घरात नवीन बाळ जन्माला येणार हे बातमी मिळताच मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे मुलगा होणार की मुलगी? अनेकदा गर्भवती महिलेची स्थिती, तिच्या गर्भाचा आकार, तिला काय खायला वाटतं काय नाही, अशा काही चिन्हांवरुन गर्भात मुलगा आणि की मुलगी याचा अंदाज घेतला जातो. मात्र, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या काही कुटुंबामध्ये फक्त मुलीचं किंवा मुलंच जन्माला आल्याचं पाहिलं असेल. म्हणजे सर्व सख्खे, चुलत्या भावंडामध्ये एकच बहिण किंवा सगळ्यां बहिणींमध्ये एकच भाऊ असं तुम्ही पाहिलं असेल. आतापर्यंत आपल्याला हा सगळा योगायोग वाटत होता असेल. पण याच्यामागे शास्त्रीय कारण आहे. काही कुटुंबामध्ये फक्त मुलंच किंवा फक्त मुलीचं का जन्माला येतात यामागचं कारण संशोधकांनी शोधून काढलं आहे.
मुलगा की मुलगी ?
हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील संशोधकांनी 1956 ते 2015 दरम्यान 58 हजार अमेरिकन परिचारिकांनी केलेल्या 1 लाख 46 हजारहून अधिक गर्भधारणेचा डेटा मिळवून त्याचं विश्लेषण केलं. यात त्यांना असं आढळून आलं की ज्या कुटुंबांमध्ये अनेक मुले आहेत त्यांना सर्व मुले किंवा सर्व मुली असण्याची शक्यता अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ही पद्धत 50-50 टक्क्यामध्ये उद्भवत नाही. उदाहरणार्थ, तीन मुली असलेल्या कुटुंबांमध्ये चौथी मुलगी असण्याची शक्यता 58% होती. तर, तीन मुले असलेल्या कुटुंबांमध्ये दुसरा मुलगा असण्याची शक्यता 61 टक्के होती.
अभ्यासाचे लेखक जॉर्ज चावरो यांच्या मते, “जर तुम्हाला दोन किंवा तीन मुली झाल्या असतील आणि तुम्ही मुलगा होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की तुमची शक्यता 50 टक्के हो किंवा नाही अशी असणार आहे. यात तुम्हाला आणखीन दुसरी मुलगी नसण्याची शक्यता जास्त आहे.”
आईचे वय हे लिंग ठरवण्यामध्ये भूमिका बजावू शकते
या अभ्यासात असं आढळून आलं की ज्या महिलांना 28 वर्षांनंतर मुलं होतात त्यांना एकाच लिंगाची मुलं होण्याची शक्यता जास्त असते. चावरो यांनी असं सुचवले की हे महिलांच्या वयानुसार जैविक बदलांमुळे घडत असावं. जसं की, महिलेचं वय जसं वाढत जातं त्यानुसार तिच्या योनीतील आम्लता वाढते. याचा परिणाम Y गुणसूत्र वाहून नेणाऱ्या शुक्राणूंच्या अस्तित्वावर होतो. पुरुषाचे घटक हे जरी लिंग ठरवण्यात मुख्य भूमिका बजावत असले तरी या घटकांचाही परिणाम होतो हे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या संशोधनामध्ये पुरुषांची माहिती घेतलेली नव्हती.
अनुवांशिक घटक – आणि त्याचे रहस्य
संशोधकांना फक्त मुले किंवा फक्त मुली असण्याशी संबंधित दोन जीन्स देखील आढळल्या. जन्माच्या लिंगाचे निर्धारण करण्यात या जीन्सचं कार्य अज्ञात असलं तरी, त्यांच्या उपस्थितीवरून असं दिसून येतं की निरीक्षण केलेल्या नमुन्यांमध्ये अनुवंशिक घटक असू शकतो. मात्र. या तथ्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील अनुवंशशास्त्रज्ञ इयान मॅथिसन म्हणाले की, अनुवांशिक विश्लेषणासाठी वापरलेला नमुना आकार मर्यादित आहे. त्यामुळे अनुवांशिक कारणामुळे एखाद्या कुटुंबात फक्त मुलंच की मुली जन्मतात हे म्हणणं शक्य नाही. त्यासाठी आणखिन संशोधन करण्याची गरज आहे.
केवळ जीवशास्त्रच नाही तर कुटुंबाचे निर्णय देखील महत्त्वाचे
या अभ्यासात एक रंजक गोष्ट आढळून आली ती म्हणजे, पहिल्या दोन गर्भधारणेमध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही झाल्यावर दाम्पत्य पुन्हा अपत्य होऊ देत नाहीत. यामुळे जन्माच्या लिंगाच्या विस्तृत डेटामध्ये फरक पडू शकतो. यासाठी, संशोधकांनी शेवटी जन्माला येणाऱ्या बाळाला गृहित धरत नाहीत. तरीही यामध्ये समान नमुना आढळला. त्यानुसार जन्माच्या लिंगाच्या शक्यता समान प्रमाणात वितरित केल्या जात नाहीत हे स्पष्ट होतं.
फक्त मुलंच किंवा मुलीच का जन्मतात याचा अधिक अभ्यास आवश्यक
या निष्कर्षांमुळे काही कुटुंबांमध्ये, जसे की माल्कम इन द मिडल किंवा प्राइड अँड प्रेज्युडिस मधील काल्पनिक कुटुंबांमध्ये, एकाच लिंगाची मुले का होतात हे स्पष्ट होण्यास मदत होते. पण ते सांख्यिकीयदृष्ट्या अशक्य आहे. संशोधकांचे म्हणणं आहे की पोषण, जीवनशैली आणि पर्यावरणीय रसायनांच्या संपर्कासह इतर संभाव्य घटकांचं ही परीक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करणं आवश्यक आहे.
यामध्ये पुढील घटकांचा विचार केला पाहिजे. जसं की वंश, केसांचा रंग, बॉडी मास इंडेक्स आणि रक्तगट – जन्माच्या लिंग पद्धतीशी संबंधित नव्हते. तथापि, अभ्यासातील लोकसंख्या 95 टक्के गोरी होती आणि त्यात फक्त पारिचारिकांचा समावेश होता. त्यामुळे संशोधकांनी या अभ्यासावरुन सर्वसमावेशन निष्कर्ष काढता आला नाही. त्यामुळे या विषयावर विविध ठिकाणच्या नमुना चाचणीसह व्यापक प्रमाणात अभ्यास करणं गरजेचं आहे.