क्षेत्रात विशेष रुची असलेल्या सईनं अभिनयाचं औपचारिक शिक्षण घेतलेलं आहे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’ या संस्थेमधून तिनं अभिनयाची पदवी घेतली आहे. तिला हॉलीवूडचे चित्रपट, इंग्रजी मालिका बघण्याची, इंग्रजी आणि विविध परकीय भाषांमधली गाणी ऐकण्याची पहिल्यापासून आवड आहे. पाश्चिमात्य संगीतही ती शिकली आहे. अगदी नियमितपणे ती ही गाणी ऐकत असे.

प्रवासातून विविध भाषा शिकणे

सईने वेगवेगळ्या देशात आई-वडिलांसोबत प्रवास करत त्या त्या देशातली भाषा आणि त्याचे अॅक्सेंट (accent) आत्मसात केले. “आपल्याला विविध भाषा बोलायला आवडतं आणि ते त्या-त्या अॅक्सेंटमध्ये चांगल्या प्रकारे बोलता येतं हे जेव्हा समजलं, तो क्षण माझ्यासाठी सगळ्यांत महत्वाचा होता”, असं ती सांगते. तिचा ‘काय गं सखू’ हा व्हिडिओ तर प्रचंड गाजला. त्यानंतर खऱ्या अर्थाने ती लोकप्रिय झाली.

इन्फ्लुएन्सर: आव्हानात्मक क्षेत्र

सोशल मीडियाचं जग हे प्रचंड आव्हानात्मक आहे. दर सेकंदाला इथं नवीन काहीतरी घडत असतं. या चुरशीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सोशल मीडियावर नुसतेच व्हिडिओ किंवा रिल्स टाकून चालत नाही, तर जगात काय चाललं आहे, याची माहितीही ठेवावी लागते. कंटेट क्रिएटर म्हणून सतत अपडेट राहावं लागतं. नवीन आयडिया शोधत राहाव्या लागतात. आपल्या व्हिडिओमधून तोचतोचपणा येणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागते. प्रेषकांचं पुरेपूर मनोरंजन व्हावं यासाठी प्रत्येक व्हिडिओ हा मनापासून तयार करावा लागतो असं सईचं मत आहे.

सईचे व्हिडिओ पाहिले तर तिची बुध्दीमत्ता तिचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओमधला तिचा वावर हा कंटाळवाणा वाटत नाही.
मराठी शास्त्रीय गाण्यांपासून ते जुगलबंदी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांबरोबर केलेलं फ्युजन अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तिने तयार केले आहेत. या सगळ्या व्हिडिओला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. प्रसिद्ध गायक अरिजित सिंगच्या बऱ्याच गाण्यांचे टायटल्स एकाच गाण्यात गाऊन तिनं तिच्या टॅलेंटची झलक दाखवली होती. हा व्हिडिओ नेटिझन्सना प्रचंड आवडला होता. तिची आई किशोरी गोडबोलेबरोबरचा तिचा नृत्याचा व्हिडिओही खूप लोकप्रिय झाला होता.

मातृभाषेवरचं प्रेम

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मोठा मान इतक्या लहान वयात मिळालेली सईचे पाय जमिनीवरच आहेत. आपल्या यशात आपल्या आईवडिलांचा मोठा वाटा असल्याचं ती मानते. घरात कलात्मक वातावरण होतं. तिला सुरुवातीला गायक व्हायचं होतं, त्यामुळे ती शास्त्रीय संगीत शिकली. आवडतं ते सगळं करण्याची मुभा असली तरी मातृभाषा मराठी चांगली आलीच पाहिजे अशी तिच्या आईवडिलांची भूमिका होती. त्यामुळे इंग्रजी आणि अन्य परकीय भाषा अस्खलीतपणे बोलणाऱ्या सईचं मराठीवरही चांगलं प्रभुत्व आहे.

ट्रोलिंग

सोशल मीडियावर असलं की ट्रोलिंग होतंच, पण त्यासाठीही सई मानसिकरित्या एकदम तयार आहे. ज्यांना वाईट लिहायचं आहे ते तेच करतात, पण सुदैवाने कोणत्याही गोष्टीसाठी वाईट ट्रोलिंगला तिला अजून सामोरं जावं लागलेलं नाही. अर्थात नव्या जनरेशनची असल्याने ट्रोलिंग हा आपल्या आयुष्याचा भागच आहे असं ती मानते.

सई सोशल मीडियावर लोकप्रिय आहेच. पण त्याचबरोबर तिनं काही ब्रँड्सच्या जाहीरातींमध्येही काम केलं आहे. तसंच चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. संगीताबरोबरच अभिनय हेही तिचं प्रेम आहे.

इन्फ्लुएन्सर ते ब्रँड अँबेसेडर

अमेरिकेतील लॉस एंजेल्समध्ये Apple च्या झालेल्या मोठ्या कार्यक्रमात तिला बोलावण्यात आलं होतं. तिथं तिची Apple कंपनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड झाली. त्यानंतर सईच्या आईनं सोशल मीडियावर लिहीलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आणि जगाच्या कानाकोपऱ्यांतून तिच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव झाला. वयाच्या 25 वर्षांच्या आतच सईनं आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे.
सध्या सोशल मीडियावर रिल्स, व्हिडिओ टाकणाऱ्यांची प्रचंड भाऊगर्दी आहे. पण या गर्दीमध्ये सईनं स्वत:ला सिध्द करणारी, स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. तिची झालेली निवड म्हणजे तिच्या टॅलेंटला, तिच्या हरहुन्नरीपणाला मिळालेली दादच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Jagannath Puri: आदिवासी समुदायांच्या देवता खांब, वृक्ष अशा स्वरुपात असतात. जगन्नाथाच्या लाकडी मूर्तींच्या संदर्भात त्यांचा उगम शोधण्यामागे, आदिवासी परंपरांचा आधार
Sickle cell anemia : जगात, सिकल सेल आजार हा एक जनुकीय (genetic) आजार असून मुख्यतः आफ्रिका, मध्य पूर्व भारत आणि
Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ