निरोगी राखण्यासाठी शरीराची स्वतःची यंत्रणा ‘ऑटोफॅजी’

Autophagy : ऑटोफॅजी आपल्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या जन्मापासूनच आपल्या शरीरात काम करत असते. आणि या प्रक्रियेसाठी आपल्याला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत.
[gspeech type=button]

आपले शरीर नेहमी निरोगी ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. पण, आपलं शरीर इतकं हुशार आहे की काही गोष्टींमध्ये ते स्वतःची काळजी स्वतःच घेतं. हो, हे खरं आहे. आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया सतत चालू असते, जिचं नाव आहे ‘ऑटोफॅजी’ (Autophagy). हा शब्द ‘ऑटो’ (स्वतः) आणि ‘फेजिन’ (खाणे) या दोन शब्दांवरून तयार झाला आहे.

ही आपल्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या जन्मापासूनच आपल्या शरीरात काम करत असते. आणि या प्रक्रियेसाठी आपल्याला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत. आज आपण ‘ऑटोफॅजी’ (Autophagy) म्हणजे नेमकं काय, ते समजून घेणार आहोत.

ऑटोफॅजी म्हणजे काय?

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीभोवती एक पातळ पडदा असतो, त्याला आपण पेशीपटल (cell membrane) म्हणतो. हा पडदा पेशीच्या आत काय जाईल आणि बाहेर काय काढायचं हे ठरवतो. जेव्हा आपलं शरीर ऑटोफॅजी अवस्थेत असतं, तेव्हा आपल्या शरीरातील पेशी हा पडदा वापरून एक प्रकारची छोटीशी पिशवी तयार करतात. या पिशवीत त्या मृत, आजारी किंवा जुनाट झालेल्या पेशींना आणि त्यांच्या खराब झालेल्या भागांना पकडतात आणि त्यांना नष्ट करतात. आणि त्यातून जे रेणू मिळतात, त्यांचा उपयोग ऊर्जा म्हणून करतात किंवा नवीन, निरोगी पेशींचे भाग तयार करण्यासाठी वापरतात.

ऑटोफॅजीचं महत्त्व आणि वाढतं वय

आधी आपल्याला ऑटोफॅजीबद्दल फारशी माहिती नव्हती. पण आता नवीन संशोधनातून या प्रक्रियेबद्दल खूप महत्त्वपूर्ण गोष्टी समोर येत आहेत. शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं आहे की, ऑटोफॅजी ही केवळ पेशींची स्वच्छता आणि दुरुस्ती करणारी प्रक्रिया नाही. तर हे वाढत्या वयामुळे शरीरात होणाऱ्या नुकसानीपासून आपल्याला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे वृद्धांना स्नायूंची कार्यक्षमता, मेंदूचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते.

जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं आपल्या पेशींमध्ये नैसर्गिकरित्या थोडे बदल होतात. ऑटोफॅजी प्रक्रिया थोडी मंदावते. यामुळे काय होतं? तर खराब झालेले पेशींचे घटक शरीरात जमा होऊ लागतात. याच घटकांमुळे अनेक आजार होतात, जसे की अल्झायमर, पार्किन्सन किंवा संधिवात.ऑटोफॅजी जर आपल्या शरीरात व्यवस्थित काम करत नसेल, तर आपल्याला म्हातारपणात अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.

ऑटोफॅजीला पुन्हा सक्रिय कसं करायचं?

ही प्रक्रिया आपण पुन्हा सक्रिय करू शकतो. संशोधकांना असं आढळून आलं आहे की काही सोप्या गोष्टी करून आपण आपल्या शरीरातील ऑटोफॅजीला पुन्हा जोमाने काम करायला लावू शकतो.

एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेतच खाणे, नियमित व्यायाम करणे, शरीरातील कॅलरी कमी करणे. या गोष्टी केल्याने आपल्या पेशी पुन्हा तरुण आणि निरोगी राहू शकतात. यामुळे स्नायू मजबूत राहतात, मेंदूचे आरोग्य चांगले राहते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते.

शास्त्रज्ञ अजूनही या ऑटोफॅजी प्रक्रियेबद्दल अधिक संशोधन करत आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, ही प्रक्रिया आपल्याला जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी आणि म्हातारपणातही तंदुरुस्त राहण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बुद्धिमत्ता ही केवळ जनुकांवर अवलंबून नसते. मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासावर त्यांच्या घरातील वातावरण, त्यांना मिळणारं शिक्षण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती या
tiger's tongue : आपल्याला वाटतं की वाघ शिकार पकडतात आणि दात व पंजाने फाडतात. पण, ते शिकार कापण्यासाठी त्याच्या जिभेचा
connection between our teeth and our brain : आपल्या दातांचं आरोग्य आणि आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत यांचा खूप जवळचा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ