रेडवाईन प्यायल्याने डोकेदुखी का होते?

Red wine headache : रेडवाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांमधील काही घटकांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. सल्फाइट्स, बायोजेनिक अमाइन आणि टॅनिन या घटकांमुळेच डोकेदुखी होते हा समज नव्या संशोधनांतून खोटा ठरला आहे. द्राक्षातल्या एका विशेष घटकामुळे आणि पचनाच्या क्षमतेमुळे डोकेदुखी होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

रेडवाईन सगळ्यांनाच आवडणारी. बऱ्याच जणांनी कधी ना कधी ट्राय केलीच असेल. पण बहुतांशी जणांना  रेड वाईन जास्त प्यायल्यावर डोकेदुखीचा सामना करावा लागतो. पाहुयात हे असं का होतं.

रेडवाईनमधल्या कोणत्या घटकांमुळे डोकेदुखी होते?

रेडवाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांमधील काही घटकांमुळे डोकेदुखीचा होतो, असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील इनॉलजी विभागाचे प्रोफेसर ॲन्ड्रयू वॉटरहाऊस, फूड सायन्स आणि टेक्नोलॉजी विभागातील पोस्ट डॉक्टरल रिसर्चर डेव्हिस व अप्रमिता देवी यांनी या विषयावर अभ्यास केला आहे.

वाईन हे जवळपास 10 हजार वर्ष जुनं असं पेय आहे. रोमन काळाच्यापूर्वी पासूनही वाईन हे पेय तयार केलं जातंय. आणि तेव्हापासूनच वाईनमुळे होणाऱ्या डोकेदुखीची समस्याही खूप जुनी आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

आतापर्यंत वाईनमधल्या सल्फाइट्स, बायोजेनिक अमाइन आणि टॅनिन या घटकांमुळेच डोकेदुखी होते हा समज प्रचलित आहे. हे घटक खरचं डोकेदुखीला कारणीभूत आहेत का?

संशयित घटकांवर अभ्यास

सल्फाइट्स – अमेरिकेमध्ये 1990 पासून सर्व वाईन्सच्या बॉटल्सवर त्यामध्ये असलेल्या सल्फाइट्सचं प्रमाण जाहीर करणं बंधनकारक केलं. तेव्हापासून या स्लल्फाइट्समुळेच डोकेदुखी होते असा समज प्रचलित होता. पण या सल्फाइट्सचं जेवढं प्रमाण रेड वाईन मध्ये असतं तेवढंच प्रमाण व्हाइट वाईनमध्ये असते. अन्य खाद्यपदार्थ किंवा बेव्हरिजमध्ये सुद्धा सल्फाइटचा वापर केला जातो. त्यामुळे सल्फाइटमुळे डोकेदुखी होते असं मानायला काहीच पुरावा नाही. याशिवाय आपल्या शरिरामध्ये सुद्धा प्रथिनांच्या पचनासाठी दररोज 700 मिलीग्रॅम सल्फाइट निर्माण केलं जातं आणि सल्फेट उत्सर्जित केलं जातं. सल्फाईट ऑक्सिडेसेसमुळे सल्फाईट पासून सल्फेट तयार होतं. शरीरात तयार होणाऱ्या सल्फाईटचं प्रमाण पाहता, 20 मिलीग्रॅम वाईनच्या ग्लॉसमध्ये ज्याप्रमाणात सल्फाईट असेल. त्यामुळे माणसाला त्रास होण्याची शक्यता नाही.

बायोजेनिक अमाइन – बायोजेनिक अमाइन हा नायट्रोजन घटक अनेक फर्मेंटेड बेव्हरिजमध्ये आढळून येतो. पण याचं प्रमाण हे खूपच कमी असतं.

टॅनिन – टॅनिन हा एक घटक आहे, ज्याचं व्हाइट वाईनमधलं प्रमाण हे खूप कमी असतं. तर रेड वाईनमध्ये ते जास्त प्रमाणात आढळून येतं. टॅनिन हा एक फिनॉलिक घटक आहे जो सगळ्या झाडांमध्ये असतो. या घटकामुळे सर्व प्रकारच्या झाडांचं विषारी घटकापासून आणि रोगराईपासून संरक्षण होतं.

टॅनिनसारखे इतरही अनेक फिनोलिक घटक हे द्राक्षांच्या बियामध्ये आणि स्कीनमध्ये असतात. पण वाईनची प्रक्रिया करताना ते व्यवस्थितरित्या द्राक्षापासून वेगळे केले जातात.

टॅनिन हे चहा आणि चॉकलेट्समध्येही असतं. ते एक चांगलं अँटी ऑक्सिडंट आहे. त्यामुळे याही घटकांमुळे डोकेदुखी होण्याची शक्यता नाही.

मग कोणत्या घटकापासून होते डोकेदुखी?

तर याचं उत्तर आहे, क्वेर्सेटिन. क्वेर्सेटिन हे एक रंगद्रव्य असतं. व्हाईट वाईनपेक्षा रेड वाईन मध्ये याचं प्रमाण जास्त असते. या क्वेर्सेटिनमुळे वाईनचं पचन व्यवस्थित होत नाही. जर वाईनचं चांगलं पचन झालं नाही तर शरिरात एसीटाल्डिहाइड नावाचं विष तयार होऊ लागतं. ज्यामुळे डोकेदुखी आणि मळमळ होऊ लागते. दरम्यान, हा त्रास सर्वांनाच होतो असं नाही.

वाईनसह सर्वच अल्कोहोलचे पचन हे दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यामध्ये अल्कोहोलमधल्या इथेनॉलचं एसीटाल्डिहाइड मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एल्डीहाइड डिहाइड्रोजनेज (ALDH) एंजाइम या एसीटाल्डिहाइड अॅसिडचं एसीटेटमध्ये रूपांतर करते. हे एसीटेट अॅसिड निरूपद्रवी असते.

यावरून ज्यांच्या शरीरामध्ये एल्डीहाइड डिहाइड्रोजनेजचं (ALDH) कार्यक्षम नसते त्यांच्या शरीरात वाईनचं पचन होत नाही परिणामी डोकेदुखी सुरू होते.

वाईनचं पचन व्हावं म्हणून काय करता येईल?

वाईनचं पचन व्हावं म्हणून एकतर वाईनमध्ये थोडं पाणी सुरूवातीलाच मिक्स करून प्यावी.

उपाशी पोटी वाईन पिऊ नये.

वाईन पिताना एकतर सुरूवातीलाच एक ग्लास पाणी प्यावं किंवा वाईनच्या प्रत्येक घोटानंतर एक घोट पाण्याचा घ्यावा.
चांगली उच्च दर्जाची वाईन प्यावी.

वाईनचं प्रमाण कमी घ्यावं, तसचं ती थोड्या थोड्या अंतराने, सावकाश प्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Teeth Decreasing in Human : मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं आहे की, माणसाने ज्या ज्या अवयवाचा वापर केला नाही, ते
Starlink Device : स्टारलिंक या खासगी उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल युजर्सना थेट उपग्रहावरून (सॅटेलाईटवरून) इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देता येते. अमेरिकेतले
Text Neck Syndrome : ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ म्हणजे मोबाईल पाहण्यासाठी किंवा लॅपटॉपवर काम करण्यासाठी तासन् तास मान वाकवून (खाली करुन)

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली