भारतीय नौदलाची नवी ताकद: आयएनएस ‘अँड्रोथ’

INS Androth : आपल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकतीच एक दमदार आणि स्वदेशी बनावटीची युद्धनौका सामील झाली आहे. तिचं नाव आहे आयएनएस 'अँड्रोथ'. ही फक्त एक साधी युद्धनौका नाही, तर ती आपल्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आज आपण याच 'अँड्रोथ' बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
[gspeech type=button]

आपल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकतीच एक दमदार आणि स्वदेशी बनावटीची युद्धनौका सामील झाली आहे. तिचं नाव आहे आयएनएस ‘अँड्रोथ’. ही फक्त एक साधी युद्धनौका नाही, तर ती आपल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आज आपण याच ‘अँड्रोथ’ बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

अँड्रोथ म्हणजे नेमकं काय?

‘अँड्रोथ’ हे नाव लक्षद्वीपमधील एका सुंदर बेटावरून ठेवलं गेलं आहे. ‘अँड्रोथ’ ही एक अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) आहे. ही युद्धनौका पाण्यात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करू शकते. पण यात ‘शॅलो वॉटर क्राफ्ट’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ‘शॅलो वॉटर’ म्हणजे कमी खोलीचं अर्थात उथळ पाणी.

आपल्या समुद्राच्या किनाऱ्याजवळचं पाणी बरंच उथळ असतं. मोठी, वजनदार जहाजं अशा ठिकाणी जाऊ शकत नाहीत. पण ‘अँड्रोथ’सारखी छोटी आणि चपळ युद्धनौका या कमी खोलीच्या पाण्यात सहजपणे काम करू शकतात. त्यामुळे शत्रूच्या पाणबुड्या जर आपल्या किनाऱ्याजवळ लपल्या असतील, तर त्यांना शोधून काढण्यासाठी ‘अँड्रोथ’ खूप प्रभावी ठरते.

‘अँड्रोथ’ इतकं खास का आहे?

या युद्धनौकेची काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते:

संपूर्ण स्वदेशी बनावट

‘अँड्रोथ’ची निर्मिती कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) या भारतीय कंपनीने केली आहे. ही युद्धनौका 100% भारतीय तंत्रज्ञान आणि बनावटीवर आधारित आहे.

उत्कृष्ट डिझाइन आणि क्षमता:

या जहाजाची लांबी 77.6 मीटर आहे आणि वजन जवळपास 900 टन आहे. तसेच तिचा कमाल वेग 25 नॉट्स असल्याचं सांगितलं जात आहे. या युद्धनौकेला फक्त 2.7 मीटर इतकी कमी खोली लागते. त्यामुळे ही युद्धनौका किनाऱ्याजवळच्या भागात सहजपणे घुसून तिथे लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊ शकतं.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान:

‘अँड्रोथ’ अनेक आधुनिक प्रणालींनी सुसज्ज आहे. ही युद्धनौका डिझेल इंजिन आणि वॉटरजेटच्या तंत्रज्ञानावर चालते. अत्याधुनिक लाइटवेट टॉर्पेडोज, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट्स व शॅलो वॉटर सोनार प्रणालीने ही युद्धनौका सुसज्ज आहे.

या युद्धनौकेमध्ये लढाऊ व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आलेली आहे. तसेच तिच्यात सात अधिकाऱ्यांसह एकूण 57 कर्मचारी राहू शकतील, अशी सोयही करण्यात आली आहे. ही युद्धनौका लढाऊ विमानांबरोबर समन्वय साधून पाणबुडीविरोधी मोहिमा राबवू शकते.

‘अँड्रोथ’ची गरज का आहे?

सध्याच्या काळात, हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या कुरापतींमुळे आपल्या समुद्रातील सीमा सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं झालं आहे. मोठी जहाजं समुद्राच्या खोल पाण्यात गस्त घालतात, पण किनारपट्टीचा भाग अनेकदा असुरक्षित राहतो. अशा वेळी, ‘अँड्रोथ’सारखी युद्धनौका आपल्या किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी, शत्रूच्या पाणबुड्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि कोणत्याही धोक्यापासून बचाव करण्यासाठी खूप उपयोगी ठरतील.

ही युद्धनौका आपल्या नौदलाची ‘पहिली बचाव रेषा’ (first line of defense) म्हणून काम करेल आणि आपल्या समुद्रातील सीमा अधिक मजबूत बनवेल.

GRSE कंपनी भारतीय नौदलाला देणाऱ्या आठ युद्धनौकांपैकी

‘अँड्रोथ’ ही दुसरी युद्धनौका आहे. याआधी ‘अर्णला’ ही पहिली युद्धनौका मे महिन्यात नौदलाकडे सोपवण्यात आली होती. अशा एकूण 16 युद्धनौका तयार करण्याचा करार झाला आहे. यामुळे आपल्या नौदलाची ताकद कित्येक पटींनी वाढणार आहे. आणि आपण आपल्या समुद्राचे अधिक चांगल्या प्रकारे रक्षण करू शकू.

21 मार्च 2023 रोजी, कोलकाता येथे व्हाईस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या हस्ते ‘अँड्रोथ’चं जलावतरण झालं होतं. त्यावेळी क्रिकेटपटू अरुण लाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘अँड्रोथ’सारखी युद्धनौका तयार करणं हे फक्त एक नौका तयार करण्यापुरतं मर्यादित नाही. हे आपल्या देशाची ताकद, आत्मनिर्भरता आणि भविष्याच्या वाटचालीचं प्रतीक आहे. भारत आता संरक्षण क्षेत्रातही कोणावर अवलंबून नाही, उलट स्वतःच्या हिमतीवर
जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक बनत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

dry eyes : आपल्या डोळ्यासमोर सतत लॅपटॉप, टॅबलेट किंवा टीव्हीची स्क्रीन असते. या स्क्रीनच्या अतिवापराने आणि रोजच्या धावपळीने आपल्या डोळ्यांवर
Arab Spring : नेपाळ मध्येही काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली होती. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेले निर्बंध या एका मुद्द्यावरुन ठिणगी
Krushi Mapper : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीची उत्पादकता वाढवणे शक्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ