कानात ‘इयर बडस्’ घालणं थांबवा!

Earbuds : कानातला मळ काढण्यासाठी सर्रास वापरले जाणारे कॉटन बड्स खरं तर फायद्याऐवजी नुकसानच करतात, असं मत कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कॉटन बड्सचा वापर केल्याने कानातील नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया बाधित होते, ज्यामुळे कानात मळ साचून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
[gspeech type=button]

आपण सगळेच जण अनेकवेळा कानात इयर बड्स किंवा सेफ्टी पिन्स, काड्यांसारख्या वस्तूंचा वापर कान साफ करण्यासाठी वापरतो, बरोबर ? रोजच्या सवयीचा एक भाग असल्यासारखं आपण सर्वच हे करतो. ‘कान स्वच्छ ठेवणं’ हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं आपल्याला वाटतं. पण तुम्हाला माहीत आहे का, कान साफ करण्यासाठी वापरले जाणारे हेच इयर बड्स किंवा कॉटन बड्स खरं तर आपल्या कानासाठी खूप हानिकारक असू शकतात?

कानातला मळ काढण्यासाठी सर्रास वापरले जाणारे कॉटन बड्स खरं तर फायद्याऐवजी नुकसानच करतात, असं मत कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कॉटन बड्सचा वापर केल्याने कानातील नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया बाधित होते, ज्यामुळे कानात मळ साचून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कान आपोआप साफ होतात

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या कानात एक नैसर्गिक ‘कन्व्हेयर बेल्ट’ सारखी यंत्रणा असते. जी कानातील मळ हळूहळू बाहेर ढकलते. हा मळ घाण नाही, तर तो कवच म्हणून काम करतो. डॉ. गौरी शंकर एम. यांच्या मते, हा मळ कानातल्या त्वचेला मऊ ठेवतो, धूळ आणि जिवाणू आत जाण्यापासून थांबवतो आणि बुरशीचा संसर्ग (fungal properties) होण्यापासूनही वाचवतो.

मात्र, कॉटन बड्सचा वापर केल्यास ही नैसर्गिक प्रक्रिया थांबते. बड्समुळे काही प्रमाणात मळ बाहेर येतो, पण बाकीचा मळ आणखी आत ढकलला जातो, त्यामुळे तो कानाच्या पडद्याजवळ जमा होतो.

आपण बड्स वापरतो तेव्हा काय होतं?

डॉ. सुहेल हसन सांगतात की, “इयर बड्समुळे मळ बाहेर येण्याऐवजी तो आणखी आत ढकलला जातो.” यामुळे मळ कानाच्या पडद्याजवळ जाऊन अडकतो, कडक होतो आणि यामुळे कान दुखणे, खाज येणे किंवा कमी ऐकू येणे अशा समस्या सुरू होतात. तुम्हाला वाटतं तुम्ही कान स्वच्छ करत आहात, पण खरं तर तुम्ही मळ आणखी आत ढकलत असता.म्हणून, तज्ज्ञ कॉटन बड्सचा वापर टाळण्याचा सल्ला देतात.

बड्सचे शारीरिक धोके

1.कान दुखणे आणि रक्त येणे

कानातली त्वचा खूप नाजूक असते. जास्त जोर लावून कान साफ केल्यास त्वचेला इजा होऊ शकते आणि कधी कधी रक्तही येऊ शकतं.

2.कानाच्या पडद्याला इजा

काहीवेळा, चुकून बड खूप आत गेल्यास कानाचा पडदा फाटू शकतो. असं झाल्यास याचा खूप त्रास सहन करावा लागतो आणि यासाठी योग्य उपचारांची गरज लागते.

3.संसर्ग

सतत कान खाजवून किंवा बड्सचा वापर करून कानात जखम झाल्यास तिथे संसर्ग (Infection) होऊ शकतो. याला ‘ओटायटिस एक्सटर्ना’ म्हणतात. डॉ. अश्विनी आर. म्हणतात की, लहान मुलांचे कान खूप नाजूक असल्यामुळे त्यांना याचा धोका जास्त असतो.

मग कान कसे स्वच्छ करायचे?

डॉक्टरांच्या मते, कानाच्या आत काहीही घालण्याची गरज नाही. तुम्ही फक्त कानाच्या बाहेरचा भाग एका स्वच्छ कपड्याने पुसू शकता. डॉ. प्रिया सांगतात की, जर तुम्हाला कान पूर्णपणे बंद झाल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही ग्लिसरीन किंवा मिनरल ऑइलचे काही थेंब कानात टाकू शकता. यामुळे मळ मऊ होतो. जर तरीही आराम मिळाला नाही, तर कान-नाक-घसा तज्ज्ञाकडे जाऊन तो मळ काढून घ्या.

घरगुती उपायांपासून सावध रहा

आपल्यापैकी काही लोक बड्सच्या ऐवजी पेन, हेअरपीन, मेणबत्ती (ear candle) किंवा अगदी माचिसची काडी वापरतात. डॉक्टर सनी मेहरा सांगतात की, त्यांनी अनेक रुग्णांच्या कानातून अशा वस्तू बाहेर काढल्या आहेत. हे सगळे उपाय खूप धोकादायक आहेत. आपल्या कानांना एकदा इजा झाली तर ती भरून काढणे अवघड असते. म्हणून इयर बड्सचा वापर टाळा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

postpartum health recovery - वैज्ञानिक अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे की, मूलाला जन्म देणाऱ्या ‘आईची रिकव्हरी’ म्हणजे पूर्ण बरी होण्यासाठी
आपण आनंदी असलो की आपल्याला उत्साह येतो आणि दुःखी असलो की सगळी एनर्जी गेल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट जी फक्त
Rent people: माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कितीही एकटं राहायचं म्हटलं तरी सोबत असली की जरा हायसं वाटतं. मग ती

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ