आज आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून!

Strawberry Moon - आजच्या पौर्णिमेला आकाशात दिसणाऱ्या चंद्रांचं नाव जरी स्ट्रॉबेरी मून असं असलं तरी तो खराखूरा स्ट्रॉबेरीसारखा गुलाबी रंगाचा असतो असं नाही. शेतपीकाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने या पौर्णिमेच्या चंद्राला नाव पडलं हे जाणून घेऊयात.
[gspeech type=button]

खगोलप्रेमिंसह आपल्या सगळ्यासाठी 11 जूनची ही ज्येष्ठ पौर्णिमा विशेष असणार आहे. कारण आज आपल्याला आकाशात स्ट्रॉबेरी मूनचं दर्शन होणार आहे.  यापूर्वी 2006 साली असा स्ट्रॉबेरी मूनचं दर्शन घडलं होतं. तर यानंतर तब्बल 2043 साली स्ट्रॉबेरी मून पाहायला मिळणार आहे. मात्र, चंद्राच्या स्थिरता ( Lunar Standstill) स्थितीमुळे हा स्ट्रॉबेरी मून आपल्याला खूप छोट्या आकारात दिसणार आहे. 

जून महिन्यातल्या शेवटच्या पौर्णिमेला ‘स्ट्रॉबेरी मून’ नाव कसं पडलं? 

आजच्या पौर्णिमेला आकाशात दिसणाऱ्या चंद्रांचं नाव जरी स्ट्रॉबेरी मून असं असलं तरी तो खराखूरा स्ट्रॉबेरीसारखा गुलाबी रंगाचा असतो असं नाही. यामागची कथा अशी आहे की, या पौर्णिमेनंतरच्या काळात अमेरिकेमध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकांची काढणी केली जाते. शेतीच्या परंपरेमुळे या पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला स्ट्रॉबेरी मून असं विशेष नाव दिलं आहे. 

चंद्र आकाराने छोटा दिसतो  

या काळात चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेपासून खूप दूर अंतरावर असतो. या स्थितीला खगोलीय भाषेत Lunar Standstill  म्हणजे चंद्राची स्थिरता असं म्हटलं जातं त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर चंद्र हा छोट्या आकारात दिसतो. यामुळे त्याला ‘मायक्रो मून’ किंवा ‘मेजर लूनार स्टॅंडस्टील’ या नावानीही संबोधलं जातं. ही स्थिती दर साडे अठरा  वर्षांनी निर्माण होत असते. त्यामुळे या वर्षानंतर थेट 2043 साली आपल्याला पुन्हा चंद्राची स्थिरता अवस्थेतला पौर्णिमेचा चंद्र पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाचा : तुम्हाला माहितेय का? आपले रक्तगट कसे ओळखतात?

भारतातून हा चंद्र कुठून दिसेल

भारतातून स्ट्रॉबेरी मून हा 11 जून 2025 रोजी आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला दिसणार आहे. दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि बेंगळुरू या राज्यातून संध्याकाळी 7 च्या नंतर दिसणार आहे. 

‘हनीमून’ सिझन!

अमेरिका खंडामध्ये या पौर्णिमेच्या चंद्राला स्ट्रॉबेरी मून म्हटलं जातं. तर यूरोपमध्ये याला ‘हनीमून’ असं म्हटलं जातं. इथेही या नावाला शेतीचा संदर्भ आहे. या काळामध्ये युरोपमध्ये अनेक ठिकाणी मधाच्या पोळ्यातून मध काढण्याला सुरुवात केली जाते. त्यामुळे या पौर्णिमेला हनीमून म्हटलं जातं. 

या काळामध्ये लग्नाचा हंगाम असतो त्यामुळे या नावाचा थेट संबंध हा लग्नविधीशीही जोडला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संगीत हे अर्भक आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच चांगलं संगीत ऐकवावं, त्यांच्यासोबत बालगीतं
आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप
liver fat : सोडा, शीतपेयं आणि पॅकेटमधल्या पदार्थांमध्ये जी साखर असते, ती आपल्या लिव्हरसाठी विषारी असते. पण यावर एक सोपा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ