अंडरग्रॅज्युएशनसाठी परदेशी जायचा ट्रेंड

परदेशातल्या शिक्षण प्रणालीमध्ये स्वावलंबी कसे व्हाल, याकडे इथल्या शिक्षणपद्धतीचा कटाक्ष असतो. 'लर्न आणि अर्न' (learn and earn) म्हणजेच 'शिका आणि कमवा'  या धोरणामुळे शिकता शिकता तुम्ही कमवू शकता.
[gspeech type=button]

आजकाल आपण पाहिलं तर उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याचा ट्रेंड वाढतोय. मास्टर्स बरोबरच आता बारावीनंतर अंडरग्रॅज्युएटसाठी परदेशात जाणाऱ्या मुलांमध्येही काही वर्षात बरीच वाढ झालीय. या मागची कारण काय असतील.. 

शिक्षणाची गुणवत्ता

परदेशातील शिक्षण पद्धती आणि भारतातील शिक्षण पद्धतीत काही महत्त्वाचे फरक आहेत. सर्वात आधी, परदेशातील शिक्षण हे केवळ घोकंपट्टी नाही. प्रॅक्टिकल ट्रेनिंग (Hands-on Experience) वर त्यांचा भर असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे त्यांचे प्रथम ध्येय असते. आपल्याकडे फक्त हुशार (Mark Oriented) विद्यार्थी येता अष्टपैलू विद्यार्थी आला पाहिजे, याकडे त्यांचा कल असतो.

सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे अभ्यासक्रमात असलेली लवचिकता (Flexibility).

आपण एखाद्या कोर्सची निवड केल्यानंतर जर आपल्याला वाटलं की, आपण दुसरा कोर्स घ्यायला हवा होता. तर तो कोर्स आपण बदलू शकतो. म्हणजे, मुख्य विषयासोबत (Major) त्यांना इतर उपमुख्य (Minor) विषय निवडण्याची मुभा असते. उदाहरणार्थ, Computer Science किंवा Engineering घेतलेल्या विद्यार्थ्यांना Music किंवा Psychology अशा वेगळ्या विषयांची निवड करण्याची संधी मिळू शकते.

आर्टस्, कॉमर्ससोबत इंजिनीअरींग

बरीचशी विद्यापीठं तुम्ही बारावी कॉमर्स किवा आर्ट्स केलेले असेल तरी देखील Engineering च्या अभ्यासक्रमाला प्रवेश देतात. अर्थात काही अतिरिक्त विषय घेऊनच हे करता येतं. एखाद्याला गाण्याची, नृत्याची आवड असेल तर ते विद्यार्थी त्यांच्या मुख्य अभ्यासक्रमाबरोबर आवडीचा विषयही घेऊ शकतात. अमेरिकेत किंवा इतर देशात सर्वसाधारण महाविद्यालयातदेखील उत्तम पायाभूत सुविधा आणि चांगले प्राध्यापक उपलब्ध असतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात जवळचे संबंध असतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला, चर्चेत सहभागी व्हायला आणि व्यक्त होण्यास प्रोत्साहन दिले जाते. मूल्यमापन (Evaluation) फक्त परीक्षांवर आधारित नसून, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स, प्रेझेंटेशन, यावर आधारित असते.

याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात होतो. पदवी करतानाच मिळणारा संशोधनाचा अनुभव पुढील करिअरमध्ये उपयोगी ठरू शकतो.

विद्यार्थी संशोधन, इंटर्नशिप, आणि projects मधे सहभागी होऊ शकतात. विद्यापीठांकडे अत्याधुनिक प्रयोगशाळा, तंत्रज्ञान आणि संसाधनांची मुबलकता असते. 

लर्न एण्ड अर्न

‘लर्न आणि अर्न’ म्हणजेच ‘शिका आणि कमवा’  या धोरणामुळे शिकता शिकता तुम्ही कमवू शकता. परिणामी पैशाची किंमत कळते आणि कॉन्फिडन्सही वाढतो. नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायची सवय होते, वेळेचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन ह्या सर्वांबरोबर स्वयंपाकही करावा लागतो.

थोडक्यात तुम्ही स्वावलंबी कसे व्हाल, याकडे इथल्या शिक्षणपद्धतीचा कटाक्ष असतो. एका चांगल्या डिग्री सोबत तुमचं व्यक्तिमत्व पण बदलतं, मॅच्युरिटी येतेलोकां बरोबर कसं बोलायचं, कठीण परिस्थिती कशी हाताळायची, या सगळ्याचा अनुभव मिळतोतुमचं क्षितिज विस्तारण्या बरोबरच नवीन छंद जोपासू शकता. त्यामुळे आत्मविश्वास, आत्मनिर्भरता वाढते.

आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण

सोशल नेट्वर्किंगमुळे, विविध देशातल्या विद्यार्थ्यांबरोबर सांस्कृतिक देवाण घेवाण होते. एखाद्या गोष्टीकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो.

हे तर झाले परदेशी शिक्षणाचे फायदे. पण परदेशात शिकायला जाण्याआधी  काय कराव लागतं, किती आधी तयारी करायला लागते, कुठल्या पूर्व परीक्षा द्याव्या लागतात  हे पाहुयात.

पूर्वतयारी

परदेशात शिक्षण घेण्यासाठी पूर्वतयारी 7-8 महिने आधीपासून करावी लागते. प्रत्येक विद्यापीठाची अर्ज करण्याची अंतिम तारीख (Deadline) ठरलेली असते. त्यामुळे ह्या सगळ्याचे काटेकोरपणे नियोजन करणे हे अत्यंत आवश्यक असते.

मास्टर्ससाठी आणि बारावीनंतर बाहेर शिकायला जाण्यास बरेच विद्यार्थी उत्सुक असतात. इंटरनेटवर बरीचशी माहिती उपलब्ध आहे. पण त्यातली नेमकी कुठली माहिती आपल्याला लागू होते हे माहीत असणे सर्वात जास्त महत्त्वाचे असते.

या सर्व गोष्टी विचारात घेऊन, परदेशातील शिक्षणाची निवड करताना या गोष्टींचा अभ्यास करून तयारी केली पाहिजे.

मार्गदर्शकाची निवड

प्रत्येकाची प्रवेश प्रक्रिया जरी काही अंशी सारखीच असली तरी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात की, ज्या गोंधळवून टाकणाऱ्या ठरू शकतात. अशा वेळी एका अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकाची मदत घेणे, नेहमीच चांगले असते. आपल्याला कोर्स निवडी पासून ते व्हिसा होई पर्यंत मार्गदर्शन करेल, असा मार्गदर्शक निवडावा.

आता पालक आणि विद्यार्थी बरेच जागरूक झालेत. इंजिनियरिंग किंवा मेडिकलच्या पलीकडे विचार करू लागले आहेत. Computer Science, Engineering सोबत Humanities, International studies, Biotechnology, Public Policy अश्या वेगवेगळया courses ना विद्यार्थी जात आहेत.

विद्यार्थ्याकडे बऱ्याच देशांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात अमेरिका, आयर्लंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांचे पर्याय उपलब्ध असतात. प्रत्येक देशाच्या शिक्षणपद्धतीचे खास असे वैशिष्ट्य असते. त्यानुसार देशाची निवड करावी. आपल्या गरजेनुसार शिक्षण आहे, याची खात्री करूनच पुढचे पाऊल टाकावे. जिथे जास्त संधी उपलब्ध आहेत, तिथेच शक्यतो गेलेले केंव्हाही चांगले असते.

9 Comments

  • Akshay Hore

    This article has been an absolute lifesaver! As a student who’s always dreamed of studying abroad, the prospect has always felt a little overwhelming. The sheer number of things to consider – from choosing the right program and university to navigating visa applications and adjusting to a new culture – can be incredibly daunting.
    Ma’am, your clear and concise guidance has truly made a world of difference. You’ve broken down these complex challenges into manageable steps, providing valuable insights and practical tips along the way. Your article has given me the confidence to pursue my dream of studying abroad, knowing that I have a roadmap to guide me through the process. I especially appreciate how you’ve addressed the emotional and mental aspects of studying abroad, highlighting the importance of self-care and cultural adjustment.
    Thank you for sharing your wisdom and expertise. This article is a must-read for any student considering studying abroad. You’ve made the journey feel less intimidating and more exciting!

  • Vaishnavi Rane

    Very informative article ma’am. Your guidance has made it much easier for us students to navigate various challenges, helping to make the process of studying abroad a little less stressful.

  • Mithil

    Khup chaan lihlay..!! Great work!! <3

  • नितीन पाटील

    अतिशय माहितीपूर्ण लेख. आपलं मार्गदर्शन घेऊनच आमचा मुलगा जय १२ वी नंतर आता US ला पुढचं शिक्षण घेतोय आणि मुलगी शिवानी सुद्धा MS साठी नुकतीच गेली आहे.

  • Sandeep

    अत्यंत सोप्या शब्दात दिलेली परिपूर्ण माहिती. पुढील लेखाची वाट बघत आहे.

  • Ira

    amazingg write up!!! so so proud💪💙

  • Medha kulkarni

    Great atyant mahitipurn Ani sarv samaveshak lakh sarvsamanya vyaktila Samaju shakanarara ahe Khup abhinandan proud of you

  • Ashok

    Great guidance experience

  • दिनेश तारवी

    कॉलेजवयीन मुले व त्यांच्या पालकांना मार्गदर्शक लेख.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 Responses

  1. कॉलेजवयीन मुले व त्यांच्या पालकांना मार्गदर्शक लेख.

  2. Great atyant mahitipurn Ani sarv samaveshak lakh sarvsamanya vyaktila Samaju shakanarara ahe Khup abhinandan proud of you

  3. अत्यंत सोप्या शब्दात दिलेली परिपूर्ण माहिती. पुढील लेखाची वाट बघत आहे.

  4. अतिशय माहितीपूर्ण लेख. आपलं मार्गदर्शन घेऊनच आमचा मुलगा जय १२ वी नंतर आता US ला पुढचं शिक्षण घेतोय आणि मुलगी शिवानी सुद्धा MS साठी नुकतीच गेली आहे.

  5. Very informative article ma’am. Your guidance has made it much easier for us students to navigate various challenges, helping to make the process of studying abroad a little less stressful.

  6. This article has been an absolute lifesaver! As a student who’s always dreamed of studying abroad, the prospect has always felt a little overwhelming. The sheer number of things to consider – from choosing the right program and university to navigating visa applications and adjusting to a new culture – can be incredibly daunting.
    Ma’am, your clear and concise guidance has truly made a world of difference. You’ve broken down these complex challenges into manageable steps, providing valuable insights and practical tips along the way. Your article has given me the confidence to pursue my dream of studying abroad, knowing that I have a roadmap to guide me through the process. I especially appreciate how you’ve addressed the emotional and mental aspects of studying abroad, highlighting the importance of self-care and cultural adjustment.
    Thank you for sharing your wisdom and expertise. This article is a must-read for any student considering studying abroad. You’ve made the journey feel less intimidating and more exciting!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

एटीपी अर्थातच असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने जाहीर केलेल्या या आठवड्याच्या क्रमवारीत भारताचा एकही टेनिसपटू पहिल्या शंभर टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवू शकला
Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील खत उद्योगावरील हा तिसरा लेख. यामध्ये खतांच्या विक्री व्यवस्थापनातील चार सर्वात महत्त्वाच्या
गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. परंतु काही उपक्रम हे केवळ विकासाचे नव्हे तर, सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक ठरतात. स्मशानभूमीचे ‘स्मृती

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ