तुम्ही दारू पीत नसलात तरी, तुम्हाला होऊ शकतो ‘नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर’ आजार!

Health: आपल्या शरीरातील लिव्हरमधील बदलांमुळे निर्माण होणारा हा आजार आहे. आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होतं. हा आजार जास्त करून अशा लोकांमध्ये आढळतो, ज्यांचं वजन खूप जास्त आहे.
[gspeech type=button]

आजकालच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत अनेक नवे आजार समोर येत आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा आणि गंभीर आजार म्हणजे फॅटी लिव्हर. अनेकदा आपल्याला वाटतं की लिव्हरचे आजार फक्त दारू पिणाऱ्यांनाच होतात. पण हा एक मोठा गैरसमज आहे. तुम्ही जर कधीच दारू प्यायले नसाल, तरीही तुम्हाला नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकतो. या आजारात आपल्या लिव्हरमध्ये गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होते आणि आपल्या लिव्हरचं काम बिघडतं.

तुम्ही म्हणाल, ‘मी दारूच पीत नाही, मग मला हा आजार कसा होईल?’ हा विचार खूप कॉमन आहे. पण आपली बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आणि चुकीचं खाणंपिणं यामुळे हे आजार वाढत आहेत. चला समजून घेऊया काय आहे हा आजार.

नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर म्हणजे काय?

आपल्या शरीरातील लिव्हरमधील बदलांमुळे निर्माण होणारा हा आजार आहे. आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होतं. हा आजार जास्त करून अशा लोकांमध्ये आढळतो, ज्यांचं वजन खूप जास्त आहे.

फॅटी लिव्हर आजार कोणाला होऊ शकतो?

तुम्ही दिवसभर एकाच जागी बसून असाल आणि कोणताही व्यायाम करत नसाल, तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. आपल्या शरीराचं वजन वाढणं, खासकरून पोटात चरबी जमा होणं, हे फॅटी लिव्हरचं मुख्य लक्षण आहे.

जास्त साखर असलेले पदार्थ, मिठाई, कोल्ड्रिंक्स, जंक फूड खाणं या गोष्टी देखील हा आजार होण्यास तितक्याच कारणीभूत आहेत.जास्त कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, डायबिटीज आणि मेटॅबॉलिझम संबंधित तुम्हाला काही त्रास असतील, तर हा धोका वाढू शकतो. धूम्रपान हे देखील याचं एक कारण आहे.

या आजाराची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे लिव्हर आतून खराब होत आहे हेआपल्याला कळत नाही.

फॅटी लिव्हरचे टप्पे

फॅटी लिव्हरचा आजार हळूहळू वाढत जातो. त्याचे एकूण चार टप्पे असतात:

1.सिंपल फॅटी लिव्हर (Streatosis): या पहिल्या टप्प्यात लिव्हरमध्ये चरबी जमा व्हायला सुरुवात होते. पण या टप्प्यात शरीरात कोणतीही जळजळ किंवा विशेष लक्षणं जाणवत नाहीत. तुम्ही जर या पहिल्या टप्प्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल केला तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

2.स्टिअॅटोहेपटायटिस (Steatohepatitis): या दुसऱ्या टप्प्यात लिव्हरमध्ये चरबी वाढल्यामुळे सूज आणि जळजळ सुरू होते. यकृत खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतं, पण खराब झालेल्या पेशींची संख्या जास्त असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे लिव्हरवर छोट्या जखमा तयार होतात. आणि त्याचं रुपांतर फायब्रॉसिसमध्ये होतं.

3.फायब्रॉसिस (Fibrosis): तिसऱ्या टप्प्यात लिव्हरवरील जखमा वाढू लागतात. यामध्ये यकृत आपलं काम बऱ्यापैकी करत असतं, पण जर वेळीच योग्य उपचार केले नाहीत, तर धोका वाढू शकतो.

4.सिरोसिस (Cirrhosis): हा सर्वात शेवटचा आणि गंभीर टप्पा आहे. या टप्प्यात लिव्हर पूर्णपणे खराब होतं आणि ते नीट काम करू शकत नाही. या टप्प्यात डोळे आणि त्वचा पिवळी पडणं, पायांना सूज येणं, बरगड्यांच्या खाली दुखणं अशी लक्षणं दिसू लागतात. या टप्प्यात उपचार करणे खूप कठीण होते.

ही स्थिती एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जायला अनेक वर्षे लागू शकतात. म्हणून, वेळीच लक्ष दिल्यास हा गंभीर धोका टाळता येईल.

फॅटी लिव्हरवरील उपचार काय?

चांगली गोष्ट ही आहे की, योग्य बदल केल्यास या आजारातून पूर्णपणे बाहेर पडता येतं.

नियमित व्यायाम: दिवसातून किमान 30 मिनिटे चाला. सायकलिंग, पोहणं किंवा कोणताही आवडता व्यायाम सुरू करा.

आहार बदला: जंक फूड, कोल्ड्रिंक्स, बेकरीचे पदार्थ, आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाणं कमी करा.

संतुलित आहार: तुमच्या आहारात प्रोटीन, फायबर, फळं आणि भाज्यांचा समावेश करा. घरात बनवलेलं साधं आणि ताजं जेवण खा.

वजन कमी करा: तुमचं वजन आणि उंची यांचं प्रमाण योग्य राखण्यासाठी वजन कमी करणं खूप महत्त्वाचं आहे.

ताण कमी करा: चांगली झोप घ्या आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन किंवा योगा करा.

फॅटी लिव्हरचं निदान कसं होतं?

फॅटी लिव्हरचा आजार ओळखण्यासाठी डॉक्टर काही तपासण्या सांगतात.

अल्ट्रासाऊंड स्कॅन: ही एक खूप सोपी आणि कॉमन तपासणी आहे. यातून लिव्हरमध्ये चरबी जमा झाली आहे की नाही, हे कळतं.

लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT): ही एक रक्ताची तपासणी आहे. यातून लिव्हर कसं काम करत आहे, याची माहिती मिळते. या तपासणीत काही गडबड आढळल्यास डॉक्टरला पुढे तपासणी करण्याची गरज वाटते.

फायब्रोस्कॅन (FibroScan): हे एक खास अल्ट्रासाऊंड स्कॅन आहे. यातून लिव्हरमध्ये किती प्रमाणात चरबी आणि किती प्रमाणात खराब झालेल्या पेशी जमा झाल्या आहेत हे समजतं.

बायोप्सी (Biopsy): काही गंभीर परिस्थितीत डॉक्टर लिव्हरमधील एका छोट्या भागाचा नमुना घेऊन तपासणी करतात. याला बायोप्सी म्हणतात.

CT स्कॅन किंवा MRI: कधीकधी लिव्हरच्या अधिक माहितीसाठी CT स्कॅन किंवा MRI स्कॅनचीही मदत घेतली जाते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही आजाराचं निदान तुम्ही स्वतः करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेल्या औषधोपचारांसोबतच तुमच्या जीवनशैलीत बदल करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Cloudburst : ढगफुटींमुळे होणारं नुकसान हे डोंगराळ प्रदेशात अनियोजित पद्धतीने करत असलेल्या विकासामुळे जास्त आहे. रस्ते, धरणे आणि इमारतींच्या अनियंत्रित
Potato hybrid product of Tomato : बटाटा ही मूळ वनस्पती नसून दोन वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार झालेला आहे असा दावा संशोधकांनी
भविष्यातील कमांडरना अरबी भाषेत अस्खलित आणि इस्लामिक संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना परिस्थितीचे अधिक प्रभावीपणे विश्लेषण करण्यास मदत

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ