मेंदू तल्लख ठेवायचा आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!

Human Brain: मेंदूला सतत ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यासाठी योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. मेंदूला नुकसान होणार नाही, असे अन्न खाणे हे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. त्यामुळे योग्य आहारावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढवा!
[gspeech type=button]

15 वर्षांपासून मानवी मेंदू विषयी अभ्यास करत असलेल्या तज्ज्ञांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. कॅलिफोर्नियामधील ब्रेन ऑप्टिमायझेशन क्लिनिकच्या संस्थापिका तसेच पाच वर्षे मेमरी केअर फॅसिलिटीच्या मेडिकल डायरेक्टर आणि न्यूरोकॉग्निटिव्ह मेडिसिनमध्ये विशेष प्राविण्य असलेल्या डॉ. हीदर सॅंडिसन यांच्या मते, आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी योग्य आहार का गरजेचा?

डॉ.सॅंडिसन सांगतात की, आपल्या शरीराच्या तुलनेत मेंदू फक्त 2% वजनाचा असतो, पण तो दररोज 20% पेक्षा जास्त ऊर्जा वापरतो. त्यामुळे मेंदूला योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी, त्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूसाठी पोषक आणि कमी कार्बोहायड्रेट असलेले अन्न खावे. मेंदूमध्ये नवीन ऊती तयार करण्यासाठी, मेंदूला सतत ताजेतवाने व तल्लख ठेवण्यासाठी योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मेंदू जास्त काळ तरुण, तीक्ष्ण आणि ऊर्जावान राहतो.

कार्बोहायड्रेटवर नियंत्रण ठेवा 

डॉ. सॅंडिसन यांच्या मते, मेंदूला पोषण मिळण्यासाठी दररोज 130 ग्रॅम कार्बोहायड्रेट पुरेसे असते, याचा अर्थ असा की निरोगी लोकांना मेंदूच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज इतके कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. पण  जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे रक्तातील साखर अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते, यामुळे चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे आणि एकाग्रता कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, जर मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात एक महत्त्वाची गोष्ट बदलायची असेल, तर जास्त कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांऐवजी कमी कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करा.

मेंदूसाठी कोणते अन्न चांगले?

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदू तल्लख ठेवण्यासाठी डॉ. सॅंडिसन यांनी काही सोपे आहारपर्याय सुचवले आहेत:

  1. सँडविच, चिप्सऐवजी सूप आणि सॅलड खा.
  2. मिलेटस् खाण्यावर भर द्या.
  3. गोड खायचे असल्यास, आईस्क्रीमऐवजी स्ट्रॉबेरी, करवंद, तुती, यासारखी फळे आणि व्हिप्ड क्रीम किंवा डार्क चॉकलेट खा.

मेंदूला चालना देण्यासाठी हे करा!

बुद्धीला चालना देणारे खेळ खेळा. क्रॉसवर्ड, सुडोकू आणि जिगसॉ पझल्स सोडवा. तसेच स्मरणशक्ती सुधारण्यासाठी Stare, Memory, Guess Who? सारखे खेळ खेळा. वाचन आणि नवीन कौशल्ये शिका आणि नियमित व्यायाम, ध्यान करा.

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

मेंदूला सतत ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यासाठी योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. मेंदूला नुकसान होणार नाही, असे अन्न खाणे हे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. त्यामुळे योग्य आहारावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढवा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

monsoon: पक्षी त्यांच्या वागणुकीतून, आवाजातून, घरटी बांधण्याच्या पद्धतीतून आणि हालचालींमधून पावसाची चाहूल देतात. शेतकरी, आदिवासी आणि गावाकडचे लोक आजही हे
infrared contact lenses : चीनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ मधल्या वैज्ञानिकांनी एक अशा प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला आहे,
जपानमधल्या शास्त्रज्ञांनी एक असं औषध शोधलंय, ज्यामुळे माणसाचे दात नैसर्गिकरीत्या पुन्हा येऊ शकतील. जसं बाळ लहान असताना त्याला वर्षभरात दात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ