तुम्ही लहान बाळाला गुदगुल्या करताय? जरा थांबा!

आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप मजा येतेय. पण बाळ आनंदाने नाही तर एक रिफ्लेक्स प्रतिक्रिया म्हणून हसतं
[gspeech type=button]

तुम्ही तुमच्या लहान बाळाला हसवण्यासाठी त्याला गुदगुल्या करता का? तुम्हाला वाटतं असेल की त्याला खूप मजा येतेय. बाळ खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप मजा येतेय.? पण थांबा. तुम्हाला जे हसू दिसतंय, ते खरं तर गुदगुल्या केल्यामुळे नाहीये. अनेकदा, बाळ गुदगुल्या केल्यावर एक प्रकारच्या भीतीमुळे हसतं, कारण त्याला काय होतंय हे समजत नाही.

आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप मजा येतेय. पण बाळ आनंदाने नाही तर एक रिफ्लेक्स प्रतिक्रिया म्हणून हसतं. माणसाच्या शरीरात, जेव्हा एखाद्या अनपेक्षित ठिकाणी स्पर्श होतो, तेव्हा मेंदू आणि शरीर एक विशिष्ट प्रतिक्रिया देतात. गुदगुल्या केल्यावर येणारं हसू हे याच प्रतिक्रियेचा भाग आहे. मेंदूला या परिस्थितीत मजा आणि धोका यातला फरक कळत नाही. त्यामुळे शरीरात जे बदल होतात, ते कोणत्याही धोक्याच्या वेळी होणाऱ्या बदलांसारखेच असतात.

या परिस्थितीत बाळाच्या शरीरात खालील बदल होतात:

– काही वेळासाठी त्याचा श्वास थांबतो.

– हृदयाची धडधड अचानक वाढते.

– शरीरातील स्नायू अचानक ताणले जातात.

– शरीरात स्ट्रेस वाढवणारे cortisol आणि adrenaline हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे शरीरात तणाव वाढतो.

या सर्व प्रतिक्रियांमुळे बाळाला असं वाटतं की कोणीतरी त्याच्यावर हल्ला करतंय. जरी तो हसत असला, तरी आतून त्याला त्रास होऊ शकतो.

गुदगुल्यांचे दुष्परिणाम

तुम्ही मोठ्या माणसाला गुदगुल्या केल्या तर तो तुम्हाला ‘थांब’ असं सांगू शकतो, पण बाळं आणि लहान मुलांना बोलता येत नाही. त्यामुळे, त्यांना हसू येत असलं तरी ते तुम्हाला थांबायला सांगू शकत नाहीत. वारंवार गुदगुल्या केल्याने बाळाला ती गोष्ट नकोशी वाटते. त्यामुळे गुदगुल्या करणारे लोक दिसले की ते आधीच घाबरतात.

गुदगुल्या केल्याने बाळाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात

जर तुम्ही बाळाला गुदगुल्या करून हसवत असाल, पण तो आतून अस्वस्थ असेल, तर त्याला तुमच्यावर पूर्ण विश्वास वाटणार नाही. त्याला वाटेल की तुम्ही त्याला आवडत नसलेल्या गोष्टी करत आहात.

बाळासोबत खेळण्यासाठी गुदगुल्यांपेक्षा दुसरे चांगले खेळ निवडा

बाळाच्या डोक्यावर, पाठीवर किंवा हातावर हळूवारपणे स्पर्श करा. यामुळे त्याला सुरक्षित आणि प्रेमळ वाटेल.

बाळासाठी गाणी म्हणा, त्याला हलके हलके झोळीत घ्या.

तुम्ही मजेदार चेहरे करून त्याला हसवायचा प्रयत्न करू शकता. यामुळे बाळाला तुमच्यासोबत खेळायला मजा येईल.

तुम्ही त्याच्या सोबत टाळी देऊन खेळू शकता, त्याच्या हातांना हलका स्पर्श करून किंवा त्याचे छोटे छोटे बूट घालून त्याला हसवायचा प्रयत्न करू शकता.

लहान मुलं आणि बाळं ही खूप नाजूक असतात. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा खेळ करताना खूप काळजी घ्या.

नेहमी लक्षात ठेवा, बाळ जेव्हाही अस्वस्थ वाटेल, तेव्हा तो खेळ लगेच थांबवा. त्याचं हसू हे नेहमीच आनंदाचं लक्षण नसतं, हे समजून घ्या. त्यांच्यासोबत प्रेमळ आणि सुरक्षित नातं तयार करा, ज्यामुळे त्याला तुमच्यासोबत नेहमी आनंदी आणि सुरक्षित वाटेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

postpartum health recovery - वैज्ञानिक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, मूलाला जन्म देणाऱ्या ‘आईची रिकव्हरी’ म्हणजे पूर्ण बरी होण्यासाठी
आपण आनंदी असलो की आपल्याला उत्साह येतो आणि दुःखी असलो की सगळी एनर्जी गेल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट जी फक्त
Rent people: माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कितीही एकटं राहायचं म्हटलं तरी सोबत असली की जरा हायसं वाटतं. मग ती

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ