मानवी उत्क्रांती हा एक महत्त्वपूर्ण आणि हळूहळू घडणारा बदल आहे. पृथ्वीवर सुरुवातीला एकपेशीय सूक्ष्मजीव होते. यापासून हळूहळू विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती विकसित होऊ लागले. ह्या बदलांना लाखो वर्षांचा काळ लागला, हे बदल खूप छोटे होते. पण त्यांचा पुढे मोठा परिणाम झाला.
प्रोटोसेल आणि एकपेशीय जीव
पृथ्वीवर सुरुवातीला केवळ एकपेशीय सूक्ष्मजीव होते. त्यांना प्रोटोसेल असं म्हणतात. हळूहळू, या एकपेशीय सूक्ष्मजीवांमध्ये बदल होत गेले. RNA चे रूपांतर DNA मध्ये होऊ लागले म्हणजेच एकपेशीय मधून अनेकपेशीय जीवांची उत्क्रांती झाली आणि विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, पक्षी अस्तित्वात आले.
डिकिनसोनिया प्राणी ( Dikinsonia )
डिकिनसोनिया हा एक लुप्त झालेला प्राणी आहे. हा प्राणी पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात होता. त्याचा आकार अंडाकृती आणि शरीर दोन समान भागांमध्ये विभागलेले होते. त्यांना तोंड किंवा इतर अवयव नव्हते.
कालांतराने, कणा असलेल्या प्राण्यांची निर्मिती झाली. आणि मग माशांमध्ये बदल होऊ लागले. सुरुवातीला सर्व जीव समुद्रातच राहत होते. त्यानंतर काही मासे हळूहळू जमिनीवर येऊन वावरू लागले. हा जीवसृष्टीच्या उत्क्रांतीतला एक खूप महत्त्वाचा टप्पा होता.”
टिक्टालिक – जमिनीवर चालणारा पहिला प्राणी
टिक्टालिक एक असा मासा होता जो पाण्यातून बाहेर जमिनीवर चालू शकत होता. त्याच्या हाडांची रचना अशी होती की, तो पाण्याबाहेरदेखील वावरू शकत होता. हा चार पाय असलेल्या प्राण्यांचा पूर्वज मानला जातो. आज आपण पाहतो ते सर्व जमिनीवर राहणारे प्राणी, जसे की उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी, हे सर्व सुरुवातीच्या चतुष्पाद प्राण्यांचेच वंशज आहेत.
मानवाची उत्क्रांती
आफ्रिकेत सुमारे 7 दशलक्ष वर्षांपूर्वी ओरंगुटान, गोरिल्ला आणि चिंपांझींची निर्मिती झाली. हे प्राणी खूप हुशार होते आणि समुहात राहायचे, संवाद साधायचे आणि एकमेकांचे रक्षण करायचे, या काही प्राण्यांपासून पुढे आदीमानवाची उत्क्रांती झाली.
मानवाच्या उत्क्रांतीत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दोन पायांवर चालणे. यामुळे मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ओळख मिळाली. तसेच, मेंदूचाही विकास झाला. पुढच्या दोन पायाचे रुपांतर हातात झाले. हाताच्या साहय्याने तो शिकारीसाठी आवश्यक असलेली साधने तयार करू लागला. यामुळे मानवाचे जीवन अधिक सोपे आणि सक्षम झाले.
मानवाच्या उत्क्रांतीचे भविष्य
मानवी उत्क्रांती अजूनही सुरू आहे. आगामी 10 हजार वर्षांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाची प्रगती आणि जागतिकीकरणामुळे, मानवामधील आनुवंशिक विविधता कमी होण्याची शक्यता आहे. याला ‘द ग्रेट ॲव्हरेजिंग’ म्हणतात.
काही तज्ज्ञ मानतात की, भविष्यात मानव अजून उंच आणि वजनाने हलका होऊ शकतो. तसेच, मेंदू आकाराने कमी होऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला खूप विचार करण्याची आवश्यकता पडणार नाही. काही संशोधकांच्या मते मानवी वृत्ती कमी आक्रमक होईल आणि आपले सामाजिक व्यवहार अधिक शांततामय होऊ शकतील.
पुढील दहा हजार वर्षांत मानव कसा असेल, हे सांगता येणे कठीण आहे. पण, आपण आज जे निर्णय घेतो, त्याचा भविष्यावर मोठा परिणाम होईल, हे नक्की