टूथपेस्ट आणि तोंडातील बॅक्टेरिया

Tuthpaste: तोंडातील बॅक्टेरियांचे संतुलन राखणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यापैकी काही चांगले असतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. तर काही वाईट बॅक्टेरिया असतात, जे दात आणि हिरड्यांचे आजार निर्माण करू शकतात.
[gspeech type=button]

दररोज आपण दात स्वच्छ करण्यासाठी, श्वासातील दुर्गंध टाळण्यासाठी आणि दात किडण्यापासून वाचवण्यासाठी टूथपेस्ट वापरतो. पण, ही टूथपेस्ट आपल्या तोंडातील बॅक्टेरियावर ( oral microbiome)  काय परिणाम करते?  याचा विचार आपण कधी केला आहे का? हे बॅक्टेरिया आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. याचा विचार आपण क्वचितच करतो.

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, तोंडातील बॅक्टेरियांचे संतुलन राखणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यापैकी काही चांगले असतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. तर काही वाईट बॅक्टेरिया असतात, जे दात आणि हिरड्यांचे आजार निर्माण करू शकतात.

तोंडातील बॅक्टेरियांचे काम काय?

आपल्या तोंडात जवळपास 700 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया केवळ दात आणि हिरड्यांवरच नाही तर लाळेतही असतात. चांगले बॅक्टेरिया तोंडातील ॲसिड आणि क्षार (pH) नियंत्रित ठेवतात. अन्न पचवण्यास मदत करतात आणि हानीकारक जंतूंना नष्ट करतात. पण जेव्हा दात स्वच्छ केले जात नाहीत किंवा काही आजार होतात, तेव्हा वाईट बॅक्टेरिया वाढू लागतात. यालाच ‘डिस्बायोसिस’ म्हणतात आणि यामुळे दात किडणे, हिरड्यांचे आजार होणे अशा समस्या निर्माण होतात.

टूथपेस्टचं काम

आपण समजतो की टूथपेस्ट म्हणजे बॅक्टेरियांना मारणारं औषध. पण तसं नाही! टूथपेस्टचं मुख्य काम आहे दातांवर आणि हिरड्यांवर तयार होणारा एक पातळ थर (biofilm) काढून टाकणं. या थरातच वाईट बॅक्टेरिया वाढतात आणि दातांना खराब करतात. अनेक टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असते, जे दातांच्या आवरणाला मजबूत करून दात किडण्यापासून संरक्षण करते. पण, फ्लोराईड बॅक्टेरिया मारत नाही. तर ‘स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स’ नावाच्या कीड तयार करणाऱ्या बॅक्टेरियाना दात खराब करण्यापासून थांबवतं.

काही टूथपेस्टमध्ये ‘ट्रिक्लोसन’ नावाचं जंतुनाशक असायचं. पण ते सुरक्षित नसल्याने काही देशांनी यावर बंदी आणली आहे. आता ‘स्टॅनस फ्लोराईड’ आणि ‘झिंक कंपाउंड्स’ वापरतात. हे वाईट जंतूंना मारतात, पण यामुळे चांगले जंतूही मरतात का, यावर अजून संशोधन सुरू आहे.

नवीन संशोधनातून कळल की, टूथपेस्टमधील जंतुनाशक चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया कमी करतात. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरियांचं  प्रमाण कमी जास्त होतं असतं. पण, दात घासल्यावर बॅक्टेरिया लवकर परत येतात, त्यामुळे हा बदल तात्पुरता असतो.

भविष्यात टूथपेस्टमध्ये काय बदल होऊ शकतात?

शास्त्रज्ञ आता अशी टूथपेस्ट बनवत आहेत, जी फक्त वाईट बॅक्टेरिया मारेल आणि चांगले बॅक्टेरिया वाढवेल. ‘प्रोबायोटिक्स’ आणि ‘प्रीबायोटिक्स’ चांगले बॅक्टेरिया वाढवायला मदत करू शकतात. आर्जिनिन (arginine) हा नैसर्गिक घटक चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करतो. वनस्पतींपासून मिळणारे नैसर्गिक जंतुनाशक पदार्थ वाईट बॅक्टेरियांची बायोफिल्म तोडतात, पण चांगले बॅक्टेरिया सुरक्षित ठेवतात. मात्र, या घटकांवर अजून अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.

तोंडातील आरोग्य आणि संपूर्ण शरीरावर परिणाम

तोंडातील बॅक्टेरियांचे संतुलन राखणे फक्त दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. संशोधनात असे दिसून आले की तोंडातील वाईट बॅक्टेरियांमुळे होणारी सूज हृदयविकार, मधुमेह आणि गर्भधारणेसंबंधी अडचणी यांच्याशी संबंधित असू शकते. म्हणूनच, तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे.

दात कसे स्वच्छ ठेवावेत?

दिवसातून दोन वेळा फ्लोराईड टूथपेस्टने दात घासा. टूथपेस्ट थुंकून टाका आणि दररोज दातांच्यामधील जागा स्वच्छ करा. नियमित दात घासल्याने तोंडातील बॅक्टेरियांचे प्रमाण संतुलित राहते. आणि दात व हिरड्यांचे आजार होण्याचा धोका कमी होतो. भविष्यात बॅक्टेरियांचे संतुलन राखणारी आणि अधिक प्रभावी टूथपेस्ट विकसित होईल, असा संशोधकांचा अंदाज आहे.

तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, दातांची काळजी घेणे आणि योग्य टूथपेस्ट निवडणे हे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संगीत हे अर्भक आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच चांगलं संगीत ऐकवावं, त्यांच्यासोबत बालगीतं
आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला किंवा मुलाला गुदगुल्या करतो तेव्हा ते बाळ हसतं, खिदळतं आणि आपल्याला वाटतं की त्याला खूप
liver fat : सोडा, शीतपेयं आणि पॅकेटमधल्या पदार्थांमध्ये जी साखर असते, ती आपल्या लिव्हरसाठी विषारी असते. पण यावर एक सोपा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ