सायकोपॅथ लोकांचा मेंदू खरंच वेगळा असतो का? 

psychopaths brain :सायकोपॅथ लोकांचा मेंदू हा सामान्य लोकांच्या मेंदूपेक्षा खरंच थोडा वेगळा असतो. त्यांच्या मेंदूची रचनाच थोडी वेगळी असते
[gspeech type=button]

कधी कधी आपल्याला असे काही लोक भेटतात, जे इतरांपेक्षा खूपच वेगळे वागतात, त्यांना कुणाच्या भावनांची पर्वा नसते, अगदी कठोरपणे ते वागतात आणि काहीवेळा तर खूप विचित्र गोष्टी देखील करतात. अशा लोकांना बघितल्यावर आपल्या मनात विचार येतोच, “हे असं का वागतात?” यालाच आपण सायकोपॅथी (Psychopathy) असं म्हणतो.

आजपर्यंत आपल्याला वाटत होतं की, कदाचित हा फक्त स्वभावाचा भाग असेल किंवा त्यांच्या वाईट सवयी असतील. पण, शास्त्रज्ञांनी आता याबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट शोधून काढली आहे. ती म्हणजे, सायकोपॅथ लोकांचा मेंदू हा सामान्य लोकांच्या मेंदूपेक्षा खरंच थोडा वेगळा असतो. त्यांच्या मेंदूची रचनाच थोडी वेगळी असते. चला तर मग, आज या इंटरेस्टिंग विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

काय सापडलंय या नवीन अभ्यासात?

जर्मनीमधील काही शास्त्रज्ञांनी सायकोपॅथी विषयी खूप अभ्यास केला, अनेक रिसर्च केले. त्यांनी हे समजून घेण्यासाठी 39 सायकोपॅथ पुरुषांचा आणि 39 सामान्य पुरुषांचा अभ्यास केला. या सगळ्यांच्या मेंदूचे MRI स्कॅन त्यांनी काढले आणि त्यामध्ये त्यांना दिसलं की, नॉर्मल लोकांच्या मेंदूपेक्षा सायकोपॅथ लोकांच्या मेंदूत काही भागांचा आकार हा कमी होता. आता तुम्ही म्हणाल की हे भाग नक्की कोणते? तर, आपल्या मेंदूमधील हे चार महत्त्वाचे भाग आहेत,

1.पॉन्स (Pons)

2.थॅलॅमस (Thalamus)

3.बेसल गँगलिया (Basal Ganglia)

4.इन्सुलर कॉर्टेक्स (Insular Cortex)

हे भाग आपल्या सगळ्यांच्या मेंदूत असतात आणि हेच भाग आपल्याला भावना समजून घ्यायला, योग्य-अयोग्य निर्णय घ्यायला आणि आपलं वागणं नियंत्रित करायला मदत करतात. म्हणजे, आपण कधी रागावायचं, कधी शांत राहायचं, एखादी गोष्ट केली तर त्याचे काय परिणाम होतील हे नीट ओळखणे या सगळ्या गोष्टी या चार महत्त्वाच्या भागांमुळेच आपल्याला करता येतात.

पण, संशोधनात असं दिसून आलं की, सायकोपॅथ लोकांच्या मेंदूमध्ये या भागांचा आकार कमी असल्याने, त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवणे किंवा योग्य निर्णय घेणे कठीण होते. त्यांना दुसऱ्यांच्या भावना लवकर समजत नाहीत किंवा त्यांना त्या भावनांची पर्वा नसते.

हेही वाचा : मेंदू तल्लख ठेवायचा आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!

मेंदूमध्ये आणखी कोणते फरक दिसून आले?

मेंदू मधील फक्त काही भागच नाही, तर शास्त्रज्ञांना आणखी एक धक्कादायक गोष्ट आढळली. सायकोपॅथ लोकांचा मेंदू हा सामान्य लोकांच्या तुलनेत सुमारे 1.45% लहान होता. म्हणजे, त्यांचा पूर्ण मेंदूच थोडा लहान असू शकतो. कदाचित सायकोपॅथ लोकांचा मेंदू हा जन्मापासूनच थोड्या वेगळ्या पद्धतीने विकसित झाला असू शकतो.

या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी सायकोपॅथीच्या लक्षणांसाठी एक खास यादी वापरली होती, तिला सायकोपॅथी चेक-लिस्ट (PCL-R) म्हणतात. या यादीमध्ये दोन मुख्य गट असतात.

पहिला गट: यामध्ये लोकांना इतरांच्या भावना समजत नाहीत किंवा त्यांची काळजी वाटत नाही, अशी लक्षणं असतात.

दुसरा गट: यामध्ये उतावळा स्वभाव असणारे आणि समाजविरोधी वागणारे लोक असतात.

यामधील ज्या सायकोपॅथ लोकांमध्ये दुसऱ्या गटातील, म्हणजे उतावळा स्वभाव आणि समाजविरोधी वागणूक ही लक्षणं जास्त होती, त्यांच्या मेंदूतील भागांचे आकार जास्त कमी होते.

पण, सायकोपॅथीचा जो पहिला गट होता, ज्यात लोकांना इतरांच्या भावना समजत नाहीत किंवा त्यांची काळजी वाटत नाही, त्यात मात्र मेंदूतील फार मोठे वेगळेपणा असलेले फरक दिसले नाहीत.

याचा अर्थ असा असू शकतो की, सायकोपॅथीची वेगवेगळी लक्षणं मेंदूच्या वेगवेगळ्या भागांशी जोडलेली असू शकतात. किंवा प्रत्येक सायकोपॅथ व्यक्तीमध्ये मेंदूतील बदल थोड्या वेगळ्या पद्धतीचे असू शकतात.

या अभ्यासातून आपल्याला हेच कळतं की, सायकोपॅथी ही केवळ स्वभावाची किंवा निव्वळ वाईट सवयीची गोष्ट नाही, तर यामागे कदाचित मेंदूतील काही शारीरिक बदल असू शकतात. म्हणजे, काही लोकांचा मेंदूच अशा पद्धतीने बनलेला असतो की त्यांना इतरांच्या भावना समजायला किंवा योग्य-अयोग्य वागायला अवघड जातं.

या संशोधनामुळे आपल्याला सायकोपॅथ लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल. आणि यामुळे कदाचित त्यांच्या हिंसक किंवा हानीकारक वर्तनाला कसे थांबवता येईल यासाठी नवीन उपाय शोधायलाही मदत होईल. कदाचित, लहानपणापासूनच अशा मुलांमध्ये काही बदल दिसल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संगीत हे अर्भक आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच चांगलं संगीत ऐकवावं, त्यांच्यासोबत बालगीतं
आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप
liver fat : सोडा, शीतपेयं आणि पॅकेटमधल्या पदार्थांमध्ये जी साखर असते, ती आपल्या लिव्हरसाठी विषारी असते. पण यावर एक सोपा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ