शेफ डोक्यावर ती लांब, पांढरी टोपी का घालतात?

chef's hat : शेफ टोपीची सुरुवात फॅशन म्हणून झाली नव्हती. ती शेफच्या पदाचा, त्याच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा एक सन्मान म्हणून वापरली जायची. पूर्वी स्वयंपाकघरात कोण किती मोठा शेफ आहे हे त्याच्या टोपीच्या उंचीवरून ठरत होतं. ज्या शेफची टोपी जास्त उंच, तो तितका मोठा आणि अनुभवी शेफ समजला जायचा.
[gspeech type=button]

तुम्ही अनेकवेळा हॉटेल किंवा टीव्हीवर कुकिंग शोमध्ये शेफ लोकांना पाहिले असेल. त्यांच्या डोक्यावर एक लांब, पांढरी टोपी असते. ती टोपी इतकी उठून दिसते की लगेचच नजर जाते. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की शेफ लोक ही टोपी का घालतात? चला तर मग, आज आपण जाणून घेऊया की शेफ लोक ही टोपी का घालतात, तिचा इतिहास काय आहे आणि आजकाल कोणत्या प्रकारच्या टोप्या वापरल्या जातात.

टोपी म्हणजे शेफची ओळख

या टोपीची सुरुवात फॅशन म्हणून झाली नव्हती. ती शेफच्या पदाचा, त्याच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा एक सन्मान म्हणून वापरली जायची. पूर्वी स्वयंपाकघरात कोण किती मोठा शेफ आहे हे त्याच्या टोपीच्या उंचीवरून ठरत होतं. ज्या शेफची टोपी जास्त उंच, तो तितका मोठा आणि अनुभवी शेफ समजला जायचा.

ही टोपी दिसायला लांबट, पांढऱ्या रंगाची आणि खूप घड्यांनी भरलेली असते. तिला फ्रेंच भाषेत ‘टोक ब्लांच’ म्हणतात. ‘टोक’ म्हणजे टोपी आणि ‘ब्लांच’ म्हणजे पांढरी.

शेफ टोपीचा इतिहास

या शेफ टोप्या कुठून आल्या, याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. काही जण म्हणतात की त्या खूप जुन्या ‘असीरियन’ किंवा ‘बायझंटाईन ग्रीस’ संस्कृतीतून आल्या आहेत. पण, आज आपण जी पांढरी शेफ टोपी पाहतो, ती घालण्याची पद्धत 18 व्या शतकात फ्रान्समध्ये सुरू झाली असं म्हटलं जातं.

मारी-अँटोईन कॅरेम नावाच्या एका प्रसिद्ध फ्रेंच शेफने या टोक टोपीचा वापर सुरू केला. त्याच्या आधी शेफ लोक साध्या टोप्या वापरायचे. पण कॅरेमने त्या टोप्यांना एक विशिष्ट प्रोफेशनल लुक दिला. त्याने पांढऱ्या रंगाचा कोट आणि टोपी हा शेफ युनिफॉर्मचा भाग बनवला.

कॅरेमचं म्हणण्यानुसार शेफचं काम म्हणजे एक कला आहे आणि त्या कलेला योग्य मान-सन्मान मिळायला हवा. म्हणून त्याने शेफसाठी खास टोपी आणि कपड्यांचा वापर सुरू केला. असं म्हणतात की, कॅरेम स्वतः 18 इंच उंच टोपी घालायचा. शेफच्या टोपीची उंची पाहून स्वयंपाकघरातील त्या शेफचा दर्जा ओळखला जायचा.

हेही वाचा : साखरेऐवजी गूळ का खावा?

टोपीच्या उंचीचा आणि घड्यांचा अर्थ

या टोप्यांवर बारीक बारीक घड्या असतात त्यामागे देखील खास अर्थ असल्याचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की एका टोपीत 100 घड्या असतील, तर त्या शेफकडे अंड्याचे 100 वेगवेगळे प्रकार तयार करण्याचं कौशल्य आहे.

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त शेफ टोपी घालण्यामागे काही गरजेच्या गोष्टी देखील आहेत. ज्याचा उपयोग जेवण बनवताना शेफना होतो.

स्वयंपाक करताना केस अन्नात पडू नयेत, म्हणून टोपी घालणं गरजेचं असतं. यामुळे अन्न बनवताना स्वच्छता राहतं.

स्वयंपाक करताना गरम वातावरणात शेफना घाम येतो. टोपीमुळे हा घाम शोषला जातो आणि चेहऱ्यावर न येता थांबतो.

तसंच टोपी हा शेफ युनिफॉर्मचा एक भाग आहे. त्यामुळे शेफ प्रोफेशनल आणि व्यवस्थित दिसतो.

आजकाल वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या ?

जसा काळ बदलत गेला तसं शेफच्या टोप्यांच्या प्रकारातही बदल झाले आहेत.

शेफ बिनी – ही एक छोटी टोपी असते, जी डोक्याला एकदम फिट बसते. स्वयंपाक करताना ही आरामदायक वाटते.

बेरेट/फ्लॅट कॅप – ही टोपी थोडी कॅज्युअल आणि मऊसर असते. वरून सपाट असते आणि सहज घालता येते.

पिलबॉक्स हॅट – ही टोपी थोडीशी पुणेरी पगडीसारखी दिसते. उंच टोपीपेक्षा छोटी असल्यामुळे ती वापरणं सोपं असतं.

बेसबॉल कॅप्स – ओपन किचन किंवा फूड ट्रकवर काम करणारे शेफ ही टोपी घालतात. थोडी रिलॅक्स आणि मॉडर्न स्टाइलची वाटते.

आज जरी शेफ टोपीच्या डिझाईनमध्ये बदल झाला असला, तरी तिचं महत्त्व तसंच टिकून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Dance : डिप्रेशन कमी करण्यासाठी गोळ्या किंवा थेरपी घेण्यापेक्षा, डान्स सर्वात उत्तम व्यायाम प्रकार आहे असं हे नवीन संशोधन सांगतंय.
बुद्धिमत्ता ही केवळ जनुकांवर अवलंबून नसते. मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासावर त्यांच्या घरातील वातावरण, त्यांना मिळणारं शिक्षण आणि त्यांची आर्थिक परिस्थिती या
tiger's tongue : आपल्याला वाटतं की वाघ शिकार पकडतात आणि दात व पंजाने फाडतात. पण, ते शिकार कापण्यासाठी त्याच्या जिभेचा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ