लेबनॉन नवीन युध्दभूमी म्हणून का उदयास येत आहे?

Lebanon A New war land: ‘पूर्व आशियामधलं स्वित्झर्लँड’ अशी ओळख असलेल्या देशाचं आता मध्य आशियातली नविन युद्धभूमी म्हणून रूपांतर होत आहे. याला कारणीभूत आहे ते इस्त्रायल आणि हिजबुल्लाह या दोघांमधलं युद्ध.
[gspeech type=button]

मध्य आशियामधील इस्त्रायल आणि आजुबाजुच्या देशामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. गाझा बॉर्डर, पॅलेस्टाईन आणि आता लेबनॉनची भूमी या सगळ्या युद्धामध्ये होरपळून निघत आहे. ‘पूर्व आशियातलं स्वित्झर्लँड’ अशी ओळख असलेला लेबनॉन देशाची भूमी आता इस्त्रायल आणि हिजबुल्लाहसाठी युद्धभूमी झाली आहे. आत्तापर्यंत इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये 500 लेबनॉन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. पाच हजारांवर लोक जखमी झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
लेबनॉनच्या या अवस्थेसाठी जेवढी इस्त्रायल आणि हिजबुल्लाह कारणीभूत आहे, तेवढंच तेथील राजकीय नेतृत्व सुद्धा जबाबदार आहे.

लेबनॉनमधील राजकीय स्थिती

गेल्या दोन वर्षापासून म्हणजे सन 2022 पासून लेबनॉनमध्ये राष्ट्राध्यक्ष पद रिकामी आहे. त्यामुळे पंतप्रधान नजीब मिकाती हेच देशाचा कारभार सांभाळत आहेत. सत्तेची सूत्रे आपल्या हाती असावीत यासाठी पंतप्रधान नजीब मिकाती यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यास विरोध केला आहे. महत्त्वाचं म्हणजे लेबनॉन कायद्यानुसार जनतेला याविरोधात आवाज उठविता येत नाही. त्यामुळे देशात अनागोंदी माजवणाऱ्या हिजबुल्लाह सारख्या संघटनांवरही पंतप्रधान मिकाती यांचा काहीच ताबा नाही.

सुरक्षेशिवाय देशात आर्थिक संकटाचा मुद्दाही गंभीर बनत चालला आहे. मात्र, त्यावरही सरकारकडून कोणतीच पावलं उचलली जात नसल्याने लेबनॉनची जनता ही हतबल असल्याचं पाहायला मिळतं.

लेबनॉनमध्ये गेली 31 वर्षे (सन 1958 ते 1989) देशातल्या विविध धार्मिक समुदायांमध्ये सत्तेसाठी नागरी युद्ध सुरू होतं. 1989 मध्ये तैफ करार झाल्यावर या युद्धाला पूर्णविराम मिळाला. या तैफ करारामध्ये, धार्मिक आधारावर राजकीय सत्तेचं वाटप करण्यात आलं. उदाहरणार्थ, मॅरोनाइट ख्रिश्चन धर्मातला व्यक्ति हा राष्ट्राध्यक्ष पदावर असेल, पंतप्रधान हा शिया समाजातला तर सुन्नी समाजातला प्रतिनिधी हा संसदेचा अध्यक्ष असेल असं ठरवण्यात आलं. जेणेकरून सर्व धर्मियांना सत्तेत प्रतिनिधीत्व मिळून सत्तेत समतोल साधला जाईल. या करारानंतर हिजबुल्लाह संघटना सोडून इतर विविध धर्माच्या लष्करी स्वरूपातील संघटनांवर बंदी घालण्यात आली. आज याच हिजबुल्लाह संघटनेला नामशेष करण्यासाठी इस्त्रायल लेबनॉनवर हल्ले करत आहे.

लेबनॉन आणि युद्ध

सोळाव्या शतकामध्ये लेबनॉन हा देश ऑटोमन साम्राज्याच्या अखत्यारित होता. पहिल्या महायुद्धानंतर लेबनॉनचा ताबा फ्रान्सकडे दिला होता. सन 1944 साली लेबनॉन स्वतंत्र झाला. त्यानंतर लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक संघर्ष सुरू झाला. 1967 मध्ये इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी आजूबाजुच्या अरब देशांनी लेबनॉनच्या भूमीचा वापर केला. या दरम्यान लेबनॉनमधील अंतर्गत धार्मिक वाद हा सुरूच होता. याचाच फायदा घेत इस्त्रायलने 1978 मध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये आक्रमण केलं. तसंच इकडच्या ख्रिश्चन समाजाच्या लष्करी स्वरूपाच्या संघटनांना आर्थिक साहाय्य करायला सुरूवात केली.

सन 1982 मध्ये पॅलॅस्टिनी संघटनांकडून यूनायटेड किंग्डममध्ये इस्त्रायलच्या राजदूताची हत्या केली. पुढे लेबनॉनच्या इस्त्रायल समर्थक राष्ट्राध्यक्ष बचीर गेमेल यांच्या हत्येच्या घटनेनंतर इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण करायला सुरूवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या हिजबुल्लाह संघटनेनेही लेबनॉनमधल्या अंतर्गत संघर्षात इस्त्रायलच्या विरोधात लढायला सुरूवात केली.

लेबनॉनच्या सत्ताकारणात हिजबुल्लाहचा सहभाग

जागतिक पातळीवर हिजबुल्लाह संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून ओळखलं जातं. मात्र, लेबनॉन मध्ये ही संघटना राजकीय पक्ष असून 1992 पासून लेबनॉनमधल्या सर्व निवडणूका लढतेय. सरकारमध्ये आणि संसदेमध्ये सुद्धे हिजबुल्लाहचे नेते प्रतिनिधीत्व करतात.
यासोबतच हिजबुल्लाहला सिरीया आणि इराणचा पाठिंबा आहे. लेबनॉनच्या अधिकृत लष्करापेक्षाही हिजबुल्लाहची स्वत:ची लष्करी शक्ती जास्त मोठी आहे. त्यामुळे हिजबुल्लाह कधीही लष्करी उठाव करून लेबनॉनवर संपूर्ण अधिकार मिळवू शकते.

हिजबुल्लाहने लेबनॉन का ताब्यात घेतलं नाही?

इराण आणि सिरीयाचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाह संघटनेमध्ये 1 लाखांहून अधिक लोकं आहेत. 2 लाखाच्या आसपास रॉकेट्स, मिसाईल्स सारखी युद्धसामुग्री असल्याचा दावा ते करतात. हमासकडे जेवढी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत त्याहून अधिक क्षमतेचे शस्त्रास्त्रे हिजबुल्लाहकडे असल्याचा दावा या संघटनेकडून केला जात आहे.

तरिही सहजशक्य असूनही हिजबुल्लाह ही लेबनॉनमध्ये तालिबानी संघटनेसारखा लष्करी उठाव करून या देशाला पूर्ण ताब्यात घेत नाहीये. कारण, आंतरराष्ट्रीय पातळीवर हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना म्हणून ओळखलं जातं. मात्र, एक राजकीय पक्ष म्हणून ओळख मिळविण्यासाठी हिजबुल्लाह ही लेबनॉनमधल्या कायद्यानुसार सर्व निवडणुकांमध्ये भाग घेत कायदेशीर पद्धतीने देशाच्या सत्ताकारण आणि कायदे निर्मितीच्या माध्यमातून लेबनॉनमध्ये कार्यरत आहे.

हमासचं युद्ध हिजबुल्लाह का लढते?

हिजबुल्लाह ही शिया समाजाची संघटना सून्नी समाजाच्या हमासचं युद्ध का लढतेय असा आपसुकच प्रश्न आपल्याला पडू शकतो. याच मूळ कारण आहे, ते म्हणजे या दोन्ही संघटनांचा शत्रू इस्त्रायल आहे. आणि या दोन्ही संघटनांचा जन्म इराणमध्येच झाला आहे. या दोन्ही संघटनेचे मुख्यालय हे तेहरान मध्ये आहेत.

इस्त्रायलच्या विरोधात लढण्यासाठी या दोन्ही संघटना एकत्र झाल्या आहेत. त्यामुळे 7 ऑक्टोबर 2023 साली हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यावर इस्त्रायलने गाझावर प्रतिहल्ला केला. यावेळी हिजबुल्लाह संघटनाही हमासच्या मदतीला येऊन इस्त्रायल विरोधात लढू लागली.
आत्तापर्यंत हिजबुल्लाहने इस्त्रायलवर 8 हजार मिसाईल हल्ले केले आहेत. दरम्यान, इस्त्रायलच्या हल्ल्यात ऑक्टोबर 2023 पासून ते आत्तापर्यंत 589 लोकांचा मृत्यू झाला. सोमवारी केलेल्या हल्ल्यात 274 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य खात्याने दिली आहे. याचबरोबर इस्त्रायल-लेबनॉन सीमांवरील जवळपास 2 लाख लोकांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे.

आज इस्त्रायल आणि हिजबुल्लाहच्या संघर्षामुळे लेबनॉन पूर्ण उद्धवस्त होत आहे. जागतिक पातळीवर या युद्धाची दखल घेतली गेली असून या युद्धाला त्वरीत पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, इस्त्रायल आणि हिजबुल्लाह दोघंही मागे हटण्यास तयार नाही. या सगळ्यातून हिजबुल्लाह ही स्वत: सत्तेत असल्याने लेबनॉन या सगळ्या संघर्षापासून नामानिराळा राहू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Senior Citizen Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांना आता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आरोग्यविमा काढता येणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास
Mobile charger:अनेकदा आपण या उपकरणाचे चार्जर्स हे प्लगमध्ये बटन सुरु ठेवून (स्वीच ऑन) तसेच ठेवतो. मात्र, चार्जर्स सतत प्लग इन
Kaveri Jet Engine : भारताकडून रशियामध्ये स्वदेशी बनावटीच्या कावेरी जेट इंजिनच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. डीआरडीओ या भारतीय संरक्षण शस्त्रास्त्राच्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ