घिबलीनंतर आता नॅनो बनाना फोटोचा एआय ट्रेंड कितपत सुरक्षित आहे?

Nano Banana Trend : कोणताही ट्रेंड आल्यावर पहिला मुद्दा येतो तो तुमच्या माहितीच्या सुरक्षिततेचा. एआयवर घिबलीनंतर सुरू झालेल्या नॅनो बनाना ट्रेंडवर अनेक महिला - तरुणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. मात्र, या ट्रेंडच्या माध्यमातून तुमचा फोटो डेटा एआयकडे जमा होत आहे. हा डेटा पुढे कशाप्रकारे वापरला जाऊ शकतो, याची तुम्हाला काही कल्पना आहे का? सोशल मीडियावर दरवेळी येणाऱ्या या नवनवीन ट्रेंडमध्ये सहभागी होणं कितपत सुरक्षित आहे?
[gspeech type=button]

एआयचा बोलबाला सुरू होताच सगळ्यात पहिल्यांदा चॅट-जीपीटीच्या घिबली स्टाईल फोटो ट्रेंडने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. जागतिक पातळीवरील नेत्यांपासून ते नुकत्याच कॉलेजला जायला लागलेल्या तरुणांपर्यंत आणि अनेक नवजात बालकांच्या पालकांनीही आपल्या बाळासोबत घिबली स्टाईल फोटो तयार करुन घेत ते सोशल मीडियावर अपलोड केले होते. काही महिने सरताच आता पुन्हा एकदा एका नव्या ट्रेंडने सोशल मीडिया व्यापलेला आहे. हा ट्रेंड आहे ‘नॅनो बनाना फोटो ट्रेंड’. 

हे असे एआय फोटो ट्रेंड कसे पूर्ण करायचे, ते कितपत सुरक्षित आहेत, आणि सुरक्षितपणे या ट्रेंडमध्ये कसा भाग घ्यायचा याची माहिती घेऊयात. 

नॅनो बनाना ट्रेंड

गुगल जेमिनीने नॅनो हे एआय टूल निर्माण केलं आहे. या टूलवर वापरकर्तांना (यूजर्स) त्यांचे साधे फोटो  हे 3डी फिगरींग – लाईक पोर्टेट स्वरुपात रुपांतर करुन मिळतात. यासाठी जेमिनी नॅनोने विशेष विंटेज साडी परिधान केलेली स्त्रीची स्टाईल विकसीत केली आहे.  म्हणजे तुम्ही तुमचे कोणत्याही स्वरुपातले फोटो या जेमिनी नॅनो टूलमध्ये अड केले की ते साडी नेसलेल्या स्त्रीच्या रुपात एडीट होऊन तुम्हाला मिळतात. 

छान छान रंगांच्या शिफॉन साड्या, थोडेसे कुरळे मोकळे केस, केसामध्ये चाफा किंवा मोगऱ्याचा गरजा, पूर्ण नितळ त्वचा, चेहऱ्यावर थोडासा सोनेरी रंगाच्या छटांचा प्रकाश, मंद वाऱ्यावर उडणारा पदर, कपाळी टिकली असा एक पूर्ण भारतीय, पारंपारिक, आकर्षक स्वरुपाची डिझाईन जेमिनी नॅनोवर तयार केली आहे. या अशा आकर्षक डिझाईनची भूरळ भारतात अनेक स्त्रियांवर आणि तरुणींवर पडली आहे. त्यामुळे सिनेकलाकार असो वा सामान्य महिला, तरुणी असो प्रत्येकजण या नॅनो बनाना ट्रेंडमध्ये सहभागी होऊन आपले फोटो अशाप्रकारे एडिट करुन घेत आहेत. आणि नंतर ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम तर पूर्ण शिफोन साड्यांच्या रंगामध्येचं न्हाऊन निघाली आहेत. 

गुगलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरपर्यंत 500 दशलक्षहून अधिक महिलांनी जेमिनी अपचा वापर करत आपले फोटो असा पद्धतीने एडिट करुन घेतले आहेत. तर 100 दशलक्षाहून अधिक जणांनी अन्य प्लॅटफॉर्मवरुन या ट्रेंडमध्ये फोटो एडीट करुन भाग घेतला आहे. 

या ट्रेंडमुळे जेमिनी एआय चॅटबोट हा भारतात ॲपल स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवर पहिल्या क्रमांकावर आला आहे. याचा अर्थ या ट्रेंडमुळे खूप साऱ्या लोकांनी डेमिनी एआय चॅटबोट ॲप डाऊनलोड केलेलं आहे. 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर याकाळात 23 दशलक्षहून अधिक जणांनी हे ॲप डाऊनलोड केलेलं आहे. 

जेमिनी नॅनो बनाना ट्रेंडमध्ये फोटो कसा तयार करुन घ्यायचा?

या टूलमध्ये अगदी दोन मिनीटांमध्ये आपल्याला फोटो एडीट करुन घेता येतो. या टूलमध्ये आपण आपला फोटो अपलोड केल्यावर ॲड अ प्राँम्प्ट हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर हे एआय टूल स्वत:हून तुम्हाला तुमचा फोटो त्यांनी डिझाईन केलेल्या साडीच्या रुपामध्ये वेगवेगळ्या प्रकारे एडीट करुन देतो. 

मात्र तत्पूर्वी तुम्हाला जेमिनी ॲप डाऊनलोड करायचं आहे. त्या ॲपमध्ये गुगल अकांउंटवरुन साईन इन करायचं आहे. जेमिनी ॲपच्या मुख्य पानांवर आल्यावर तिथे आपल्याला बनाना आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करुन ट्राय इमेज एडिटिंग हा पर्याय निवडायचा आहे. 

हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा पूर्ण दिसेल असा एकट्याचा पोर्टेट फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर क्लिक जनरेट या पर्यायावर क्लिक करुन काही क्षण थांबायचं आहे. आणि मग थोड्याच अवधीत एआय तुम्हाला रेट्रो साडी पोर्टेट डिझाईनमध्ये तुम्हाला तुमचा फोटो एडीट करुन देतो. 

जेमिनी नॅनो बनाना टूल किती सुरक्षित आहे?

कोणताही ट्रेंड आल्यावर पहिला मुद्दा येतो तो तुमच्या माहितीच्या सुरक्षिततेचा.  गुगल आणि ओपन एआय सारख्या कंपन्या वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात. पण तरिही आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा ही आपण ते प्लॅटफॉर्म किती सुरक्षितरित्या वापरतो यावर अवलंबुन असते. त्यामुळे अशा ॲपवर अपलोड केलेल्या फोटोचा गैरवापर होणं, आपली परवानगी न घेता त्यात बदल करणं, ते इतर ठिकाणाशी किंवा व्यक्तिसोबत जोडले जाण्याची शक्यता असते. 

जेमिनी नॅनो टूल मध्ये ‘नॅनो बनाना ट्रेंड’ अंतर्गत एडीट केलेल्या फोटोवर हे फोटो एआय जनरेटेड आहेत ते समजून यावं यासाठीसिंथआयडी’ आणि ‘मेटाडेटा टॅग्ज’ असे दोन डिजिटल वॉटरमार्क दिलेले आहेत. 

एआयस्टुडिओ डॉट गुगल डॉट कॉमच्या (aistudio.google.com) माहितीनुसार, जेमिनी मध्ये सर्व फोटो हे 2.5 फ्लॅश मध्ये निर्माण केले जाऊन त्यावर हे फोटो एआय निर्मित असल्याचं स्पष्ट करण्यासाठी सिंथआयडी’ आणि ‘मेटाडेटा टॅग्ज’ असे वॉटरमार्क्स दिले जातात. यामाध्यमातून वापरकर्त्यांसोबत पारदर्शकता पाळली जाते. 

या एआय निर्मिती फोटोचा वापर डीपफेकसाठी जरी वापरले गेले तरी या फोटोवर असलेले ‘सिंथआयडी’ मार्क हे ठराविक स्कॅनरच्या माध्यमातून स्कॅन करुन हे फोटो एआय निर्मिती असल्याचं स्पष्ट करता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात जरी या फोटोंचा गैरवापर झाला तरी हे फोटो मुळ कुठून आहे आहेत याचा उलगडा सहज होऊ शकतो. 

दरम्यान, सगळ्याना या डिटेक्शन टूलमध्ये प्रवेश करता येत नाही. जरी या फोटोंवर डिजिटल वॉटरमार्क असले तरिही हे फोटो एआय निर्मित आहेत हे बहुतांशी लोकांना समजण्यात येत नाही. 

तुमचा डेटा असुरक्षित आहे

तज्ज्ञांच्या मतांनुसार, एआयनिर्मिती फोटोवर दिलेले हे वॉटरमार्क पूर्ण सुरक्षित नाहीत, कारण हे वॉटरमार्क सहजपणे काढून टाकता येतात किंवा ते कॉपीही केले जाऊ शकतात. यामुळेच अलिकडेच व्हीसी सज्जनार या आयपीएस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील कोणत्याही ट्रेंडमध्ये सहभागी होताना काळजी घ्या या आशयाच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “इंटरनेटवरील ट्रेंडिंग विषयांपासून सावध रहा! ‘नॅनो बनाना’च्या क्रेझच्या जाळ्यात अडकणे धोकादायक असू शकते. जर तुम्ही वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर केली तर घोटाळे होणे निश्चित आहे. फक्त एका क्लिकवर, तुमच्या बँक खात्यातील पैसे गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकतात,” असे त्यांनी एक्स वर पोस्ट केली.

त्यांनी वापरकर्त्यांना जेमिनी प्लॅटफॉर्मचा भाग असल्याचे भासवून बनावट वेबसाइट किंवा अनधिकृत प्सवर वैयक्तिक फोटो किंवा तपशील अपलोड करू नका असं सांगितलं आहे.

डीपस्ट्रॅटचे सीईओ सायबरसुरक्षा तज्ञ सैकत दत्ता यांनी सांगितलं आहे की, “जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा फोटो इपलोड करता तेव्हा ओळख व्यवस्थापन समस्येची काळजी घ्यावी लागते. विविध प्लॅटफॉर्म ते प्रक्रिया करण्यासाठी, मॉडेल्स सुधारण्यासाठी किंवा विश्लेषणासाठी संग्रहित करते. जरी ते निनावी असलं तरी तुमचा डेटा कोणत्याही पद्धतीने वापरला जाऊ शकतो. जर या सिस्टममध्ये किंवा डेटा सेव्ह केलेल्या सर्व्हरमध्ये काही अडचण आली तर ही माहिती ऑनलाईनवर लीक होऊ शकतात. जर हा डेटा ऑनलाइनवर लीक झाला तर त्या डेटाचा वापर करून शेकडो बनावट कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात, ज्यामुळे मनी लाँड्रिंगसारखे गंभीर गुन्हे देखील घडू शकतात.”

दुसऱ्या एका प्रकरणात, झलक भवनानी नावाच्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने सांगितले की तिला हे टूल वापरताना काहीतरी विचित्र दिसले. झलक भवनानी हिने नॅनो टूलमध्ये पूर्ण हात असलेला पंजाबी सूट परिधान केलेला फोटो अपलोड केला होता. नॅनो बनाना ट्रेंडमध्ये हा फोटो स्लिवलेस ब्लाऊजसह साडीमध्ये रुपांतरीत होऊन आला. त्यावेळी तिच्या लक्षात आलं की तिच्या एका हातावर असलेला तीळ या फोटो मध्ये दिसत आहे. तेव्हा तिला प्रश्न पडला की, जर मी एआयला पूर्ण हाताचा ड्रेस घातलेला फोटो दिला होता तर एआयला कसं समजलं की माझ्या या हातावर या ठिकाणी तीळ आहे? ही शंका उपस्थित करत तिने सोशल मीडियावर सर्वांना सावध राहण्याचा सल्ला दिला. 

ट्रेंडमध्ये सुरक्षितपणे कसं सहभागी व्हायचं?

जर तुम्हाला या ट्रेंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर, यासाठी काही गोष्टीं पाळल्या पाहिजेत.  

तुमचा कोणताही फोटो अपलोड करण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक विचार करा. खाजगी किंवा संवेदनशील फोटो अपलोड करु नका. कारण एआय टूल्स त्यांचा कसा वापर करू शकतात हे जाणून घेणे कठीण आहे.

तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ नये म्हणून फोटो पोस्ट करण्याआधी फोटो कुठे काढलेला त्याचं स्थान तपशील किंवा डिव्हाइस अशी महत्त्वपूर्ण माहिती, मेटाडेटा काढून टाका.

तुमचे फोटो शेअर करण्यापूर्वी एआय टूल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील गोपनीयता सेटिंग्ज तपासा जेणेकरून त्यांचा गैरवापर होणार नाही.

तुमच्या मूळ फोटोंच्या आणि तुम्ही वापरलेल्या सूचनांच्या कॉपीज जपून ठेवा. तुमच्या परवानगीशिवाय तुमचा कंटेट बदलला किंवा वापरला गेला तर हे तुम्हाला ओळखण्यास मदत करू शकते.

तुमचे फोटो अपलोड करण्यापूर्वी, प्लॅटफॉर्म त्यांच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्याचा अधिकार असल्याचा दावा करतो का ते तपासा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Swasth Nari Sashakt Parivar Abhiyaan : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात ‘स्वस्थ नारी
Aishwarya Rai : प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव, चित्र, आवाजासारख्या ओळखपत्रांचा व्यावसायिक वापर नियंत्रित करण्याचा अधिकार
Great Nicobar Project : केंद्र सरकारच्या ग्रेट निकोबार प्रकल्पावर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काँग्रेस नेत्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ