दिवाळीत बिनसाखरेची मिठाईसुद्धा जपून खा

Sugar free Sweets : मिठाईचा आनंद मधुमेह रुग्णांनाही घेता यावा म्हणून बाजारात शूगर फ्री मिठाईसुद्धा गेल्या काही वर्षांपासून मिळत आहेत. मात्र, कृत्रिम गोडव्यासाठी वापरले जाणारे हे घटक मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित नाहीत.
[gspeech type=button]

सणासुदीच्या दिवसात गोड पदार्थांचा आस्वाद घेतला नाही, तर सण-उत्सव पूर्ण झाल्याचा आनंद मिळत नाही. मात्र यामध्ये मधुमेह असलेल्या रूग्णांची गोची होते. साखरेचं प्रमाण वाढेल म्हणून त्यांना हे सर्व गोड पदार्थ वर्ज्य करावे लागतात किंवा खूपच कमी प्रमाणात चवीपुरते खावे लागतात.

पण अलीकडे बाजारात मधुमेह रूग्णांचा विचार करता अनेक साखर विरहीत म्हणजेच शूगर फ्री उत्पादने उपलब्ध आहेत.

मिठाईचा आनंद मधुमेह रुग्णांनाही घेता यावा म्हणून बाजारात शूगर फ्री मिठाईसुद्धा गेल्या काही वर्षांपासून मिळत आहेत. मधुमेह रुग्णांसारखे तब्येतीला सांभाळून असणारे, जास्त गोड न खाणारे लोकसुद्धा शूगर फ्री मिठाई खाण्यावर भर देतात.

पण तुम्ही खात असलेली बिनसाखरेची, शूगर फ्री मिठाई खाण्यासाठी नक्की योग्य आहे का?

काय असते शूगर फ्री मिठाई?

सोप्या भाषेत सांगायचं तर शूगर फ्री मिठाईमध्ये साखर वापरली जात नाही. तर मग गोडवा कशाने येतो? हा प्रश्न आपसुकच येतो. या मिठाईमध्ये गोडवा येण्यासाठी एस्पार्टेम (Aspartame), सॅकरिन (Saccharin), एसेसल्फेम पोटॅशियम (Acesulfame potassium), एसेसल्फेम के (Acesulfame K) आणि सुक्रॅलोज (Sucralose) इत्यादी कृत्रिम गोडवा असलेल्या घटकांचा वापर केला जातो. या सर्व घटकांमध्ये साखरेपेक्षा जवळपास 200 पट जास्त गोडवा असतो.

या गोड पदार्थाच्या घटकांमुळे त्या- त्या पदार्थांना गोडवा तर येतोच शिवाय साखरेच्या तुलनेत कॅलरिजचं प्रमाण ही कमी होतं. उदा. साखर वापरून केलेल्या मिठाईमध्ये 500 कॅलरिज असतात. आणि कृत्रिम गोड असलेल्या घटकांपासून तयार केलेल्या मिठाईमध्ये 200 कॅलरिज असतात.

मधुमेही रुग्णांसाठी हे घटक सुरक्षित आहेत का?

कृत्रिम गोडव्यासाठी वापरले जाणारे हे घटक मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित नाहीत. एस्पार्टेम या स्वीटनरचा वापर जर प्रमाणापेक्षा जास्त केला तर रक्तदाब, टाइप 2चा मधुमेह, किडन्यावर परिणाम होणे, डिप्रेशन, अपचन, अस्वस्थता असे आजार बळावू शकतात. या एस्पार्टेम घटकांच्या जास्त वापराने कर्करोग सारखा आजार ही होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.

खाद्यपदार्थातील इतरही कृत्रिम गोड घटकांचं अतिप्रमाण हे शरिरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे हे घटक खाद्यपदार्थांमध्ये किती प्रमाणात वापरले जावेत, याविषयी जागतिक आरोग्य संघटना आणि एफडीएकडून विशेष सूचना दिलेल्या आहेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृत्रिमरित्या गोड असलेल्या घटकांपासून बनवलेल्या मिठाई वा अन्य पदार्थांमध्ये कॅलरिजचं प्रमाण हे कमी असलं तरी ते शून्य कॅलरिज नसतं, त्यामुळे योग्य प्रमाणातच खावं लागतं.

कृत्रिम गोड असलेले घटक कशात वापरले जातात?

मिठाईसह चॉकलेट्स, च्यूईंगम्स, ज्यूस, कोल्ड्रिंग्स, आइसक्रीम, ब्रेकफास्ट सिरीयल, टूथपेस्ट, कफ ड्रॉप्स, पॅकबंद दही, खाण्याचा सोडा अशा अनेक पदार्थांमध्ये हे कृत्रिम गोड असलेल्या घटकांचा वापर केला जातो.

त्यामुळे मिठाईसह हे सगळे पदार्थ खरेदी करत असताना त्यांच्या पाकिटावर पदार्थ तयार करताना कोणते घटक किती प्रमाणात वापरले आहेत, ते आधी तपासून घेणं गरजेचं आहे.

मधुमेही रुग्णांसाठी उत्तम पर्याय

शूगर फ्री मिठाईऐवजी कमी साखरेचे बेसनचे लाडू, ड्रायफ्रुट्स किंवा नाचणी आणि नारळाचे लाडू हा चांगला आरोग्यदायी पर्याय ठरू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Writing Habits : हातात पेन-पेन्सिल धरुन लिहिणं ही केवळ एक क्रिया नाही तर यामुळे मेंदूचा आपल्या मेमरी पॉवरचा विकास होत
युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे उत्पादित टायगर व्हाईट ब्रँड अंतर्गत अॅल्युमिनियम कुकवेअर
Healthocide Attacks on healthcare facilities : ‘हेल्थॉसाइड’ याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्थांवर हल्ला केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ