उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीचा हाहाकार ! ढगफुटीमागे नेमकं कारण काय?

Cloudburst : ढगफुटींमुळे होणारं नुकसान हे डोंगराळ प्रदेशात अनियोजित पद्धतीने करत असलेल्या विकासामुळे जास्त आहे. रस्ते, धरणे आणि इमारतींच्या अनियंत्रित बांधकामामुळे या प्रदेशातील नैसर्गिक ड्रेनेज सिस्टीमचं नुकसान झालं आहे. यामुळे पाण्याचे प्रवाह आणि पूर वाढले आहेत.
[gspeech type=button]

दिनांक 5 आणि 6 ऑगस्टला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी ढगफुटी झाली. या ढगफुटीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे दोन्ही ठिकाणी जिवीतहानी आणि वित्तहानी झाली आहे. उत्तराखंड आणि हिमाचलप्रदेश या दोन्ही ठिकाणी बचावकार्य अजूनही सुरूच आहे. अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

या पर्वतीय भागामध्ये वारंवार ढगफुटीच्या घटना घडत आहेत. यामागे नेमकी काय कारणे आहेत हे आपण जाणून घेऊयात.

ढगफुटी म्हणजे काय?

ढगफुटी म्हणजे एखाद्या भौगोलिक क्षेत्रात अचानक कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडतो. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठं नुकसान होते. उदा. 10 किमी x 10 किमी क्षेत्रफळाच्या भागात प्रति तास सुमारे 10 सेमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो तेव्हा त्याला ढगफुटी म्हटलं जातं.

सपाट भूभागापेक्षा डोंगराळ प्रदेशात जास्त ढगफुटीच्या घटना घडतात. पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीवरच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करत राहतात. अशावेळी पाऊसाचा भार त्या ढगाला सहन झाला नाही आणि त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.

उत्तराखंडला अचानक येणाऱ्या पुरांचा धोका का आहे?

भारतात, ईशान्येकडील पर्वतीय भाग, पश्चिम घाट आणि हिमालय ढगफुटींना बळी पडतात. डोंगराळ प्रदेशात, गरम हवेचे प्रवाह उभ्या दिशेने वर येतात त्यामुळे ढगफुटी होण्याची शक्यता जास्त असते. ढगफुटीमुळे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सहसा भूस्खलन आणि अचानक पूर येतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि विनाश होतो.

2013 मध्ये उत्तराखंडमध्ये सर्वात मोठी आपत्ती आली होती. ढगफुटीमुळे झालेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे अनेक गावे आणि शहरे उद्ध्वस्त झाली होती. या दुर्घटनेत 6 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर 4,500 गावं जमीनदोस्त झाली होती.  तेव्हापासून उत्तराखंडमध्ये अनेक ढगफुटी झाल्या आहेत. अलीकडच्या काळात हवामान बदलासह विविध कारणांमुळे या ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अनियोजीत विकासामुळे नुकसान अधिक

​​हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते, हवामान बदलामुळे हवा जसजशी गरम होते तसतसे ती जास्त काळ जास्त आर्द्रता टिकवून ठेवू शकते. यामुळे दीर्घकाळापर्यंत कोरडा कालावधी येतो, ज्यामध्ये अनियमित ढगफुटी होऊन कमी वेळेत अतिमुसळधार पाऊस पडतो.

तज्ज्ञांच्या मते, ढगफुटींमुळे होणारं नुकसान हे डोंगराळ प्रदेशात अनियोजित पद्धतीने करत असलेल्या विकासामुळे जास्त आहे. रस्ते, धरणे आणि इमारतींच्या अनियंत्रित बांधकामामुळे या प्रदेशातील नैसर्गिक ड्रेनेज सिस्टीमचं नुकसान झालं आहे. यामुळे पाण्याचे प्रवाह आणि पूर वाढले आहेत.

जंगलतोड आणि जमिनीच्या वापरातील बदल यासारख्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीची स्थिरता कमी झाली आहे. ज्यामुळे पावसाचे पाणी शोषण्याची तिची क्षमता कमी झाली आहे. या बदलांमुळे पर्वत उतारांच्या पायावरही परिणाम झाला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे.

उत्तराखंडमधल्या ढगफुटीची तीव्रता

उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात 5 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं आहे. घरात गढूळ पाणी शिरल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत.

एक लोकप्रिय पर्यटन स्थळ, धाराली हे गंगोत्रीला जाण्यासाठी मुख्य थांबा आहे आणि येथे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि होमस्टे आहेत. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीतल्या पाण्याची पातळी वाढुन पूर परिस्थिती ओढावली त्यामुळे धाराली गावाला मोठा फटका बसला आहे.

या घटनेनंतर उत्तराखंडमधल्या सुखी टॉपमध्ये आणि हिमाचल प्रदेशमधल्याही काही भागात ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्या ठिकाणी नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Health: आपल्या शरीरातील लिव्हरमधील बदलांमुळे निर्माण होणारा हा आजार आहे. आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होतं. हा आजार जास्त करून
Potato hybrid product of Tomato : बटाटा ही मूळ वनस्पती नसून दोन वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार झालेला आहे असा दावा संशोधकांनी
भविष्यातील कमांडरना अरबी भाषेत अस्खलित आणि इस्लामिक संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना परिस्थितीचे अधिक प्रभावीपणे विश्लेषण करण्यास मदत

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ