आपल्या रोजच्या खाण्यातून पोटात जातंय प्लास्टिक! जाणून घ्या मायक्रोप्लास्टिकपासून कसा करायचा बचाव

Microplastic in food : आपल्याही नकळत आपण जे खातो-पितो त्या माध्यमातून अनेकदा मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात असतं. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचं विघटन होऊन झालेले बारीक कण. प्लास्टिकचे हे तुकडे 5 मिमीपेक्षा लहान असतात. आपल्या डोळ्यांना तर ते दिसतही नाही. हे तुकडे पाणी, मीठ, फळं आणि अगदी बाटलीबंद पाण्यातून आपल्या शरीरात प्रवेश करतात.
[gspeech type=button]

प्लास्टिक हे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि माणसाच्या आरोग्याच्या दृष्टिने किती हानीकारक आहे, याची प्रचिती हळूहळू आपल्याला येऊ लागली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. मात्र, आपल्याही नकळत आपण जे खातो-पितो त्या माध्यमातून अनेकदा मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जात असतं. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचं विघटन होऊन झालेले बारीक कण. प्लास्टिकचे हे तुकडे 5 मिमीपेक्षा लहान असतात. आपल्या डोळ्यांना तर ते दिसतही नाही. हे तुकडे पाणी, मीठ, फळं आणि अगदी बाटलीबंद पाण्यातून आपल्या शरीरात प्रवेश करतात.

उकळलेलं पाणी मायक्रोप्लास्टिकमुक्त असतं का?

खूप लोकांचा गैरसमज असतो की, नळाचं पाणी उकळलं की ते शुद्ध होतं आणि त्यातील सर्व घाण निघून जाते. खरं तर उकळल्याने पाण्यातील जीवाणू आणि विषाणू मरतात, पण मायक्रोप्लास्टिक नष्ट होत नाहीतच. उलट काहीवेळा मोठे प्लास्टिकचे तुकडे उकळल्यामुळे आणखी छोटे होतात.

पाण्यातून मायक्रोप्लास्टिक कसं काढायचं?

मायक्रोप्लास्टिकपासून पाणी शुद्ध करण्यासाठी खास फिल्टर वापरावे.

रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) फिल्टर – हे फिल्टर जर योग्य प्रकारे प्रमाणित असतील, तर ते 90 – 99 टक्के मायक्रोप्लास्टिक वेगळं करू शकतात.

कार्बन ब्लॉक फिल्टर – हे फिल्टर जर 1 मायक्रॉनपेक्षा कमी छिद्रांचे असतील, तर तेही काही प्रमाणात मायक्रोप्लास्टिक थांबवू शकतात.

हे ही वाचा : प्लॅस्टिक प्रदूषणाशी लढा देण्यासाठी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी भारताकडून विशेष निधीचा प्रस्ताव

मिठातही असतं मायक्रोप्लास्टिक

लोकांना वाटतं सी सॉल्ट म्हणजे जास्त नैसर्गिक मीठ. पण अभ्यासक सांगतात की, सी सॉल्टमध्ये समुद्रातील पाण्यातही प्लास्टिक प्रदूषण मिसळलेलं असतं. त्यामानाने हिमालयीन गुलाबी मीठ किंवा खडे मीठ हे खाणीतून येत असल्यामुळे त्यात मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे अन्नात प्लास्टिक जाण्याचा धोका कमी होतो.

फळं-भाज्यांवरही असतो मायक्रो प्लास्टिकचा थर

आपण नळाच्या पाण्याने फळं-भाज्या धुतो, पण जर त्या पाण्यातच मायक्रोप्लास्टिक असेल तर? म्हणून फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं धुण्यासाठी फक्त नळाचं पाणी उपयोगी नाही. त्यामुळे खाण्याच्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी खालील पद्धतीचा उपयोग करता येईल.

एका मोठ्या भांड्यात फिल्टर केलेलं पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा. या पाण्यामध्ये फळं आणि भाज्या साधारण 10–15 मिनिटं भिजवायच्या. नंतर या पाण्यातून काढून पुन्हा फिल्टर केलेल्या पाण्याने धुवायच्या. ही पद्धत फळांवरील कीटकनाशकं, धूळ आणि सूक्ष्म प्लास्टिक काढण्यात मदत करते.

कागदाच्या पॅकींगवर प्लास्टिकचा थर

आपण प्लास्टिकचं पॅकिंग टाळण्यासाठी कागदात गुंडाळलेल्या वस्तू निवडतो. पण अनेक ‘eco-friendly’ कागदी पॅकिंगवर प्लास्टिकचा पातळ थर असतो. जेव्हा आपण गरम वस्तू या कागदी पिशव्यांमध्ये तशाच ठेवतो तेव्हा त्यातील गरम पदार्थांमध्ये प्लास्टिकच्या बारीक कण मिसळू शकतात.

यासाठी काय करावं?

गरम अन्न ठेवण्यासाठी काचेच्या बरण्या, स्टीलचे डबे किंवा मातीची भांडी वापरावेत. प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करु नये.

बाटलीबंद पाणी खरंच सुरक्षित असतं का?

आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा अनेकदा घरातलं पाणी सोबत घेण्याचं टाळतो. किंवा घेतलं तर प्लास्टीक बाटलीतून घेतो. घराबाहेर पडल्यावर दुकानातून आपण बाटलीबंद पाणी विकत घेतो. हे पाणी आपल्या स्वच्छ, सुरक्षित वाटतं. मात्र, हा आपला गैरसमज आहे. कारण दुकानात अथवा रेल्वे स्टेशनवर हे प्लास्टिक बाटलीतलं पाणी उघड्यावर ठेवलं जातं. हे पाणी मायक्रोप्लास्टीक बाटल्यामध्ये असतं. सुर्याच्या अतीनील, कडक किरणांशी या बाटल्यांचा संबंध येतो. त्यामुळे हे प्लास्टिक वितळण्याची प्रक्रिया घडत असते. सुर्याच्या किरणांनी वितळलेले हे प्लास्टिकचे कण पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात जात असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संगीत हे अर्भक आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच चांगलं संगीत ऐकवावं, त्यांच्यासोबत बालगीतं
आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप
liver fat : सोडा, शीतपेयं आणि पॅकेटमधल्या पदार्थांमध्ये जी साखर असते, ती आपल्या लिव्हरसाठी विषारी असते. पण यावर एक सोपा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ