इन्फ्रारेड कॉन्टॅक्ट लेन्समुळे अंधारातसुद्धा स्पष्ट दिसणार!

infrared contact lenses : चीनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ मधल्या वैज्ञानिकांनी एक अशा प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला आहे, ज्यामुळे तुम्हाला अंधारातही स्पष्ट दिसू शकतं
[gspeech type=button]

अंधाऱ्या ठिकाणी किंवा रात्रीच्यावेळी अचानक घरची लाईट गेली की आपल्याला आजूबाजूचे काहीच नीट दिसत नाही. सगळीकडे काळोखच दिसतो. अशावेळी तुम्ही कधी विचार केलाय का, की आपल्याला अंधारातही स्पष्ट दिसलं तर किती बरं होईल?

हो,आता हे लवकरच खरं होणार आहे. चीनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ मधल्या वैज्ञानिकांनी एक अशा प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला आहे, ज्यामुळे तुम्हाला अंधारातही स्पष्ट दिसू शकतं. ही एक खास लेन्स आहे जी इन्फ्रारेड प्रकाश वापरते. चला, या लेन्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

इन्फ्रारेड कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे काय?

ही एक नवीन प्रकारची कॉन्टॅक्ट लेन्स आहे. साधारणपणे आपण अनेकवेळेस चष्माच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स आपण डोळ्यांवर लावतो. पण या नवीन लेन्सने इन्फ्रारेड प्रकाशाचा उपयोग करून आपल्याला अंधारात किंवा डोळे मिटूनही पाहता येणार आहे.

या लेन्स काही खास Nano particles (अतिसूक्ष्म कण)
पासून बनतात. लेन्समध्ये असलेले Nano particles इन्फ्रारेड प्रकाश शोषून घेतात. जेव्हा इन्फ्रारेड किरण या लेन्सवर पडतात, तेव्हा हे कण त्या किरणांना आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशात बदलतात. त्यामुळे आपल्याला अंधारातही वस्तू दिसू लागतात. हे Nano particles इतके सूक्ष्म असतात की ते लेन्समध्ये असूनही लेन्स पारदर्शक राहते आणि आपल्याला नेहमीसारखंच सर्वकाही दिसतं.

प्रोफेसर टियान शुए म्हणतात की, या लेन्समुळे ज्यांना रंगांधळेपणा असतो म्हणजेच रंगांची ओळख नीट पटत नाही, त्यांनाही या लेन्समुळे खूप मदत होईल. प्रोफेसर टियान शुए यांनी असंही सांगितलं की, “या नवीन शोधामुळे आपण अशी उपकरणं बनवू शकतो, ज्यामुळे माणसाला ‘सुपर-व्हिजन’ मिळेल.”

हेही वाचा:कृत्रिम कॉर्नियाच्या सहाय्याने 10 वर्षांनंतर दृष्टी परत ! 

या लेन्स कशा काम करतात?

या अभ्यासात वैज्ञानिकांनी सांगितलं की त्यांनी लहान-लहान Nano particles घेतले आणि ते आपण वापरतो त्याच कॉन्टॅक्ट लेन्सच्या मऊ पदार्थांमध्ये मिसळले. हे पदार्थ आपल्या डोळ्यांना हानी पोहोचवत नाहीत. त्यानंतर लेन्स पूर्णतः सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर, त्यांनी त्या लेन्स उंदीर आणि माणसावर वापरून पाहिल्या.

उंदरांच्या तपासणी मध्ये, ज्या उंदरांना लेन्स घातल्या होत्या त्यांना अंधारी पेटी आणि इन्फ्रारेड दिव्याची पेटी यातला फरक ओळखता आला. त्यांनी जास्तवेळा अंधारी पेटी निवडली. याचाच अर्थ त्यांना तो इन्फ्रारेड प्रकाश दिसत होता. आणि ज्या उंदरांना लेन्स लावल्या नव्हत्या, त्यांना मात्र यामधला फरक कळला नाही.

माणसांवर जेव्हा लेन्स तपासल्या, तेव्हा त्यांना चमकणारे इन्फ्रारेड सिग्नल दिसले आणि प्रकाश कुठून येतोय तेही सांगता आलं. माणसांना अजून चांगल्याप्रकारे स्पष्ट दिसण्यासाठी, संशोधकांनी upconversion nanoparticles नावाचे खास कण बनवले आहेत. हे कण इन्फ्रारेड प्रकाश शोषून घेतात आणि तो प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगात बदलतात.

या लेन्समुळे काय फायदा होईल?

आज जे नाईट-व्हिजन गॉगल्स वापरले जातात, ते खूप मोठे असतात आणि त्यासाठी बॅटरी लागते. शिवाय ते फक्त हिरव्या रंगात दृश्यं दाखवतात. पण या नवीन कॉन्टॅक्ट लेन्स खूपच हलक्या, विजेशिवाय चालणाऱ्या आणि अनेक रंगांमध्ये स्पष्ट चित्र दाखवणाऱ्या आहेत.

यामुळे अनेक ठिकाणी , जसं की लष्कर, पोलीस, सुरक्षा यंत्रणा किंवा जंगलात काम करणारे लोक यांना या लेन्स चा खूप फायदा होणार आहे. शिवाय, रंगांधळेपणा असलेल्या लोकांनाही हे तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकतं.

पण, या लेन्स अजून पूर्णपणे परफेक्ट नाहीत. लेन्समध्ये असलेल्या कणांमध्ये थोडी हालचाल होत असते. त्यामुळे कधी कधी चित्रं थोडी धूसर वाटू शकतात. पण वैज्ञानिक यामध्ये आणखी सुधारणा करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dance : डिप्रेशन कमी करण्यासाठी गोळ्या किंवा थेरपी घेण्यापेक्षा, डान्स सर्वात उत्तम व्यायाम प्रकार आहे असं हे नवीन संशोधन सांगतंय.
बुद्धिमत्ता ही केवळ जनुकांवर अवलंबून नसते. मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासावर त्यांच्या घरातील वातावरण, त्यांना मिळणारं शिक्षण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती या
tiger's tongue : आपल्याला वाटतं की वाघ शिकार पकडतात आणि दात व पंजाने फाडतात. पण, ते शिकार कापण्यासाठी त्याच्या जिभेचा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ