बटाटा हे टॉमेटॉचं संकरीत उत्पादन!

Potato hybrid product of Tomato : बटाटा ही मूळ वनस्पती नसून दोन वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार झालेला आहे असा दावा संशोधकांनी केला आहे.
[gspeech type=button]

बटाटा, आपण दररोजच्या जीवनात हा पदार्थ कोणत्या न कोणत्या मार्गाने आवर्जून खातो. हा बटाटा मूळ वनस्पती नसून दोन वेगवेगळ्या वनस्पतींपासून तयार झालेला आहे असा दावा संशोधकांनी केला आहे. जाणून घेऊयात संशोधनात नेमकं काय आढळलं. 

बटाट्याचं मूळ शोधण्यावर संशोधन

नवीन संशोधनातून असं आढळून आलं आहे की, बटाटा हा सुमारे नऊ दशलक्ष वर्षांपूर्वी टोमॅटोपासून विकसित झाला आहे.

अभ्यासानुसार, अँडीजमध्ये एकेकाळी वाढणारे जंगली टोमॅटो हे एट्युबेरोसम नावाच्या दुसऱ्या वनस्पतीशी जोडले गेले. या दोन वनस्पतींमध्ये हायब्रिडायझेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे, दोन्ही वनस्पतींनी त्यांचे अनुवांशिक गुण एकत्र केले आणि एका नवीन वनस्पतींची निर्मिती झाली. हिच ती बटाटा. 

टोमॅटोपासून बटाट्यांची निर्मिती झाली का?  

उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि जीनोम संशोधकांनी बटाटे हे मूळ टॉमेटॉपासून निर्माण झाल्याचं शोधून काढलं आहे. शास्त्रज्ञांनी जंगली आणि शेती केलेल्या बटाट्याच्या दोन्ही जातींमधील 450 जीनोमचा अभ्यास केला. या संशोधनातून त्यांना असं आढळलं की, सुमारे नऊ दशलक्ष वर्षांपूर्वी एक जंगली टोमॅटो वनस्पती नैसर्गिकरित्या एट्युबेरोसम नावाच्या वनस्पतीशी जोडली गेली. ज्यामुळे या दोन वनस्पतीच्या संकरीत मधून बटाटा या वनस्पतीची निर्मिती झाली.  

सेल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, या दोन्ही वनस्पतीच्या फांद्या जवळजवळ 14 कोटी वर्षांपूर्वी एकत्र आल्या होत्या. त्यावेळी, टोमॅटो किंवा एट्युबेरोसम हे दोन्हीही कंद, बटाटे, रताळे किंवा टारो सारख्या वनस्पती ज्या जमिनीखाली वाढतात आणि त्यामध्ये जे पोषकमुल्य असतं ते निर्माण करु शकत नव्हते. मात्र, या दोन वेगवेगळ्या वनस्पती जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्यातून बटाट्याच्या रुपात पोषणमुल्य असलेली वनस्पतीचा जन्म झाला.  

हे ही वाचा : बटाटा, मिरचीला आपल्याकडं रुजवणारी ‘दापोडी इस्टेट’ – भाग 1

बटाटा वनस्पतीची निर्मिती कुठे झाली?

दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगामध्ये या वनस्पतीची निर्मिती झाली. तिथलं हवामान थंड झाल्यामुळे या वनस्पतींना जमिनीखाली पोषक तत्वे साठवण्याचा मार्ग म्हणून हे कंद विकसित झालं. तिथल्या लोकांनी त्यांची लागवड सुरू केली आणि त्यानंतर ते आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग झाला.

चायनीज अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेसचे संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक झियांग झांग म्हणाले, “बटाटा हा टोमॅटो आणि एट्युबेरोसमचा अपत्य आहे.”

या अभ्यासाचे सहलेखक आणि चीनमधील लांझो विद्यापीठातील प्राध्यापक जियानक्वान लिऊ यांनी सीएनएनला सांगितले की, या संशोधक टिमने फायलोजेनेटिक विश्लेषणाचा वापर केला. ही पद्धत मानवांमध्ये वंशावळी शोधून काढण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीमध्ये अनुवांशिक संबंधांचा मागोवा घेता येतो.. यामुळे त्यांना वनस्पतींमधील संबंध माहित करुन घेण्यासाठी मदत झाली.

त्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की आधुनिक बटाट्यामध्ये डीएनएचा ‘मोजेकसारखा’ नमुना आहे. ज्यामध्ये टोमॅटो आणि एट्युबेरोसम या दोन्हींकडून वारशाने मिळालेले गुणधर्म आहेत. निष्कर्षांवरून असे आढळलं की, हे मिश्रण आठ ते नऊ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या एकाच आंतरप्रजनन घटनेतून आलं आहे.

हे शक्य झाले कारण 13 ते 14 कोटी वर्षांपूर्वी दोन्ही वनस्पतींचा पूर्वज एकच होता. त्यानंतर ते वेगवेगळ्या मार्गांनी  विकसित झाले असले तरी, जवळपास पाच कोटी वर्षांनंतरही त्यांच्यात परस्पर प्रजनन करण्यासाठी पुरेशी अनुवांशिक साधर्म्य टिकून होतं.  

टोमॅटो आणि एट्युबेरोसमच्या जोडणीमुळे निर्माण झालेल्या नवीन बटाट्याच्या रोपात कंद विकसित झाले. हा एक गुणधर्म आहे जो शास्त्रज्ञांनी आता काही विशिष्ट जनुकांशी जोडला आहे. विशेष म्हणजे, जरी एट्युबेरोसम स्वतः कंद तयार करत नसला तरी, बटाट्याला त्याच्या अद्वितीय जनुकांच्या मिश्रणाद्वारे ती क्षमता वारशाने मिळाली आहे.

अनुवांशिकदृष्ट्या पाहिलं तर, बटाटे अजूनही टोमॅटोशी जवळचे नाते दर्शवतात. त्याची रोप सारखी दिसतात पण फळ निर्मितीत फरक आढळतो. आणि याचं कारण त्यांच्या गुंतागुंतीच्या उत्पत्तीमध्ये आहे. 

बटाट्याच्या झाडांमध्ये कंद का वाढतात?

संशोधकांना असं आढळून आलं की, आधुनिक बटाट्यांमध्ये कंद त्यांच्या मिश्र वंशामुळे विकसित झाले आहेत. टोमॅटो आणि एट्युबेरोसमच्या संकरीकरणामुळे पहिल्या कंद उत्पादक वनस्पतींचा जन्म झाला. अभ्यासात असं म्हटलं आहे की, कंद निर्मितीमागील जनुके दोन्ही मूळ वनस्पतींपासून आली आहेत.

कंद कधी बनवायचे हे झाडाला सांगणारा SP6A जनुक टोमॅटोपासून आला आहे. तर, कंद बनणाऱ्या भूमिगत देठांना वाढण्यास मदत करणारा IT1 जनुक एट्युबेरोसममधून संक्रमित झाला आहे.

या अनुवांशिक मिश्रणामुळे सुरुवातीच्या बटाट्यांच्या उत्पादनाला अँडीजच्या थंड, डोंगराळ प्रदेशात पसंती मिळाली आणि त्याचा प्रसार होऊ लागला. कंद वाढवण्याच्या क्षमतेमुळे वनस्पतीला जमिनीखाली अन्न आणि पाणी साठवण्यास मदत झाली. ज्यामुळे ते टोमॅटो किंवा एट्युबेरोसमपेक्षा कठोर परिस्थितीत टिकून राहण्यास अधिक सक्षम झाले. 

यामुळे बटाट्याच्या रोप सक्षमपणे स्थिर होत स्वतंत्रपणे वाढू लागलं. त्यामुळे टोमॅटो किंवा एट्युबेरोसमसह पुन्हा प्रजनन होण्याची गरज कमी झाली. यातून अखेर पोटेटॉ म्हणून ओळखला जाणारा एक नवीन वनस्पती गट तयार झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Health: आपल्या शरीरातील लिव्हरमधील बदलांमुळे निर्माण होणारा हा आजार आहे. आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट जमा होतं. हा आजार जास्त करून
Cloudburst : ढगफुटींमुळे होणारं नुकसान हे डोंगराळ प्रदेशात अनियोजित पद्धतीने करत असलेल्या विकासामुळे जास्त आहे. रस्ते, धरणे आणि इमारतींच्या अनियंत्रित
भविष्यातील कमांडरना अरबी भाषेत अस्खलित आणि इस्लामिक संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना परिस्थितीचे अधिक प्रभावीपणे विश्लेषण करण्यास मदत

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ